# Dainik Maval > Latest Breaking News from Maval ## Posts - [पवना धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संयुक्त संघटनेने घेतली आमदार सुनील शेळके यांची भेट](https://dainikmaval.com/office-bearers-of-the-pawana-dam-affected-joint-organization-met-mla-sunil-shelke/): Dainik Maval News : गेली अनेक वर्षांपासून रखडलेले पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लागावेत, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत असलेल्या विविध मागण्या यांबाबत पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेच्या वतीने आमदार सुनील शेळके यांची ( दि. ११ एप्रिल ) भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. आमदार सुनील शेळके यांनीही तातडीने पुनर्वसन मंत्री यांच्या सचिव यांचेशी बोलणे करून पुढील आठवड्यात मंत्रालयात याबाबत विशेष बैठक आयोजित करून सविस्तर चर्चा करून पुढील उपाययोजना करूयात, असे आश्वासन पदाधिकारी, धरणग्रस्त शेतकरी यांना दिले. याप्रसंगी पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे अध्यक्ष नारायणराव बोडके, माजी अध्यक्ष रविकांत रसाळ, कार्याध्यक्ष रामभाऊ कालेकर, सचिव बाळासाहेब काळे , पत्रकार रविभाऊ ठाकर, कायदेविषयक सल्लागार ॲड. […] - [जांभूळ जॅकवेलमधून पुढील काही दिवस गढूळ पाणीपुरवठा, नागरिकांनी पाणी उकळून व फिल्टर करून वापरावे - वडगाव नगरपंचायत](https://dainikmaval.com/muddy-water-supply-from-jambhul-jackwell-citizens-should-filter-water-and-use-it-vadgaon-nagar-panchayat/): Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत वडगाव शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या नवीन वाढीव पाणीपुरवठा योजने अंतर्गत जांभूळ बंधारा येथे नगरपंचायत मार्फत नवीन जॅकवेल करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे जांभूळ जॅकवेल येथून काही भागात होणारा पाणीपुरवठा हा पुढील 20 ते 25 दिवस गढूळ राहील. यापार्श्वभूमीवर वडगाव मधील सर्व नागरिकांनी सध्या येणारे पाणी उकळून व फिल्टर करून वापरावे, असे आवाहन वडगाव नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे. वडगाव नगरपंचायत प्रशासन नागरिकांच्या आरोग्याबाबत पूर्णपणे सजग असून पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम यांनी सांगितले. तसेच, नागरिकांनी कोणतीही अडचण असल्यास […] - [मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार ; 'पीएमआरडीए'कडून 67 कोटींचा विकास आराखडा जाहीर](https://dainikmaval.com/the-face-of-maval-mulshi-haveli-taluka-will-change-pmrda-announces-development-plan-worth-rs-67-crore/): Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी आणि हवेली हे निसर्गाचा वरदहस्त लाभलेले तालुके असून येथील विविध ठिकाणे पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे ही पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी पीएमआरडीएकडून पर्यटन विकास आराखडा जाहीर करण्यात आला आहे. पीएमआरडीएने मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 67 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. मुख्यमंत्री तथा पीएमआरडीएचे अध्यक्ष यांनी या प्रकल्पांना मान्यात दिली असून, यात रस्ते विकास, पार्किंग, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थांवर विशेष भर दिला जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी देखील त्याबाबत सूचना दिल्यानंतर आता या कामांना आता गती मिळाली […] - [श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर भाविकांना नित्यदर्शनाकरिता दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय](https://dainikmaval.com/decision-to-keep-shri-kshetra-bhimashankar-temple-closed-for-devotees-for-daily-darshan-till-31st-may-2026/): Dainik Maval News : नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्या पार्श्वभूमी होणारी भाविकांची होणारी गर्दी, भाविकांची सुरक्षितता, जून महिन्यातील पावसाचे प्रमाण याबाबी विचारात घेवून मंदिर व परिसराचे कामे वेळेत पूर्ण होण्याकरिता श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर भाविकांना नित्यदर्शनाकरिता ९ एप्रिल २०२६ रोजीपासून पुढे ३१ मे २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे. सन २०२७ मधील नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रयागराज महाकुंभ २०२५ च्या अनुभवाच्या आधारे नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांपैकी मोठ्याप्रमाणात भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता विचारात घेण्यासोबतच वाढत्या गर्दीच्या अनुषंगाने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारणीची कामे सुरु […] - [जगाच्या नकाशावर गेलेली पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेचा दुसरा हंगाम ; मावळमधील 'या' भागात होणार सायकल स्पर्धा](https://dainikmaval.com/pune-grand-tour-2027-season-two-cycling-competition-will-be-held-in-pune-district-from-26th-to-31st-january-2027/): Dainik Maval News : पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर – २०२७’ (सीझन २) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने २६ जानेवारी २०२७ रोजी होणार असून समारोप ३१ जानेवारी रोजी होणार आहे. स्पर्धेची सुरुवात आणि समारोप दोन्ही टप्पे सुट्टीच्या दिवशी ठेवण्यात आले असून यामुळे पुणेकरांना कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते, वाहतूक व्यवस्थापन आणि स्पर्धेच्या मार्गनिश्चितीसंदर्भात आयोजित प्राथमिक बैठकीत ते बोलत होते. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये आणि पुणेकरांना स्पर्धेचा आनंद मनमुराद घेता यावा, या उद्देशाने नियोजनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार स्पर्धेचा पहिला टप्पा […] - [उत्खनन रॉयल्टी माफ, बिगरशेती परवाना प्रक्रिया डिजिटल होणार - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे](https://dainikmaval.com/mining-royalty-waived-non-agricultural-license-process-will-be-digital-revenue-minister-chandrashekhar-bawankule/): Dainik Maval News : बांधकाम करताना उत्खनन करण्यात आलेले गौण खनिज त्याच जागी वापरले तर त्याला रॉयल्टी माफ करण्यात आली असून, बिगरशेतीसाठी आता जिल्हाधिकारी यांच्याकडे जाण्याची आवश्यकता नाही. ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार आहे. याबरोबरच महापालिका आणि मिळकतपत्रावरील नोंदीबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न आणि प्रलंबित मागण्यांबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली क्रेडाईच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात बैठक झाली. महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, उत्खननानंतर निघालेले गौणखनिज जर त्याच बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी वापरले जात असेल, तर त्यावर कोणतीही रॉयल्टी आकारली जाणार नाही. यामुळे प्रकल्पाचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, रॉयल्टी भरण्याची […] - [एमपीएससी मुख्य परीक्षा - २०२४ चा निकाल जाहीर ! सोलापूर जिल्ह्यातील विजय लामकाने राज्यात प्रथम](https://dainikmaval.com/mpsc-main-exam-2024-result-announced-vijay-lamkane-from-solapur-district-stood-first-in-maharashtra/): Dainik Maval News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २७ ते २९ मे २०२५ दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून तो आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या परीक्षेत विविध २० संवर्गांतील एकूण ४६१ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लामकाने यांनी सर्वसाधारण तसेच मागासवर्ग गटातून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील आरती परमेश्वर जाधव या महिला खुल्या प्रवर्गामधून राज्यात प्रथम आल्या आहेत. उमेदवारांचा सविस्तर निकाल तसेच प्रत्येक प्रवर्गासाठीचे सीमांकन गुण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे आयोगाने स्पष्ट आहे. वैद्यकीय तपासणी पूर्ण न केलेल्या उमेदवारांचा […] - [कामशेत येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग ; लाखोंचा माल भस्मसात](https://dainikmaval.com/massive-fire-breaks-out-at-scrap-warehouse-along-old-pune-mumbai-highway-in-kamshet-maval/): कामशेत, दि. ६ (प्रतिनिधी) – जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या एका भंगाराच्या दुकानाला सोमवारी ( दि. ६ एप्रिल ) दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. दुपारी सुमारे ३:३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की काही मिनिटांतच भंगाराचे मोठे ढिगारे पेट घेत गेले. यामुळे परिसरात दाट काळ्या धुराचे लोट पसरले होते. हे धुराचे ढग तब्बल २ ते ३ किलोमीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीची तीव्रता लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव काही काळासाठी पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यामुळे वाहनांची काही प्रमाणात कोंडीही झाली. सुदैवाने या […] - [दुर्देवी घटना ! टाकवे बुद्रुक येथे विहिरीत पडून ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू](https://dainikmaval.com/tragic-incident-an-80-year-old-man-died-after-falling-into-a-well-in-takve-budruk-maval/): Dainik Maval News : मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक गावात एका ८० वर्षीय व्यक्तीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. कोंडीबा गुणाजी असवले (वय ८० वर्षे) असे मृत वृद्धाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोंडीबा असवले हे गावातील विहिरीपाशी गेले असताना अचानक त्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडले. विहीर खोल असल्याने आणि पाणी जास्त असल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा या बचाव पथकांना पाचारण करण्यात आले. दोन्ही संस्थांच्या स्वयंसेवकांनी स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांच्या मदतीने अथक प्रयत्न करून कोंडीबा असवले यांचा मृतदेह […] - [अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी राज्यातील १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत](https://dainikmaval.com/assistance-of-rs-128-crore-to-1-lakh-80-thousand-farmers-in-maharashtra-for-damage-caused-by-unseasonal-rains/): Dainik Maval News : राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने राज्यात शेतीचे सुमारे १ लाख १४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यामुळे १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्य़ांच्या शेती आणि शेतीमालाचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना १२८.८६ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. हे नुकसान प्रामुख्याने चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात नुकसान झाले होते. एप्रिल २०२६ मध्ये […] - [मावळ तालुक्यात दोन नवीन मेट्रो प्रकल्पांना मंजूरी द्यावी ; बाळा भेगडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी](https://dainikmaval.com/two-new-metro-projects-should-be-approved-in-maval-taluka-bala-bhegde-demands-from-cm-devendra-fadanvis/): वडगाव मावळ, दि. ७ (प्रतिनिधी) : मावळ तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या अशा, हिंजवडी शहर ते तळेगाव ( नवलाख उंबरे) एमआयडीसी आणि निगडी शहर ते लोणावळा शहर ह्या दोन नवीन मेट्रो प्रकल्पांना मंजुरी द्यावी, अशी आग्रही माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृह याठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाळा भेगडे यांनी ही मागणी केली. या दोन्ही विकास प्रकल्पांमुळे मावळ तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होईल. निगडी ते लोणावळा मेट्रो मार्ग : पर्यटनाचा तालुका म्हणून प्रसिद्ध मावळ तालुक्यात असलेला पर्यटनाचा वाव पाहता, निगडी ते लोणावळा मेट्रो मार्ग सुरू झाल्यास प्रवाशांना जलद, सुरक्षित व सोयीस्कर […] - [तळेगावकरांना पाणीप्रश्नावर मोठा दिलासा ; यशवंतनगर येथील ३ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण](https://dainikmaval.com/big-relief-for-talegaon-dabhade-people-on-water-issue-inauguration-of-water-purification-center-at-yashwant-nagar/): Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येला अखेर मोठा दिलासा मिळाला असून, नगरपरिषदेच्या माध्यमातून यशवंत नगर येथे ३ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण आज उत्साहात संपन्न झाले. आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे स्टेशन परिसरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरपरिषदेच्या सुमारे १ कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे सत्यकमल कॉलनी, म्हाडा कॉलनी, रेनो कॉलनी, स्टेशन चौक आणि यशवंत नगर परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम होणार असून चौराई येथील मुख्य जलशुद्धीकरण प्रकल्पावरील ताणही कमी होणार आहे. स्टेशन भागातील नागरिकांना पाण्यासाठी दररोज करावी […] - [लोणावळा शहराचा 'स्मार्ट सिटी' धर्तीवर विकास आराखड्यास गती ; 'एआय' आधारित CCTV, रस्ते सुशोभीकरण व ट्रॅफिक व्यवस्थापनावर भर](https://dainikmaval.com/lonavala-smart-city-development-plan-focus-on-ai-based-cctv-road-beautification-traffic-management/): Dainik Maval News : लोणावळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुंबई–पुणे या दोन महानगरांच्या मध्यवर्ती ठिकाणी व निसर्गसौंदर्याने नटलेल्या लोणावळा शहराला पाश्चिमात्य देशांच्या धर्तीवर जागतिक ओळख मिळावी, या दृष्टीने विविध विकासात्मक मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीत शहरातील प्रमुख रस्त्यांचे सुशोभीकरण, ट्रॅफिक व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, फूटपाथ सुधारणा, भूमिगत विद्युतवाहिन्या, पथदिवे, पार्किंग झोन, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, अतिक्रमण नियंत्रण, जंक्शन सुधारणा तसेच हॉकर्स झोन निर्मिती यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींचा आराखडा सादर करण्यात आला. विशेष म्हणजे, AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने CCTV द्वारे वाहतूक व सुरक्षा नियंत्रण अधिक प्रभावी करण्यावरही भर देण्यात आला. याचबरोबर […] - [आमदार सुनील शेळके यांच्या आदेशाचे पालन करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 संचालकांचे राजीनामे, 4 संचालकांकडून मात्र 'वेट अँड वॉच'ची भूमिका](https://dainikmaval.com/8-directors-resign-following-mla-sunil-shelke-order-but-remaining-4-directors-take-wait-and-watch-stance-maval-apmc/): Dainik Maval News : मावळ तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संख्याबळ अधिक असलेल्या, मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर अवघ्या पाच संचालकांचे संख्याबळ असलेल्या भारतीय जनता पक्षाचे सभापती झाले आणि संपूर्ण राज्यभर मावळात राष्ट्रवादी काँग्रेसला आलेल्या नामुष्कीची चर्चा झाली. दरम्यान या पराभवाने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांनी तातडीने सर्व संचालकांची बैठक घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण १३ संचालकांना सोमवारीच आपले राजीनामे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच या आदेशाचे पालन न केल्यास पक्षीय कारवाई करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान आमदारांच्या […] - [आजिवली येथील रक्तदान शिबिरात १५ महिलांसह एकूण ८० जणांचे रक्तदान ; २३१ जणांची मोफत नेत्र तपासणी](https://dainikmaval.com/total-of-80-people-including-15-women-donated-blood-at-blood-donation-camp-in-ajivali-village-maval/): Dainik Maval News : पवन मावळ विभागातील आजिवली गावात शिवसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने बाराव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष कै. भाऊ लायगुडे, चेअरमन कै. अंकुश लायगुडे व मा. उपसरपंच कै. संतोष भाऊ भिकोले यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबीर आणुि मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये 15 महिला आणि 65 पुरुष अशा एकूण 80 दात्यांनी रक्तदान केले. यासह महिला व पुरुष अशा एकूण 231 जणांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. भारतीय जनता माथाडी जनरल संघ, पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल लायगुडे, हमराज मित्र मंडळ अध्यक्ष शशांक बोडके, आजिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच, आशा […] - [भाजपाचा धोबीपछाड, नेत्यांचा थयथयाट ! बाजार समितीतील राष्ट्रवादीच्या सर्व संचालकांना राजीनामे देण्याचे आदेश ? नक्की काय घडलं](https://dainikmaval.com/maval-apmc-ncp-defeated-by-bjp-in-chairman-election-mla-sunil-shelke-orders-ncp-directors-to-resign/): Dainik Maval News : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सहा मते फुटली आणि राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असतानाही भाजपाचे सुभाषराव जाधव हे सभापती झाले. या निवडणुकीनंतर मावळ भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या छोबीपछाडची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आता पक्षाच्या सर्व संचालकांना थेट राजीनामे सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. संख्याबळ अन् सत्ता असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीत भाजपा उमेदवाराने पराभव केला. या घटनेचा सर्वत्र बोलबाला झाला अन् राष्ट्रवादीवर पराभव स्वीकारण्याची नामुष्की आली. हा पराभव गांभीर्याने घेत राष्ट्रवादी काँग्रसचे मावळ […] - [तुमच्या कुटुंबाला धक्काही लागणार नाही ! टाटाची 'ही' कार आहे देशातील सर्वात स्वस्त अन् दणकट CNG कार, किंमत फक्त...](https://dainikmaval.com/tata-punch-cng-car-is-the-cheapest-and-most-powerful-cng-car-in-the-country-know-about-punch-car/): Dainik Maval News : तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी एक सुरक्षित आणि CNG वर चालणारी कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर Tata Punch CNG हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. कमी किमतीत चांगली सेफ्टी देणाऱ्या कारमध्ये आता Tata Punch CNG चे नाव अग्रस्थानी आले आहे. विशेष म्हणजे या कारला आता ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. Bharat NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये Tata Punch CNG ला ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. त्यामुळे ही भारतातील सर्वात स्वस्त आणि सुरक्षित CNG कारांपैकी एक ठरली आहे. क्रॅश टेस्टदरम्यान Tata Punch ची टक्कर सामान्य कारशी नाही, तर एका ट्रकसोबत करण्यात आली. जोरदार धडकेनंतर कारच्या फक्त पुढील बोनट भागाला […] - [अवकाळी पावसामुळे मावळमधील शिवणे भागातील शेतकऱ्याचे शेतीचे नुकसान !](https://dainikmaval.com/farmers-in-shivne-area-of-maval-suffer-crop-losses-due-to-unseasonal-rains/): दैनिक मावळ (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यात गेली चार ते पाच दिवसांपासून बिगरमोसमी (अवकाळी पाऊस) पावसाचे वातावरण आहे. तसेच गुरुवारी (दि. २ एप्रिल रोजी) दुपारी व सायंकाळच्या सुमारास मावळ तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासहीत अवकाळी पाऊस बरसला. पवन मावळ विभागातील शिवणे भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे येथील शेतकरी चंद्रकांत गणपत कुंभार यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांनी शेतात लावलेला फळभाजीपाला, भाजीपाला याचे हातातोंडाशी आलेले पिक या अवकाळी पावसाच्या फेऱ्यात जवळपास उद्धवस्त झाले असून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्याला आर्थिक आधार द्यावा, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत कुंभार यांनी दैनिक मावळ सोबत बोलताना […] - [भूमि अभिलेख विभागातील भूकरमापक पद रद्द करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय ; त्याजागी 'या' नवीन पदाची निर्मिती](https://dainikmaval.com/in-land-records-department-now-post-of-conservation-surveyor-will-be-replaced-by-post-of-land-surveyor/): Dainik Maval News : भूमि अभिलेख विभागातील गट क संवर्गातील भूकरमापक हे पद रद्द करून परिरक्षण भूमापक असे पद निर्माण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ही पदे रद्द करण्यात आलेल्या भूकरमापक संवर्गातून नियमित पदोन्नतीने व विभागीय परीक्षेद्वारे प्रत्येकी 40 टक्के आणि सरळसेवेने 20 टक्के या प्रमाणात भरली जातील. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध तयार केला आहे. यामध्ये नियमित 9 हजार 638 आणि कंत्राटी 1 हजार 45 अशा एकूण 10 हजार 683 पदांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी भूकरमापक व परिरक्षण भूमापक या संवर्गामध्ये एकूण 6 हजार 937 पदे […] - [लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीसाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ](https://dainikmaval.com/good-news-relief-for-beneficiaries-of-ladki-bahin-yojana-deadline-extended-till-april-30-for-e-kyc-correction/): Dainik Maval News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ होती. मात्र राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपीटीचे संकट, तसेच लाभार्थी महिलांकडून झालेली मागणी यांचा विचार करून ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे. अधिकाधिक पात्र महिलांना योजनेचा […] - [महत्वाची बातमी ! पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी - वाचा नियमावली](https://dainikmaval.com/important-news-section-37-orders-issued-in-pune-rural-district-read-the-regulations/): Dainik Maval News : पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राखणेकामी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन व The Maharashtra Police Act (Bombay Aet No.XXII OF १९५१) (Title Substituted For The Bombay Police Act, १९५२) चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये १६ एप्रिल २०२६ रोजी २४ वाजेपर्यंत खाली नमूद केलेली कृत्य करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहेत. कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे. दगड अथवा शस्त्रे किवा अस्खे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे. शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व […] - [घरगुती गॅसचा तुटवडा, राज्यातील भोंदूबाबांचा सुळसुळाट विरोधात 'माकप'चे मावळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन](https://dainikmaval.com/cpi-m-protests-in-front-of-tehsil-office-against-domestic-gas-shortage-maval/): Dainik Maval News : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि. २ एप्रिल) मावळ तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. महिलांनी कार्यालयासमोर चूल पेटवून भाकरी करत प्रतिकात्मक आंदोलन केले. पुणे जिल्हा सचिव कॉ. गणेश दराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या आंदोलनात अपर्णा दराडे, बाळासाहेब शिंदे, डॉ. बाबासाहेब देशमुख, श्रीरंग जाधव, बबन गावडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. राज्यात भोंदूबाबांचा वाढता सुळसुळाट, त्यांना मिळणारे राजकीय पाठबळ आणि घरगुती गॅसच्या तुटवड्याविरोधात आंदोलनकर्त्यांनी निषेध नोंदवला. गॅस वितरक कार्यालयांसमोर लागणाऱ्या रांगांमुळे नागरिक त्रस्त असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देऊन सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. ( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक […] - [पुणे जिल्हा परिषदेचे चार विषय समित्यांचे सभापती ठरले ; मावळ, राजगड, हवेली, इंदापूर तालुक्यांना मिळाला मान](https://dainikmaval.com/four-subject-committees-of-pune-zilla-parishad-were-appointed-as-chairmen-maval-velhe-haveli-indapur/): Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषदेच्या विविध चार विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवड अखेर पार पडली आहे. यामध्ये मावळ, राजगड ( वेल्हे ), हवेली आणि इंदापूर या तालुक्यांतील सदस्यांना सभापती पदाचा मान मिळाला आहे, तर ऐनवेळी बारामतीसह खेड, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांचा पत्ता कट झाला आहे. मावळ तालुक्यातील दीपाली हुलावळे, राजगड तालुक्यातील अमोल नलावडे, इंदापूर तालुक्यातील अंकिता पाटील आणि हवेली तालुक्यातील जितेंद्र बढेकर यांची विषय समिती सभापती पदी वर्णी लागली आहे. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या बंगल्यावर गुरुवारी (दि. २) सकाळी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाठवलेले बंद पाकिट उघडून ही नावे जाहीर करण्यात […] - [मावळमधील जमीन प्रकरणात अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा पती गोल्डी बेहल अडचणीत ; शेतकऱ्याची थेट कोर्टात धाव](https://dainikmaval.com/actress-sonali-bendre-and-her-husband-goldie-behl-in-trouble-over-land-case-in-maval-farmer-rushes-to-court/): Dainik Maval News : मावळ तालुक्यातील उकसान गावात जमिनीच्या वादावरून हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचे पती गोल्डी बेहल अडचणीत सापडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळं संपूर्ण मावळ परिसरात मोठी चर्चा रंगली असून, वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयात याबाबत दावा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उकसान येथील सुमारे 30 गुंठे जमिनीवर स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी आपला वडिलोपार्जित कुळ हक्क असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही जमीन 1957 पूर्वीपासून त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात आहे. मात्र, काही व्यक्तींनी कथितपणे खोट्या कागदपत्रांच्या आधारे हा हक्क डावलून संबंधित जमीन विक्री व्यवहार करण्यात आला. या व्यवहारात अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि त्यांचे […] - ['सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं...' - आमदार सुनील शेळके](https://dainikmaval.com/sunetra-ajit-pawar-should-become-chief-minister-of-maharashtra-said-mla-sunil-shelke/): Dainik Maval News : “मला मंत्रीपद मिळो की न मिळो, पण दादांना मुख्यमंत्रीपद मिळायला हवे होते. ही एक इच्छा अपूर्ण राहिली आहे. आता अजित दादा राहिले नाहीत, तरी त्यांच्या रूपात सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी आई एकविरा चरणी प्रार्थना आहे. आम्ही त्यांना घेऊन पुन्हा एकविरा देवीच्या दर्शनाला येऊ,” असे साकडे आमदार सुनील शेळके यांनी आई एकविरा देवीच्या चरणाशी घातले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आणि त्यापूर्वी झालेल्या लोणावळा, वडगाव आणि तळेगाव येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा डंका वाजला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती […] - [वडगावमधील मुख्य बाजारपेठ मार्गावर वाढत्या वाहतूक कोंडीबाबत तातडीने उपाययोजना करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन](https://dainikmaval.com/statement-to-ceo-to-take-immediate-measures-regarding-increasing-traffic-congestion-on-market-road-in-vadgaon-maval/): Dainik Maval News : मावळ तालुक्याचे महसूली केंद्र असलेल्या वडगाव मावळ शहरातील प्रमुख बाजारपेठ मार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. खासकरून आठवड्याची सुरूवात, आठवडे बाजार आणि सणउत्सव समारंभ असल्यास होणारी प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे सामान्यांसह व्यापारी हैराण झाले असून यावर प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात यावी, याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व शहरातील सुरळीत वाहतुकीसाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी भाजपाचे युवा नेतृत्व ॲड. मृणाल म्हाळसकर, मा उपनगराध्यक्षा पुजाताई वहिले, श्रेयाताई भंडारी, ॲड वैष्णवी भिलारे आदी उपस्थित होते. तसेच, भारतीय जनता पार्टी, वडगाव-कातवी शहर महिला […] - [Lohgad Fort : खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून 'आपला मावळा' संघटनेमार्फत किल्ले लोहगडावर गडसंवर्धन मोहीम](https://dainikmaval.com/fort-conservation-campaign-on-lohgad-fort-through-aapla-mavla-organization-on-the-initiative-of-mp-nilesh-lanke/): Dainik Maval News : मावळ तालुक्यातील किल्ले लोहगड येथे नुकतीच गडसंवर्धन आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून ‘आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातूम आयोजित या उपक्रमात शेकडो शिवभक्त आणि तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान केले. यासह आमदार जयंत पाटील यांनीही प्रत्यक्ष हातात फावडे घेऊन श्रमदान करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. मोहिमेदरम्यान किल्ल्यावरील कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छतेसोबतच पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यावरही भर देण्यात आला. यामध्ये मार्गदर्शक फलक, ऐतिहासिक माहिती देणारे फलक, विश्रांतीसाठी बाकांची व्यवस्था तसेच सौरऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांची बसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर अनुभव मिळणार आहे. ही […] - [राज्यात आजपासून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला प्रारंभ ; सुदृढ गावांना मिळणार ‘आरोग्यसंपन्न गाव’ किताब](https://dainikmaval.com/my-village-healthy-village-campaign-to-start-in-maharashtra-healthy-villages-will-get-the-title-of-healthy-village/): Dainik Maval News : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या या राज्यव्यापी अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. हे अभियान फक्त सरकारी कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता, लोकसहभागाद्वारे त्यातून एक व्यापक आरोग्य चळवळ उभी राहावी, असा राज्य शासनाचा मानस आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक गाव आरोग्य संपन्न […] - [नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच गॅस महागला ; व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १९५ रुपयांनी वाढली](https://dainikmaval.com/gas-prices-rise-at-beginning-of-new-financial-year-commercial-lpg-cylinder-price-increases-by-rs-195/): Dainik Maval News : भारतात व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरात पुन्हा मोठा वाढ झाली आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात एलपीजी गॅसची टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. सरकारकडून ही बाब नाकारली जात असली तरीही एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाल्याने नागरिकांना आता आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. बुधवारी (1 एप्रिल) व्यावसायिक एलपीजीच्या दरात 195.50 रुपयाने वाढ झाली आहे. दरम्यान, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, दिल्लीत 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी आता 2,078.50 रुपये मोजावे लागतील. ही माहिती सरकारी तेल कंपन्यांनी दिली आहे. यापूर्वी 1 मार्च रोजी 19 किलो सिलिंडरच्या दरात 114.50 […] - [सीआरपीएफ जवानाच्या मिसिंग प्रकरणात तळेगाव दाभाडे पोलिसांचा हलगर्जीपणा समोर ; रस्ते अपघातानंतर...](https://dainikmaval.com/talegaon-dabhade-police-negligence-exposed-incident-of-not-taking-proper-notice-of-missing-crpf-jawan/): Dainik Maval News : सीआरपीएफ मध्ये गांधीनगर, गुजरात येथे काम करत असलेला तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असलेला जवान प्रशांत कदम हा २५ मार्च रोजी घरातून ड्युटीवर जातो असे सांगून बाहेर पडला. त्यानंतर लोणावळा येथून पुन्हा तो तळेगाव च्या दिशेने कोणाला काही न सांगता आला. फोन देखील बंद ठेवला. दरम्यान २५ मार्च रोजी रात्री सोमाटणे फाटा जवळ हॉटेल अंगण समोर रस्ता क्रॉस करताना त्याला अनोळखी गाडीने उडवले आणि तो गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला वायसीएम रुग्णालयात रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याबाबत तळेगाव पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळाल्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांचा […] - ["अजून वेळ गेलेली नाही.. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंद, पण.." आमदार सुनील शेळके यांच्या विधानाने दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण](https://dainikmaval.com/mla-sunil-shelke-on-ncp-merger-statement-those-who-do-not-accept-sunetra-pawars-leadership-can-take-exit-route/): Dainik Maval News : स्व. अजित दादा पवार यांचे विश्वासू व निकटवर्तीय मानले जाणारे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरूवात केली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणे शक्य असल्याचे सांगत अजूनही वेळ गेलेली नाही, असा दावा आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. याबाबत त्यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वात दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील, तर अजूनही वेळ गेलेली नाही, असे विधान करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाचा सूर लावल्याने पुन्हा एकदा विलीनीकरणाची चर्चा रंगली आहे. काय म्हणाले आमदार शेळके ? आ. सुनील शेळके म्हणाले, उपमुख्यमंत्री […] - [Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायतीकडून दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग निधीचे वाटप](https://dainikmaval.com/vadgaon-nagar-panchayat-distribution-of-disability-fund-to-disabled-beneficiaries-by-vadgaon-nagar-panchayat/): Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सन २०२५/२०२६ मधील उत्पन्नाच्या ५ % अपंग कल्याण निधी अंतर्गत नगरपंचायत मध्ये सन २०२५ मध्ये नोंदणी केलेल्या १०३ लाभार्यांना सोमवारी (दि. ३० मार्टच) नगरपंचायत कार्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येकी ६२६० रुपयांचा धनादेश नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि वडगाव नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी दिव्यांग नागरिक उपस्थित होते. नगराध्यक्षा अबोली ढोरे यांच्या विशेष प्रयत्नाने अपंग कल्याण योजनेतून शहरातील जवळपास १०३ दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी ६२६० रुपये याप्रमाणे सुमारे ६ लाख ४४ हजार रुपये सर्वांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. यावेळी दिव्यांग लाभार्थी यांना संबोधित करताना नगराध्यक्षा अबोली मयुर ढोरे […] - [कामशेत हादरले... कामशेतमध्ये एकाचा खून ; गुन्हा लपविण्यासाठी साथीदारावर देखील जीवघेणा हल्ला । Kamshet Crime](https://dainikmaval.com/murder-of-one-in-kamshet-fatal-attack-on-accomplice-to-hide-crime-kamshet-crime/): Dainik Maval News : कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून आणि खुनाचा प्रयत्न असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मित्राचा खून केल्यानंतर गुन्ह्याची चर्चा बाहेर जाऊ नये म्हणून दोन आरोपींनी आपल्या तिसऱ्या साथीदारावर दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश दत्ता पिंगळे (वय २९, रा. साई, ता. मावळ) याचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी रंजीत रामचंद्र वाडेकर (वय ३६) आणि निखिल उर्फ दाद्या जितेंद्र माने (वय २८), दोघे रा. कामशेत यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यात रोहिदास अशोक चव्हाण (वय ३५, रा. चिखलसे/कामशेत) याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, खुनाची माहिती बाहेर देत असल्याचा […] - [वडगावमध्ये श्री पोटोबा महाराज उत्सव व श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा ; तीन दिवसीय यात्रेत विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम](https://dainikmaval.com/shri-potoba-maharaj-festival-and-shri-hanuman-janmotsav-celebration-in-vadgaon-maval/): Dainik Maval News : मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेले, वडगाव नगरीचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज आणि श्री हनुमान जन्मोत्सव अर्थात चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त उत्सव समितीच्या वतीने गुरुवार (दि. २ एप्रिल) ते शनिवार (दि ४ एप्रिल) दरम्यान विविध धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सव समितीचे अध्यक्ष महेंद्र म्हाळसकर व उत्सव कमिटीचे पदाधिकारी यांनी ही माहिती दिली. यामध्ये भजन स्पर्धा, शोभेचे दारूकाम, छकडी बैलगाडा स्पर्धा, लोकनाट्य, ऑर्केस्ट्रा, निकाली कुस्त्यांचा आखाडा आदी कार्यक्रमांचा यात समावेश आहे. पोटोबा महाराज उत्सव व हनुमान जन्मोत्सवानिमित्त गुरुवारी (दि.२) पहाटे देवस्थानचे विश्वस्त व उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पोटोबा महाराजांचा अभिषेक, सकाळी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा, […] - [अमृतमहोत्सव एकनाथपर्वाचा !!](https://dainikmaval.com/special-article-on-occasion-of-seventy-fifth-birthday-of-eknathrao-tile-maval-bjp-leader/): अमृतमहोत्सव एकनाथपर्वाचा !! मावळ घडविणारी माणसं कुणी इंग्लंड – अमेरिकेला जाऊन अत्युच्च शिक्षण घेऊन आली नव्हती, “राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ म्हटल्या जाणाऱ्या सह्याद्रीच्या कडेकपारातील गावात राहणारी, पवना, आंद्रा, सुधा, इंद्रायणी यांसारख्या लोकमाताच्या काठावरील साध्यासुध्या माणसांनीच आपला प्रगतशील मावळ घडविला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा तर ज्ञानोबा – तुकोबांच्या ओव्या – अभंगातून विचार घेऊन समाजहिताची कामे केली. मावळच्या जडणघडणीतील असेच एक व्यक्तीमत्व म्हणजेच आपल्या सर्वांचे आदरणीय ‘भाऊ’ अर्थात श्री एकनाथराव काशिनाथराव टिळे. भाऊंचा जन्म सोमवार, दि. २९ मार्च १९५२ साली आई पार्वताबाई व वडील काशिनाथराव यांच्या पोटी आजोळी ‘शिवली’ येथे शेतकरी कुटुंबात झाला. टिळे दांम्पत्याचे हे पहिले अपत्य. काशिनाथ […] - [तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट कोसळून तरुणाचा करुण अंत, सोसायटीच्या चेअरमनसह 11 जणांवर गुन्हा दाखल ; तळेगावमधील धक्कादायक घटना](https://dainikmaval.com/young-man-died-tragically-after-lift-collapsed-due-to-technical-fault-at-talegaon-dabhade-case-registered/): Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील एका गृहनिर्माण संस्थेची लिफ्ट अचानक खाली कोसळल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी लिफ्टच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत सोसायटीच्या चेअरमनसह ११ सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश सुरंगे असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या तरुणाचे नाव आहे. ​रितेश रामा सुरंगे (वय ३२, रा. किनळे, हवेली) यांनी शनिवारी (दि. २८ मार्च) रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ‘निसर्ग हौसिंग सोसायटी’ येथे हा प्रकार घडला. पोलिसांनी सोसायटीचे चेअरमन पुंडलिक हिंदराव वारके (वय ४४) यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ दिनेश सुरंगे लिफ्टने खाली जात असताना लिफ्ट […] - [येळसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जन आरोग्य समिती अध्यक्षपदी संतोष राऊत यांची निवड](https://dainikmaval.com/santosh-raut-elected-as-chairman-of-public-health-committee-of-primary-health-center-in-yelse/): Dainik Maval News : पवनानगर जवळील येळसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जन आरोग्य समिती अध्यक्षपदी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संतोष गबळू राऊत यांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. २७ मार्च) रोजी येळसे येथील आरोग्य केंद्रात समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी सर्वानुमते ही निवड करण्यात आली. यासह या प्राथमिक आरोग्य केंद्राचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प श्री राऊत यांनी व्यक्त केला. या केंद्रामार्फत आरोग्य सुविधा सामान्यांपर्यंत पोहोचवणे, कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराच्या लसीकरणाची जनजागृती, आरोग्य केंद्रातील डॉक्टर, सिस्टर, आरोग्य सेविका, अधिकारी, पंचायत समिती सदस्य व समिती पदाधिकारी आदी सर्वांनी मिळून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारात पारदर्शकता हेच आपले ध्येय असल्याचे राऊत यांनी सांगितले. आमदार […] - [पुणे ग्रामीण पोलीस दलाला ई-गव्हर्नन्स १५० दिवस कार्यक्रमात घवघवीत यश ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा गौरव](https://dainikmaval.com/pune-rural-police-force-achieves-huge-success-in-e-governance-150-days-program/): Dainik Maval News : महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या मूल्यमापनात पुणे ग्रामीण पोलीस दलाने एकूण २०० पैकी १४५ गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात चौथा क्रमांक पटकावला असून, कोल्हापूर परिक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान पटकावला आहे. मुंबई येथील सह्याद्री सभागृहात आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल (IPS) यांना सन्मानित करण्यात आले. या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत पोलीस विभागातील कार्यक्षमता, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवा यांचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये डिजिटल प्रणालींचा वापर, ऑनलाइन सेवा, डेटा व्यवस्थापन, डॅशबोर्ड मॉनिटरिंग आणि तंत्रज्ञानाधारित निर्णयप्रक्रिया या घटकांवर विशेष भर देण्यात आला. […] - [जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उघडले मुख्याधिकाऱ्यांचे दालन ; लोणावळा नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी व मुख्याधिकाऱ्यांचे मनोमिलन](https://dainikmaval.com/lonavala-municipal-council-chief-officer-cabin-opened-on-orders-of-district-magistrate/): Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषदेमधील सत्ताधारी पक्षाचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांनी दिनांक 20 मार्च रोजी लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या कार्यालयाला कुलूप लावत त्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदविला होता. दुसरीकडे मुख्याधिकारी यांनी, माझ्याकडे कोणतीही फाईल प्रलंबित नसल्याचे सांगत कामाच्या बाबतीमध्ये चोख असल्याचे म्हटले होते. दरम्यान शासकीय कार्यालयाला कुलूप लावण्याची लोकप्रतिनिधींची ही कृती कायदा व्यवस्थेला धरून नसल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तहसीलदार विक्रम देशमुख यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये कार्यालयाला लावण्यात आलेले कुलूप काढले आहे. गुरुवारी, दि. 26 मार्च रोजी सायंकाळी तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये मुख्याधिकारी कार्यालयाचे कुलूप खोलण्यात आले. तर, शुक्रवारी दि. 27 मार्च रोजी आमदार सुनील शेळके यांनी मुख्याधिकारी व लोकप्रतिनिधी यांची एकत्रित […] - [तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड ! पाहा सर्व विषय समित्यांची यादी](https://dainikmaval.com/chairperson-and-members-of-various-subject-committees-of-talegaon-dabhade-municipal-council-elected-unopposed/): Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विषय समिती च्या सभापती, सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. शुक्रवारी (दि. 27 मार्च) तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयातील सभागृहामध्ये विषय समित्यांवर सदस्यांचे नामनिर्देशन करणे, विषय समित्यांच्या सभापती पदांची निवड करणे व स्थायी समिती गठित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्थायी समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध अध्यक्ष तथा नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीची सभापतीपदी निखिल भगत, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती सुदाम शेळके, नियोजन आणि विकास समितीच्या सभापतीपदी दीपक भेगडे, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी भारती […] - [PM-RAHAT : रस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी ‘पीएम-राहत’ योजना : अपघातग्रस्तांना तात्काळ दीड (१.५०) लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचाराचा दिलासा](https://dainikmaval.com/pm-rahat-scheme-for-road-accident-victims-immediate-cashless-treatment-relief-of-up-to-one-and-half-lakh-rupees/): Dainik Maval News : रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या नागरिकांना तातडीने दीड (१.५०) लाख रुपयापर्यंतचे उपचार पूर्णतः निशुल्क (cashless) उपलब्ध करून देण्याऱ्या ‘पीएम-राहत’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत राज्य आरोग्य हमी सोसायटीची भूमिका महत्वाची आहे. रूग्णाला ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीचे उपचार देवून मृत्यूदर कमी करण्यास कटिबद्ध राहावे असे आवाहन, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात आयोजित जनआरोग्य योजनेच्या बैठकीत केले. केंद्र शासनाच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी “प्रधानमंत्री – रस्ता अपघातग्रस्त रुग्णालयीन उपचार आणि हमी उपचार (पीएम – राहत) योजना” आणली आहे. या योजने अंतर्गत “आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” व “महात्मा ज्योतिराव फुले जन […] - [‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेअंतर्गत ४०५ शाळा विकसित करण्यास राज्य शासनाची मंजूरी](https://dainikmaval.com/state-government-approves-development-of-405-schools-under-dr-babasaheb-ambedkar-adarsh-school-scheme/): Dainik Maval News : राज्यात शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा विकास साधण्यासाठी राज्य शासनाने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेच्या पुढील टप्प्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी दिली आहे. विकसित महाराष्ट्र-२०४७ या दृष्टीकोनाशी सुसंगत असा हा निर्णय असून यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शाळांची भौतिक व शैक्षणिक गुणवत्ता सुधारून ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समतोल व दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी म्हटले आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात ४७८ […] - [वडगाव मावळ येथे ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून शहरवासीयांना दिलासा](https://dainikmaval.com/water-supply-scheme-worth-rs-39-crore-inaugurated-at-vadgaon-maval-initiative-of-mla-sunil-shelke/): Dainik Maval News : वडगाव शहराच्या वाढत्या नागरिकीकरणाचा वेग लक्षात घेऊन नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियाना’ अंतर्गत ३९ कोटी ३३ लक्ष रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा महत्त्वपूर्ण टप्पा शुक्रवारी (दि. २७ मार्च) पूर्ण झाला. आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘संस्कृती जलशुद्धीकरण केंद्र’ (WTP – 2 MLD) चे लोकार्पण उत्साहात पार पडले. या योजनेअंतर्गत संपूर्ण शहरात तब्बल ८४ किमी लांबीचे पाईपलाईन जाळे उभारले जात असून, नूतनीकरण केलेल्या दोन जलशुद्धीकरण प्रकल्पांमधून दररोज सुमारे ४० लाख लिटर शुद्ध पाणी वडगावकरांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येला मोठा दिलासा मिळणार आहे. डेक्कन […] - [राज्यात दिनांक ३० आणि ३१ मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता](https://dainikmaval.com/thunderstorms-likely-in-the-state-between-march-30th-and-31st/): Dainik Maval News : सध्या राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ हवामान असून ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिण भागांमध्ये दुपारनंतर स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. हा पाऊस प्रामुख्याने कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे. दि. ३० मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. उर्वरित विदर्भात देखील हवामानात बदल दिसू शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी […] - [मावळातील धनगव्हाण गावात श्रीराम नवमी सोहळा उत्साहात ; प्रभू श्रीराम जन्मोत्सव व करंजूआई देवी उत्सव निमित्त हरिनाम सप्ताह संपन्न](https://dainikmaval.com/shri-ram-navami-celebrations-in-full-swing-in-dhangavhan-village-of-maval/): दैनिक मावळ (प्रतिनिधी) : सत्य, संयम आणि मर्यादेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव अर्थात श्रीराम नवमी सोहळा मावळ तालुक्यातील धनगव्हाण गावात अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा झाला. सालाबादप्रमाणे यंदाही गुरुवार (दि. २६ मार्च) रोजी धनगव्हाण येथे रामनवमी उत्सव निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच यंदा गावांतील युवकांच्या पुढाकाराने श्री राम मंदिरावर थ्रीडी नामफलक बसविण्यात आला असून यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखीन भर पडली. श्रीराम जन्मोत्सव आणि करंजूआई देवी उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव धनगव्हाण मावळ येथे पन्नास वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जात आहे. यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त महाराष्ट्रातील नामावंत प्रवचनकार व कीर्तनकार […] - [Ram Navami At Tikona Fort : किल्ले तिकोणा गडावर पारंपारिक पद्धतीने श्री रामनवमी उत्सव साजरा](https://dainikmaval.com/shri-ram-navami-festival-celebrated-in-traditional-manner-at-tikona-fort-maval/): Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागात असलेला, छत्रपती शिवरायांचे शौर्याने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले तिकोणा गडावर गुरुवारी (दि. २६ ) पारंपारिक पद्धतीने, अतिशय उत्साहात प्रभू श्री राम यांचा जन्मोत्सव अर्थात श्री रामनवमी सोहळा संपन्न झाला. श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था, पुणे तसेच सह्याद्री आणि मी या गड संवर्धन करणाऱ्या संस्थांच्या वतीने सदर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी तिकोणापेठ परिसरातील ग्रामस्थांसह विविध भागांतून आलेले शिवभक्त मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सवादरम्यान श्रीरामाचे भजन, श्रीरामाचा पाळणा आणि आरती करून कार्यक्रम साजरा झाला. उपस्थितांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. उत्सवाच्या निमित्ताने गडावरील महाद्वार आणि सर्व मंदिरांची आकर्षक फुलांनी […] - [लोणावळ्यात एक रूपयासाठी तुफान राडा ! पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण ; 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल](https://dainikmaval.com/storm-rages-in-lonavala-for-one-rupee-petrol-pump-office-vandalized-employees-beaten-up-case-registered/): Dainik Maval News : लोणावळा शहरातील एका पेट्रोल पंपावर १ रूपया देण्याच्या क्षुल्लक कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. पेट्रोल भरल्यानंतर सुट्ट्या पैशाच्या वादातून काही तरुणांनी मिळून पंप कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. इतकेच नव्हे तर संतप्त टोळक्याने पंपाच्या कार्यालयाचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी ७ जणांसह इतर अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पेट्रोल पंपावर तरूण पेट्रोल भरण्यासाठी आले होते. पेट्रोल भरून झाल्यानंतर बिल देताना केवळ ‘एक रुपया’ कमी असल्याच्या कारणावरून कर्मचारी आणि त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. सुरुवातीला हा वाद शाब्दिक होता, […] - [मावळ तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का ! संख्याबळ असूनही बाजार समितीच्या सभापती पदी भाजपच्या सदस्याची बहुमताने निवड](https://dainikmaval.com/bjp-subhash-jadhav-elected-as-chairman-of-maval-taluka-agricultural-produce-market-committee-ncp-shocked/): Dainik Maval News : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत ( दि. २५ मार्च ) भाजपाचे सुभाषराव जाधव यांनी चार मतांनी अनपेक्षित विजय मिळवत राष्ट्रवादीला धक्का दिला. तर, उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे विलास मानकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळ बाजार समितीचे मावळते सभापती संभाजी शिंदे व उपसभापती नामदेव शेलार यांनी नुकतेच त्यांच्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या सभापती, उपसभापती पदासाठी सहायक निबंधक सर्जेराव कांदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ येथील सहायक निबंधक कार्यालयात बुधवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे विक्रम कलवडे तर भाजपाचे सुभाषराव जाधव यांनी अर्ज दाखल केले होते. उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीचे विलास […] - [द्रुतगती मार्गावरील ३० तासांच्या वाहतूक कोंडीची समितीकडून चौकशी सुरू ; मुंबई-पुणे मिसिंग लिंक मे महिन्यात खुला करण्याचे नियोजन](https://dainikmaval.com/planning-to-avoid-incidents-like-traffic-jams-on-mumbai-pune-expressway-said-minister-dadaji-bhuse/): Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीच्या घटनेनंतर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस नियोजन सुरू आहे, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली. नियम २९३ अंतर्गत उपस्थित झालेल्या प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना मंत्री दादाजी भुसे बोलत होते. मंत्री दादाजी भुसे म्हणाले, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर ३ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्वलनशील प्रोपिलीन वायू वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात होऊन गॅस गळती झाल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक वळवावी लागली. मुंबईकडे जाणारी वाहतूक राष्ट्रीय महामार्ग ४८ मार्गे वळवण्यात आली होती. या काळात प्रवाशांना माहिती देण्यासाठी प्रसारमाध्यमे, एफएम रेडिओ आणि इतर यंत्रणांचा वापर करण्यात आला. […] - [शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते तपासा ! मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण](https://dainikmaval.com/cm-and-both-deputy-chief-ministers-distributed-eighth-installment-of-shetkari-mahasamman-nidhi-yojana/): Dainik Maval News : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आठव्या हप्त्यापोटी एकूण ८९,७५,२९८ शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण १७९८.७८ कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट लाभ हस्तांतरण द्वारे वितरित करण्यात आले. विधान भवन, मुंबई येथे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा आठवा हप्ता वितरण समारंभ झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आठव्या हप्त्यात जिल्हानिहाय रक्कम वितरित करण्यात आली असून, […] - [पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे ? RTO कडून एप्रिल महिन्याचे वेळापत्रक जाहीर - पाहा आवश्यक कागदपत्रे](https://dainikmaval.com/pimpri-chinchwad-rto-monthly-visit-time-table-april-2026-read-in-details/): Dainik Maval News : एप्रिल २०२६ मध्ये पक्की अनुज्ञप्ती ( पक्के ड्रायव्हिंग लायसन्स ) मिळण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे. पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी ६, ७ आणि ८ एप्रिल २०२६ रोजी खेड, १५, १६ आणि १७ एप्रिल रोजी मंचर, २०, २१ आणि २२ एप्रिल रोजी जुन्नर, २४, २७ आणि २८ एप्रिल रोजी वडगाव मावळ आणि २९ आणि ३० एप्रिल २०२६ रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी ३१ मार्च २०२६ रोजी स. ६ […] - [Dr Jaysingrao Pawar Passes Away : इतिहास संशोधनातील दीपस्तंभ हरपला ! ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन](https://dainikmaval.com/a-beacon-of-historical-research-has-been-lost-senior-historian-dr-jaysingrao-pawar-passes-away/): Dainik Maval News : ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज ( दि. २६ मार्च ) निधन झाले. मागील दीड महिन्यांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, आज (गुरुवार, दि. 26 मार्च) रोजी सकाळी त्यांचे कार्डियॅक अरेस्टमुळे निधन झाले. डॉ. जयसिंगराव पवार यांनी शिवाजी विद्यापीठातून एम.ए आणि पीएच.डी पदवी संपादन केल्यावर तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयांमध्ये त्यांनी अध्यापन केले. त्यांनी महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी अनेक पुस्तके लिहिली. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयसिंगराव यांच्या संशोधन कारकिर्दीला 1964 मध्ये सुरुवात झाली. शिवाजी विद्यापीठातील […] - [मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक](https://dainikmaval.com/pi-of-vadgaon-maval-and-kamshet-police-stations-changed-see-who-are-new-police-inspectors/): Dainik Maval News : पुणे ग्रामीण पोलीस दलातील लोणावळा उपविभागातील कामशेत आणि वडगाव मावळ या दोन्ही पोलीस ठाण्याचे पीआय अर्थात पोलीस निरिक्षक यांची बदली झाली आहे. मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव मावळ पोलीस स्टेशन च्या पोलीस निरीक्षक पदी शंकर पाटील यांची, तर कामशेत शहर पोलीस स्टेशन च्या पोलीस निरीक्षक पदी आकाश पवार यांची नियुक्ती करण्यात आली. दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांचा पदभार स्वीकारला आहे. दरम्यानचे वडगाव मावळ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांची सांगली जिल्ह्यात बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी कामशेत ठाण्याचे पीआय शंकर पाटील यांची नियुक्ती झाली. दुसरीकडे कामशेत पोलीस स्टेशनच्या रिक्त जागेवर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातून […] - ['आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाही ; शाळांची प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येईल'](https://dainikmaval.com/under-rte-money-will-not-be-taken-from-students-in-the-name-of-literature-minister-of-school-education/): Dainik Maval News : मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 (आरटीई) अंतर्गत खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते. मात्र, कोणत्याही शाळेला आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा साहित्याच्या नावाखाली पैसे घेण्यास परवानगी नाही, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभेत सदस्य योगेश सागर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री भुसे म्हणाले की, सध्या राज्य पातळीवर सुमारे 2900 कोटींची प्रतिपूर्ती बाकी आहे. तथापि, कोणत्याही शाळेला आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा साहित्याच्या नावाखाली पैसे घेण्यास परवानगी नाही, […] - [‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण](https://dainikmaval.com/new-rajmata-jijau-bus-service-in-st-corporation-fleet-was-inaugurated-by-cm-and-both-deputy-chief-ministers/): Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ‘राजमाता जिजाऊ’ या बस सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नव्या बस सेवेची आजपासून सुरुवात करण्यात आली. विधानभवन प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, दोन्ही विधामंडळाचे सदस्य, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर, अशोक लेलँडचे वरिष्ठ व्यवस्थापक जॉन मॅथ्यू, टाटा मोटर्सचे ग्लोबल हेड सुशांत नाईक आदी उपस्थित होते. ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवा ‘राजमाता […] - [मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय](https://dainikmaval.com/approval-for-talegaon-to-chakan-4-lane-elevated-highway-decision-taken-meeting-held-in-the-presence-of-cm-fadanvis/): Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे येथे निश्चितच औद्योगिक विकासास मदत होणार आहे. पुणे शहर परिसराची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी महामार्गाची कामे होणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यातील दळणवळण अधिक सुलभ होण्यासाठी महामार्गाचे जाळे विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण क्रमांक ५४८ डी राष्ट्रीय महामार्गावरील ० ते २६ किलोमीटर दरम्यान ४ पदरी उन्नत आणि ४ पदरी जमिनीस समांतर महामार्गासह याच महामार्गावर चाकण ते शिक्रापूर दरम्यान पुढे २६ ते ४३ किलोमीटर लांबीमध्ये ४ पदरी जमिनीस समांतर महामार्गाची डीएफबीओटी (डिझाईन, फायनान्स, बिल्ट, ऑपरेट ॲन्ड ट्रान्सफर) पद्धतीने सुधारणा करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […] - [Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू - वाचा नियमावली](https://dainikmaval.com/prohibitory-orders-imposed-in-backdrop-of-chaitri-yatra-festival-of-ekvira-devi-karla/): Dainik Maval News : पुणे ग्रामीण घटकातील मावळ तालुक्यामधील लोणावळा ग्रामीण पोलीस हद्दीतील मौजे वेहेरेगावी येथे होणाऱ्या श्री एकविरा देवीची चैत्री यात्रा उत्सव २०२६ च्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ खाली २६ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्गमित केले आहे. या कालावधीत शोभेची दारु, फटाके गडावर नेणे, गडावर फटाके वाजविणे, वाद्ये, ढोल, ताशे वाजविणे तसेच गडावर नेण्यास मनाई करण्यात येत आहे. एकाच प्रकार व रंगाची कपडे, वेशभुषा परिधान करणे, विशेषतः टी शर्ट वापरणे, कोंबडे, बकरी, पशु, पक्षी यांचा बळी न देणे […] - [स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक](https://dainikmaval.com/man-from-talegaon-was-cheated-of-rs-11-lakh-online-under-pretext-of-investing-in-the-stock-market/): Dainik Maval News : स्टॉक मार्केट चे प्रशिक्षण आणि गुंतवणुकीच्या नावाखाली तळेगाव दाभाडे येथील एकाची ११ लाख २० हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ ते १७ मार्च २०२६ दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी विजय चंद्रकांत शहाणे (वय ५८ वर्षे, व्यवसाय नोकरी, राह. शहा कॉलनी, पैसा फंड जवळ, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौस्तुभ टांकसाळे, शुभंकर शर्मा, ब्रेकर धीरज अग्रवाल (पत्ता माहीत नाही) अशी […] - [पवनानगर बाजारपेठेत वाहतूक कोंडीचा त्रास ; पोलिसांकडून ४४ वाहनांवर जॅमर लावून दंडात्मक कारवाई](https://dainikmaval.com/traffic-congestion-in-pawananagar-market-police-impose-punitive-action-by-installing-jammers-on-44-vehicles/): Dainik Maval News : पवन मावळातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पवनानगर येथे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. यामध्ये केवळ तीन दिवसांत ४४ वाहनांवर जॅमर लावून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पवनानगर ही पवन मावळातील ४० गावांची मुख्य बाजारपेठ असून येथे शासकीय रुग्णालय, बँका, शाळा, महाविद्यालये यांसारख्या महत्त्वाच्या संस्था आहेत. त्यामुळे येथे कायमच मोठी वर्दळ असते. मात्र, वाहनचालकांकडून रस्त्यावर कुठेही पार्किंग केल्यामुळे चौकात तासनतास वाहतूक कोंडी होत होती. तुंग, तिकोणा, लोहगड, विसापूर आणि बेडसे लेणी यांसारख्या पर्यटन स्थळांकडे जाणारा हा मुख्य मार्ग असल्याने शनिवार-रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी होते. यामुळे वाहतुकीचा ताण आणखी वाढत […] - [वृक्षमित्र म्हणून प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत मावळमध्ये विशेष वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न](https://dainikmaval.com/special-tree-plantation-program-held-in-maval-in-presence-of-actor-sayaji-shinde/): Dainik Maval News : पोस्को आय.पी.पी.सी. आणि सह्याद्री देवराई संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, रविवारी (दि. २२) मावळ तालुक्यात ‘जमिनीच्या पुनरुज्जीवनासाठी’ विशेष वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, आमदार सुनील शेळके यांच्या सह पुण्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, धनंजय शेंडवाडे, डॉ. ज्ञानदेव घोरपडे, गजानन येवले, प्रकाश शिंदे, नेहा वाकचौरे, अमोल बुडखले, महेश महाजन आणि अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित होते. पर्यावरणाचे रक्षण आणि निसर्गाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने राबवण्यात येत असलेल्या या कौतुकास्पद सामाजिक उपक्रमाबद्दल आमदार शेळके यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले. तसेच, वृक्षारोपणासारख्या शाश्वत उपक्रमांमुळे जमिनीचा पोत सुधारण्यास आणि हरित क्षेत्र वाढवण्यास मोठी मदत होणार असून, अशा […] - [मतदारयादी होणार अचूक आणि पारदर्शक : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मावळ विधानसभा मतदारसंघात 'विशेष पुनरीक्षण कार्यक्रम'](https://dainikmaval.com/voter-list-will-be-accurate-and-transparent-special-revision-program-in-maval-assembly-constituency/): Dainik Maval News : भारतीय निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार मावळ विधानसभा मतदारसंघात ‘विशेष पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) २०२६’ राबविण्यात येत असून, या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंगळवारी (दि. २४ मार्च २०२६) रोजी दुपारी ३:३० वाजता शासकीय विश्रामगृह, वडगाव मावळ येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भात सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार विक्रम देशमुख यांनी अधिकृत आदेश जारी करत तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. मतदार यादी होणार अधिक अचूक व पारदर्शक या विशेष पुनरीक्षण मोहिमेत मतदार यादीतील त्रुटी दूर करून ती अधिक विश्वासार्ह करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी पुढील उपाययोजना राबविण्यात येणार […] - [एकविरा देवीच्या यात्रेला जाणार असाल तर आधी ही बातमी वाचा ; देवीच्या चैत्री यात्रा उत्सवानिमित्त वाहतूकीत मोठे बदल](https://dainikmaval.com/if-you-are-going-to-visit-ekvira-devi-read-this-news-first-major-changes-in-transportation/): Dainik Maval News : पुणे ग्रामीण घटकातील मावळ तालुक्यात लोणावळा शहराजवळील मौजे वेहेरेगावी येथे होणाऱ्या श्री एकविरा देवीची चैत्री यात्रा उत्सव-२०२६ च्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २६ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्गमित केले आहे. त्यानुसार, कार्ला फाटाकडून एकविरा पायथा मंदिराकडे जाणारी वाहतुकीस मनाई करण्यात येत असून कार्ला फाटा ते एकविरा पायथा मंदिर येथे जाणारी वाहने अग्रसेन हॉटेल वाहनतळ, लाजवंती महाविद्यालय वाहनतळ, दुर्गा परमेश्वरी वाहनतळ येथे लावण्यात यावी. दिनांक २५ मार्चच्या मध्यरात्री 00.00 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जुना पुणे मुंबई महामार्गावरील वडगाव फाटा ते […] - [चिठ्ठीद्वारे ठरणार सभापती व उपसभापती ! मावळ बाजार समितीचा आगळावेगळा फॉर्म्युला ; ३ महिन्यांचा सभापती, ६ महिन्यांचा उपसभापती](https://dainikmaval.com/chairman-deputy-chairman-to-be-elected-by-ballot-maval-market-committee-unique-formula/): दैनिक मावळ (प्रतिनिधी) : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी (दि. २५ मार्च) रोजी होत आहे. सभापती व उपसभापती पदासाठी संचालक मंडळातील एकूण १३ जण इच्छुक आहेत. तर समितीच्या अस्तित्वात असलेल्या संचालक मंडळाचा केवळ दोन वर्ष कार्यकाळ बाकी आहे. त्यामुळे कमी कालावधीत सर्व इच्छुकांना संधी देण्यासाठी सदस्यांनी एकमत करत लॉटरी पद्धतीने सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. यामध्ये सभापती पदासाठी तीन तर उपसभापती पदासाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. शिल्लक राहिलेला २४ महिन्यांचा काळ सर्वांनी वाटून घेऊन निवडणूका बिनविरोध कराव्यात त्यासाठी चिठ्ठी पद्धतीचा वापर करून दोन्ही […] - [मावळातील कान्हे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालयात संसाधनांचा अभाव ? रुग्णांना दर्जेदार व वेळेत उपचार मिळत नसल्याची परिस्थिती](https://dainikmaval.com/lack-of-facilities-at-new-sub-district-hospital-in-kanhe-maval-patients-are-not-getting-quality-and-timely-treatment/): दैनिक मावळ (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यातील कान्हे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालय मध्ये मूलभूत आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचे समोर आले आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या इमारतीत परिसरातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र याठिकाणी इमारत जरी नवीन असली तरीही सुविधा मात्र जुन्याच रुग्णालयातील असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळत नसल्याची तक्रार इथे येणारे नागरिक, रुग्ण यांच्याकडून होत आहे. रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असून उपलब्ध डॉक्टरांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. कमी संख्येने नर्सेस, कर्मचारी यामुळे अनेक रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडे किंवा […] - [प्रतिबंधित मांसाची वाहतूक होत असल्याच्या संशयातून गोरक्षकांनी कंटेनर पकडला ; वडगाव मावळ पोलिसांकडून तपास सुरू](https://dainikmaval.com/gorakshak-seize-container-on-suspicion-of-transporting-banned-meat-investigation-underway-by-vadgaon-maval-police/): दैनिक मावळ (प्रतिनिधी) : वाहतुकीस प्रतिबंधित व निषिद्ध असलेले मांस वाहतूक करून नेत असल्याच्या संशयातून एक कंटेनर (क्रमांक NL 01 AK 5884) गोरक्षकांनी पकडला व पोलिसांच्या स्वाधीन केला. उर्से येथे शनिवारी (दि. 21) हा कंटेनर पकडण्यात आला. गोरक्षकांनी हा कंटेनर वडगाव मावळ पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. वडगाव मावळ पोलीस याप्रकरणी आता अधिक तपास करत आहे. सदर कंटेनरमध्ये गोमांस असल्याचा संशय गोरक्षकांना आहे. तसा तक्रार अर्ज वडगाव मावळ पोलिसांकडे प्राप्त झाला आहे. तर सदर कंटेनर मधून मांस वाहतूक होत असले तरीही ते निषिद्ध व प्रतिबंधित असे नसून कायदेशीर परवाना सहित ही वाहतूक होत असल्याचे संबंधित कंटेनरच्या चालकाने व मांस ज्या कंपनीचे […] - [तळेगावमधील श्री डोळसनाथ महाराज यात्रेत दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश । Talegaon Dabhade Crime](https://dainikmaval.com/gang-of-jewel-thieves-busted-during-shri-dolasnath-maharaj-yatra-in-talegaon-dabhade-crime/): Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील श्री डोळसनाथ महाराज यात्रेमध्ये गर्दीचा गैर फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा तळेगाव दाभाडे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करीत तीन महिला आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या तळेगावमध्ये यात्रेसाठी आल्या होत्या. श्री डोळसनाथ महाराज मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी असताना, आरोपी महिलांनी संगनमत करून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. फिर्यादीने आपले दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. फिर्यादीकडून मिळालेल्या वर्णनानुसार पोलिसांनी यात्रा परिसरात शोधमोहीम राबवली. संशयास्पद हालचाली करणाऱ्या तीन महिलांना […] - [मोठी बातमी ! लोणावळा जवळील हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, २२ जणांवर गुन्हा दाखल, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त](https://dainikmaval.com/police-raid-high-profile-gambling-den-near-lonavala-22-people-booked-property-worth-rs-50-lakh-seized/): Dainik Maval News : लोणावळा शहराजवळील कुणेनामा परिसरातील एका बंगल्यात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर लोणावळा शहर पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली. या कारवाईत रोख रक्कम, महागडे मोबाईल आणि अलिशान गाड्यांसह एकूण ४९ लाख ६४ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बंगल्याचा मालक आणि जुगार खेळणाऱ्यांसह एकूण २२ जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ मार्च २०२६ रोजी पहाटे ४:४० वाजण्याच्या सुमारास कुणेनामा (ता. मावळ) येथील एका बंगल्यात ही धडक कारवाई करण्यात आली. करण पाटील या इसमाने हा बंगला मालक हनुमंत एकनाथ थोरबोले (रा. आर के. हॉटेल शेजारी, वरसोली टोलनाका, ता. मावळ) याच्याकडून ६० […] - [यंदाचा गुढीपाडवा ठरला ऐतिहासिक ! आई एकविरा देवीच्या मंदिराचा चोरीला गेलेला कळस तब्बल ८ वर्षांनी मिळाला परत](https://dainikmaval.com/gudi-padwa-day-became-historic-stolen-spire-of-temple-of-goddess-ekvira-devi-was-recovered-after-8-years/): Dainik Maval News : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई एकवीरा देवीच्या मंदिरात तब्बल आठ वर्षांनंतर एक ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण पाहायला मिळाला. ८ वर्षांपूर्वी चोरीला गेलेला मंदिराचा कळस गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर, गुरुवारी (१९ मार्च २०२६) कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा मंदिरात आणण्यात आला आहे. यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सुमारे आठ वर्षांपूर्वी काही चोरट्यांनी एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस चोरून नेला होता. त्यानंतर पोलिसांच्या तपासात हा कळस हस्तगत करण्यात यश आले होते; मात्र कायदेशीर कचाट्यामुळे तो गेली आठ वर्षे पोलीस कस्टडीतच अडकून पडला होता. श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक आण्णा निवृत्ती […] - ['पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पवना प्रकल्पातून 520 एमएलडी आणि आंद्रा प्रकल्पातून 100 एमएलडी पाण्याचे नियोजन'](https://dainikmaval.com/planning-of-520-mld-of-water-from-pawana-dam-100-mld-of-water-from-andhra-for-pimpri-chinchwad-city/): Dainik Maval News : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील मेट्रो प्रकल्प, रस्ते विकास, पाणीपुरवठा आणि नदी शुद्धीकरणाची कामे गतीने पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी सदस्य शशिकांत शिंदे आणि सचिन अहिर यांनी चर्चेत सहभाग घेतला. मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला असून पिंपरी-चिंचवड ते निगडी या मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. हे काम जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत. शिवाजीनगर ते हिंजवडी (माण) या मेट्रो लाईन-३ प्रकल्पाची […] - [आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा शासनाचा निर्णय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस](https://dainikmaval.com/government-decision-to-convert-agricultural-class-2-lands-to-class-1-cm-devendra-fadnavis/): Dainik Maval News : आराजी असलेल्या शेत जमिनीबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी आराजी असलेली वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली. सदस्य सचिन अहिर यांनी या विषयी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मौजा भिवी ( ता. भिवापूर जि.नागपूर) येथील सर्वोदय सहकारी सामुदायिक शेती सोसायटीच्या नावावर असलेल्या आराजी जमिनीचे वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरण व्यवहार प्रकरण २०२२ मध्ये घडले. या प्रकरणाची तक्रार २०२५ मध्ये करण्यात आली. तक्रारीनुसार या व्यवहाराची चौकशी करण्यात येत असून […] - [महसूल विभागात मोठा गैरप्रकार ! हजारो शेतकऱ्यांचे सातबारे बदलले ? महसूल कायद्याच्या कलम १५५ चा गैरवापर झाल्याची सरकारची कबुली](https://dainikmaval.com/malpractice-in-revenue-department-government-admits-to-misusing-section-155-of-revenue-act/): Dainik Maval News : महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून सर्वसामान्यांच्या जमिनींच्या नोंदीत फेरफार करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने आता कठोर पाऊल उचलले आहे. “दोषी अधिकारी कितीही मोठ्या पदावर असला तरी त्याला सोडले जाणार नाही,” असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिला. पुणे जिल्ह्यात उघडकीस आलेल्या या घोटाळ्याची व्याप्ती पाहता, आता संपूर्ण महाराष्ट्रातील मागील ५ वर्षांतील सर्व फेरफार प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महसूल विभागात कलम १५५ च्या गैरवापरामुळे जमीन नोंदींमध्ये झालेल्या गंभीर अनियमिततेची शासनाने दखल घेतली असून या संदर्भात राज्यात सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल […] - [चाकण चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन ! मुंबई-पुणे मिसिंग लिंक सारखे 4 नवीन मिसिंग लिंक तयार करण्याचे नियोजन](https://dainikmaval.com/mega-plan-to-break-traffic-jam-at-chakan-chowk-plans-to-create-4-new-missing-links-like-mumbai-pune-missing-link/): Dainik Maval News : पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण येथे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) या परिसरात चार मिसिंग लिंक तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी एकूण २६१ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असून या मार्गांमुळे चाकण-तळेगाव चौक, तळेगाव आणि शिक्रापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. सकाळ आणि संध्याकाळ च्या सत्रात चाकण चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये सामान्य प्रवाशांचा तास – दीड तास वाया जातो. अनेकदा या वाहतूक कोंडीमध्ये एमआयडीसीतील कामगारांना अडकून पडावे लागते. आता मात्र पीएमआरडीए च्या या प्रस्तावित मिसिंग लिंक प्रकल्पांमुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाची उपलब्धता असणार आहे, ज्यामुळे इंधन आणि वेळेची द्धा बचत […] - [मोठी बातमी ! सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार](https://dainikmaval.com/secondary-registrar-offices-will-remain-open-even-on-public-holidays/): Dainik Maval News : आर्थिक वर्ष संपत येत असल्याने, तसेच नवीन वर्षानिमित्त मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांना वेग येण्याची शक्यता आणि महसूल वसुलीच्या इष्टांकाची पूर्तता करण्यासाठी राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक विभागाने घेतला आहे. महाराष्ट्राचे नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, २६, २८, २९ आणि ३१ मार्च २०२६ या चार सार्वजनिक तसेच साप्ताहिक सुट्यांच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये कार्यरत राहतील. या कालावधीत कार्यालयांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी तसेच अभिलेख व चुकविलेले मुद्रांक शुल्क वसुली इत्यादी कामे विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी सह जिल्हा निबंधक तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगरसह) कार्यालयेदेखील […] - [देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातील समस्या सोडवण्यासाठी निधी द्या ; खासदार श्रीरंग बारणे यांची संरक्षण विभागाकडे मागणी](https://dainikmaval.com/provide-funds-to-solve-problems-in-dehu-road-cantonment-board-mp-shrirang-barne-demand-to-defense-department/): Dainik Maval News : मावळ लोकसभा मतदारसंघातील देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील विविध विकास कामे निधीअभावी रखडली आहेत. पिण्याचे पाणी, रस्ते, स्वच्छतेचा अभाव आहे. असुविधांनी नागरिक त्रस्त आहेत. त्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्लीत संरक्षण विभागाच्या महानिदेशक शोभा गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खासदार बारणे यांनी महानिदेशक गुप्ता यांची भेट घेऊन देहूरोडमधील रखडलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. मावळ लोकसभा मतदारसंघात देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश आहे. मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, स्ट्रीट लाईट (पथदिवे), पिण्याचे पाणी, प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांची निर्मिती करणे आवश्यक आहे. भविष्यातील पाणी संकट लक्षात घेऊन सद्यस्थितीतील […] - [लोणावळ्यातील प्रमुख रस्ते, नदी सुधार प्रकल्प, गडकिल्ल्यांचा विकास आदी प्रश्नांबाबत आमदार सुनील शेळकेंनी घेतली PMRDA च्या नवीन आयुक्तांची भेट](https://dainikmaval.com/maval-mla-sunil-shelke-met-new-commissioner-of-pmrda-abhijeet-chaudhary/): Dainik Maval News : मावळ मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) नवनियुक्त आयुक्त अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण बैठक घेतली. सदर बैठकीत लोणावळा शहरातील मुख्य रस्ता, स्कायवॉककडे जाणारा रस्ता तसेच देहूफाटा ते येलवाडी या मार्गांवरील रखडलेल्या कामांबाबत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. ही कामे तातडीने पूर्ण करण्याची आग्रही मागणी आमदार शेळके यांनी केली. याशिवाय मावळ तालुक्यातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी अद्याप कन्सल्टंट नेमणूक न झाल्याने कामे रखडली असल्याची बाबही आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या संदर्भात त्वरित कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तसेच ‘इंद्रायणी व पवना नदी सुधार प्रकल्पा’अंतर्गत असलेली […] - [सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक](https://dainikmaval.com/lost-gold-chain-found-based-on-cctv-footage-and-digital-transactions-vadgaon-maval-police/): Dainik Maval News : बाजारपेठेत रस्त्याने जाताना हरवलेली अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या आधारे शोधून काढत वडगाव मावळ पोलिसांनी काही तासांत संबंधित महिलेला पुन्हा मिळवून दिली. वडगाव मावळ पोलिसांच्या या कार्यकुशलतेचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. पौड (ता. मुळशी) येथील परमेश्वर पांडुरंग पवार (वय 35 रा. पौड, ता. मुळशी) हे आपल्या पत्नीसह वडगाव मावळ येथे नातेवाईकांकडे आले होते. खरेदीसाठी दोघे वडगाव बाजारात गेले असताना येथील पोटोबा महाराज मंदिर परिसरात त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची चैन हरवली. ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ वडगाव मावळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक […] - [गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा... भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू](https://dainikmaval.com/the-last-sunrise-seen-in-lonavala-on-gudi-padwa-three-youths-die-in-a-horrific-car-accident/): Dainik Maval News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात आयआयटी मुंबईच्या 3 तरुण विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मुंबईहून लोणावळ्यात आल्यानंतर लोणावळ्यात सुर्योदय पाहिल्यावर हे विद्यार्थी पुन्हा मुंबईला परतत होते. एका कारमधून हे विद्यार्थी प्रवास करीत होते. द्रुतगती मार्गावर ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांची कार एका कंटेनरच्या मागच्या बाजूला प्रचंड वेगाने धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारने रस्त्यावर अनेक कोलांटउड्या खाल्या आणि गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ओमकुमार नितीन बोरसे हा विद्यार्थी कार चालवत होता. मध्यम मार्गिकेतून गाडी चालवत असताना डाव्या बाजूच्या स्लो लेनमधील कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना हा अपघात घडला. एका […] - [पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील](https://dainikmaval.com/pune-zilla-parishad-virdhaval-jagdale-as-president-vivek-walse-patil-as-vice-president/): Dainik Maval News : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे आणि उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक जिल्हा परिषद यांनी जाहीर केले. जिल्हा परिषदेच्या पाचव्या मजल्यावरील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित जिल्हा परिषदेची विशेष सभा आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूकीच्यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख-मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, भुषण जोशी, जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, पंचायत समितीचे सभापती आदी उपस्थित उपस्थित […] - [Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश](https://dainikmaval.com/shiva-devotees-send-message-of-fort-conservation-by-erecting-gudhi-at-tikona-fort-maval/): Dainik Maval News : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला आणि मराठी हिंदू नववर्षाचा (चैत्र शुक्ल प्रतिपदा) पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा सण. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकजण घराच्या दारात विजयाचे प्रतीक म्हणून बांबूवर रेशमी वस्त्र, कडुलिंब, साखरेच्या गाठी आणि तांब्याचा कलश लावून ‘गुढी’ उभारत असतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि त्यांच्या शौर्याचे – विजयाचे प्रतिक असलेले गडकोट हेही सर्वांसाठी तितकेच पुजनीय असून गडकोटांवर देखील अनेक शिवभक्तांकडून गुढीपाडवा साजरा केला जातो. गुरूवारी (दि.१९) गुढीपाडवा निमित्त मावळ तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले तिकोणा गडावर शिवभक्तांनी अत्यंत उत्साहात गुढीपाडवा सण साजरा केला. पारंपारिक पद्धतीने गडावर गुढी उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत केले. “आधी गुढी गडावर नंतर आमच्या […] - [परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार - गृह राज्यमंत्री](https://dainikmaval.com/if-liquor-is-found-in-hotels-restaurants-without-permission-licenses-will-be-cancelled/): Dainik Maval News : परवानगीशिवाय हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास संबंधितांचे परवाने रद्द करण्यात येतील. अशी घटना ज्या क्षेत्रामध्ये घडेल त्या क्षेत्रातील पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य दादाराव केचे यांनी आर्वी (जि.वर्धा) तालुक्यातील हॉटेलमधील अवैध व्यवसायाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे यांनीही सहभाग घेतला. गृह राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, आर्वी (जि.वर्धा) तालुक्यातील हॉटेलमधील अवैध व्यवसाय तक्रारींच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्यात आली असून कोणताही गैरप्रकार आढळला नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तरीही लोकप्रतिनिधींच्या सूचनांची पुन्हा दखल घेत […] - [पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन](https://dainikmaval.com/crop-inspection-deadline-extended-till-31st-march-2026-said-revenue-minister-chandrashekhar-bawankule/): Dainik Maval News : राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, पीक कर्ज तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळताना कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी पीक पाहणीची प्रक्रिया १०० टक्के पूर्ण होणे आवश्यक असल्याने पीक पाहणीसाठी मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. विधानपरिषदेत निवेदन करताना त्यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना स्वतःची पीक माहिती ऑनलाईन अपलोड करावी लागत होती; मात्र विविध कारणांमुळे ही प्रक्रिया काही ठिकाणी पूर्ण होऊ शकली नाही. याबाबत सभागृहात तसेच खालच्या सभागृहात सदस्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शासनाने खरीप हंगामासाठी पीक पाहणीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्याचा निर्णय […] - [तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार - सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक](https://dainikmaval.com/work-of-talegaon-chakan-shikrapur-road-will-be-completed-by-december-2026/): Dainik Maval News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्ती व विस्ताराच्या कामासाठी राज्य शासनाने ५९.७५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य योगेश टिळेकर यांनी या रस्त्याच्या कामासंदर्भात विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले, तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा राष्ट्रीय महामार्ग ५४८- डी (रा. मा. ५५) कि.मी. ०/०० ते कि.मी. ५३/२०० हा रस्ता रांजणगाव, चाकण, तळेगाव व मुंबई एमआयडीसीतील प्रवासी व औद्योगिक वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व अवजड व स्थानिक वाहतूक या लांबीमधून होत असते. एमएसआयडीसी या महामंडळामार्फत तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गही […] - [Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी](https://dainikmaval.com/preparations-are-in-full-swing-for-chaitri-yatra-in-temple-premises-of-aai-ekvira-devi-in-karla-maval/): Dainik Maval News : महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या लोणावळा शहरालगतच्या कार्ला वेहेरगावच्या डोंगरात वसलेल्या आई एकवीरा देवीच्या चैत्री यात्रेला गुढीपाडव्यापासून सुरुवात होणार आहे. चैत्र शुद्ध नवमीपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. आई एकवीरा देवीच्या चैत्र यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. मागील महिनाभरापासून यात्रेच्या नियोजनाची तयारी सुरू आहे. श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून व महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत या ठिकाणी विकास कामे देखील सुरू आहेत. भाविकांच्या सुलभतेसाठी पायऱ्यांच्या रुंदीकरणाचे काम देखील प्रगतीपथावर आहे तसेच गडावरील इतर कामे सुरू आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही कामे तात्पुरती बंद ठेवत यात्रा झाल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यात्रा काळामध्ये आई […] - [श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी](https://dainikmaval.com/change-alignment-of-pune-hyderabad-high-speed-rail-corridor-crossing-bhandara-dongar-mp-shrirang-barne-in-lok-sabha/): Dainik Maval News : पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोर या प्रकल्पाचा मार्ग संत तुकाराम महाराजांचे पवित्र स्थळ असलेल्या भंडारा डोंगराखालून जात आहे. त्यामुळे या मार्गात बदल करावा. धार्मिक भावना व पर्यावरणाचे रक्षण होण्यासाठी रेल्वे मार्गाची अलाईनमेंट बदलवावी. पुणे ते लोणावळा मार्गावर दुपारच्या वेळेत लोकल रेल्वे सुरु करावी. पुणे–लोणावळा तिसरा व चौथा रेल्वे मार्गिकेसाठी राज्य सरकारने ५ हजार १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. केंद्र सरकारनेही यास गती देण्यासह राज्यातील विविध रेल्वेच्या प्रश्नांकडे खासदार श्रीरंग बारणे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. रेल्वेच्या २०१६-२७ च्या अर्थसंकल्पावर शिवसेना पक्षाच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघ तसेच महाराष्ट्राशी संबंधित विविध […] - [मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा](https://dainikmaval.com/stop-destruction-of-maval-nature-local-environmentalists-submit-statement-to-administration-against-power-project/): Dainik Maval News : मावळ तालुक्यातील निसर्गसंपदा आणि जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी, प्रस्तावित शिरोता वनक्षेत्र हद्दीत विज प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी व पर्यावरण मित्रांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. वडगाव येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांना या संदर्भात सविस्तर निवेदन देण्यात आले. “प्रकल्प कायमस्वरूपी रद्द न झाल्यास आमरण उपोषण आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी आणि युवकांनी दिला आहे. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आणि डोंगर उत्खनन होण्याची भीती असून, यामुळे पर्यावरणाचे न भरून निघणारे नुकसान होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे दुर्मिळ प्रजातींच्या अस्तित्वावर गदा येणार आहे. तसेच स्थानिकांना विश्वासात न घेता किंवा त्यांच्या हरकतींकडे दुर्लक्ष करून हा प्रकल्प रेटण्याचा […] - [Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय](https://dainikmaval.com/neither-daund-nor-indapur-will-maval-taluka-get-honor-of-pune-zilla-parishad-president-sunetra-pawar-will-take-decision/): Dainik Maval News : बुधवारी (दि. १८ मार्च) रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आणि उपाध्यक्ष पदाची निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. मागील महिन्यात निकाल लागलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता (७३ पैकी ५१ सदस्य) आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तसेच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हाही राष्ट्रवादीचा होणार, हेही निश्चित आहे. अशात बुधवारी होणाऱ्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून स्व. अजित पवार यांच्या पश्चात पक्षाचे सर्वाधिकार हाती असलेल्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार ह्याच याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. दरम्यान अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती किंवा नावे […] - [मावळ तालुक्यातील गावागावांत शंभूभक्तांकडून 'धर्मवीर बलिदान मास'चे पालन](https://dainikmaval.com/dharmaveer-balidan-mas-observed-by-shambhu-devotees-in-villages-of-maval-taluka/): Dainik Maval News : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतुलनीय बलिदानाच्या स्मृती प्रित्यर्थ मावळ तालुक्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘धर्मवीर बलिदान मास’ अत्यंत श्रद्धापूर्वक व शोकमय वातावरणात पाळला जात आहे. ३० दिवसांचे खडतर व्रत इतिहासात वर्णन केल्याप्रमाणे, संभाजी महाराजांनी सोसलेला अमानुष छळ आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान याचे स्मरण म्हणून फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या यावर्षी १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत हा बलिदान मास पाळला जातो. ह्या ३० दिवसांच्या काळात शंभूभक्त विविध नियमांचे पालन करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने: *अनेक जण महिनाभर पायात चप्पल न घालण्याचा संकल्प करतात. *अनेक जण आपल्या आवडत्या पदार्थांचा त्याग (उदा. गोड पदार्थ, चहा) करतात. […] - [मळवंडी ठुले येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे दिमाखात उद्घाटन](https://dainikmaval.com/the-equestrian-statue-of-chhatrapati-shivaji-maharaj-was-inaugurated-in-malwandi-thule/): Dainik Maval News : मावळ तालुक्यातील मळवंडी ठुले येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ स्मारकाचे रविवारी (दि. १५) अत्यंत उत्साहात आणि ऐतिहासिक वातावरणात उद्घाटन पार पडले. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते स्मारकाचे अनावरण करण्यात आले. राजे छत्रपती शिवराय प्रतिष्ठान, शिवराज ग्रुप यांच्या पुढाकारातून हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्याला पवन मावळ परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात झाली. स्वराज्याच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या किल्ले तिकोणा येथून आणलेली शिवज्योत गावात दाखल होताच संपूर्ण परिसर जय भवानी, जय शिवाजी च्या जयघोषाने दुमदुमून गेला. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात व पारंपरिक वाद्यांच्या निनादात भव्य पालखी सोहळा काढण्यात […] - [आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप](https://dainikmaval.com/caste-certificates-were-distributed-to-95-tribal-citizens-under-adim-seva-abhiyan-at-shilimb-through-mla-sunil-shelke/): Dainik Maval News : आदिवासी समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता यावा, तसेच त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी विविध दाखले मिळविणे सुलभ व्हावे, याकरिता राबविण्यात येत असलेल्या आदिम सेवा अभियान अंतर्गत पवन मावळ विभागातील शिळींब येथे आज (दि. १७) ९५ आदिवासी नागरिकांना मोफत आदिवासी दाखले वाटप करण्यात आले. यामध्ये मौजे शिळींब गाव, चावसर आणि मोरवे येथील आदिवासी समाजातील नागरिकांचा समावेश होता. तसेच याप्रसंगी, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा. उपाध्यक्ष संतोषभाऊ कडू यांच्या माध्यमातून नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत, मावळ पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सुनिता मनोहर येवले, काले […] - [गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना](https://dainikmaval.com/dnyaneshwari-lost-her-life-due-to-mistake-by-tempo-driver-transporting-gas-cylinders-incident-at-somatane-phata-maval/): Dainik Maval News : गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा ‘हँडब्रेक’ लावण्यास चालक विसरल्याने, उतारावर असलेला टेम्पो अचानक मागे सरकला आणि या दुर्घटनेत टेम्पोखाली चिरडून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (१६ मार्च) दुपारी साडेचारच्या सुमारास सोमाटणे फाटा (ता. मावळ) परिसरात घडली. ज्ञानेश्वरी मुऱ्हे (११) असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे फाटा परिसरात गॅस सिलिंडरची वाहतूक करणारा टेम्पो उतारावर उभा करण्यात आला होता. मात्र चालकाने टेम्पोचा ‘हँडब्रेक’ व्यवस्थित लावला नाही. त्यामुळे काही वेळातच टेम्पो अचानक मागे सरकू लागला. त्यावेळी ज्ञानेश्वरी ही परिसरातील इतर मुलांसोबत रस्त्यालगत खेळत होती. टेम्पो अचानक मागे येत असल्याचे लक्षात येण्यापूर्वीच ती […] - [पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी](https://dainikmaval.com/section-27-orders-issued-in-jurisdiction-of-pimpri-chinchwad-police-commissionerate/): Dainik Maval News : चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था राखणेकामी पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात १८ मार्च २०२६ रोजी ००:०१ पासून ते ३१ मार्च २०१६ रोजी २४ वाजेपर्यंत खाली नमूद केलेली कृत्य करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे. कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे. दगड अथवा शस्त्रे किवा अस्खे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे. शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका […] - [स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त वाहतूक बदल](https://dainikmaval.com/traffic-changes-on-occasion-of-death-anniversary-of-dharmaveer-shri-chhatrapati-sambhaji-maharaj/): Dainik Maval News : मौजे वढू बुद्रुक येथे स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. १७ मार्च २०२६ रोजी रात्री १० ते दि. १८ मार्च २०२६ रोजी रात्री १०.०० पर्यंत परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ अन्वये दिले आहेत. कोरेगाव भिमा बाजूकडून चाकण-पाबळकडे जाणारी अवजड वाहतूक कोरेगाव भिमा-सणसवाडी-शिक्रापूर-गॅस फाटा-वाजेवाडी चौफुला मार्गे वळविण्यात येणार आहे. तसेच चाकण-पाबळकडून पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक वाजेवाडी चौफुला-गॅस फाटा-शिक्रापूर-सणसवाडी-कोरेगाव भिमा मार्गे वळविण्यात येईल. कोरेगाव भिमा बाजूकडून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना संस्थेजवळील ठरविण्यात आलेल्या स्टॉपेज पॉईंटच्या पुढे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. […] - [स्व. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर ; 4 मे रोजी मतमोजणी](https://dainikmaval.com/by-elections-announced-for-baramati-assembly-constituency-which-fell-vacant-due-to-death-of-late-ajit-pawar/): Dainik Maval News : भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राहुरी (जि. अहिल्यानगर) आणि बारामती (जि. पुणे) या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामती मतदारसंघाचे आमदार अजित अनंतराव पवार यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी ही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी आवश्यक कार्यक्रम जाहीर केला असून मतदानासाठी सर्व मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) यांचा वापर करण्यात येणार आहे. मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) हा मुख्य पुरावा असेल. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, […] - [फक्त 'ओटीपी'द्वारेच गॅस सिलेंडरचे वितरण होणार ; ९६ तासांत (४ दिवस) घरपोच मिळणार सिलेंडर - जिल्हाधिकारी](https://dainikmaval.com/gas-cylinders-will-be-distributed-only-through-otp-said-district-collector-jitendra-dudy/): Dainik Maval News : घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण केवळ OTP प्रणालीद्वारेच करण्यात येणार असून गॅस बुकिंग केल्यानंतर ९६ तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक राहील, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील सर्व तेल कंपन्या व गॅस एजन्सींच्या प्रतिनिधींना घरगुती गॅस सिलेंडर वितरणाबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीत घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा केवळ OTP प्रणालीद्वारेच करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच गोदाम, गॅस एजन्सी किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट गॅस सिलेंडरचे वितरण पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना तेल कंपन्या व वितरकांना देण्यात आल्या. त्याअनुषंगाने सर्व गॅस एजन्सींनी त्यांच्या गोदाम किंवा कार्यालयाबाहेर […] - [अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाक्या भरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे आदेश](https://dainikmaval.com/pimpri-chinchwad-police-commissioner-orders-action-against-those-illegally-filling-commercial-gas-tanks/): Dainik Maval News : आखाती देशात सध्या चालु असलेल्या युध्दाच्या पार्श्वभुमीवर घरगुती गॅसची टंचाई निर्माण होवू नये यासाठी घरगुती गॅस सिलेंडर मधुन अवैधरित्या व्यवसायिक (कमर्शियल) गॅस सिलेंडरमध्ये गॅस रिफीलिंगला प्रतिबंध करण्यासाठी कायदेशीर कारवाईचे आदेश पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी त्यांचे अधिपत्याखालील पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. याअनुषंगाने असे गैर प्रकार आढळून आल्यास पोलिसांकडुन सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या अनुषंगाने सर्व नागरिकांना पोलीस आयुक्त यांनी आवाहन केले आहे की, घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलेंडर भरण्याचे कोणतेही अवैध प्रकार आढळून आल्यास तात्काळ पिंपरी चिंचवड नियंत्रण कक्ष फोन नंबर ०२० […] - [देहूरोड कॅन्टोन्मेंटमधील नागरी सुविधांच्या प्रश्नावर केंद्राकडे पाठपुरावा सुरू ; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती](https://dainikmaval.com/minister-madhuri-misal-mla-sunil-shelke-regarding-issues-within-dehu-road-cantonment-board-area/): Dainik Maval News : देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसरातील लोकसंख्या सध्या ६० हजारांपेक्षा अधिक झाली आहे. मात्र केंद्राकडून मिळणाऱ्या मर्यादित निधीतून सर्व नागरी सुविधा उपलब्ध करणे शक्य होत नाही. राज्य शासनाकडून निधी उपलब्ध असला तरी प्रत्येक विकासकामासाठी केंद्र शासनाची परवानगी आवश्यक आहे. नागरी भागातील विकासकामांसाठी ही अट शिथिल करावी, असा प्रस्तावही केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रश्नाबाबत राज्य शासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असून मुख्यमंत्री स्तरावरही केंद्राशी चर्चा करण्यात येत आहे, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत सांगितले. पुणे जिल्ह्यातील देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड आर्थिक संकटात असल्याने पाणी, स्वच्छता, रस्ते यासारख्या मूलभूत सुविधांवर परिणाम झाला आहे. तसेच विकासकामांना ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने […] - [ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाही, तिथे विशेष मोहीम राबवून जागा उपलब्ध करून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना](https://dainikmaval.com/collectors-instructed-to-launch-special-campaign-to-provide-space-in-villages-where-there-is-no-space-for-cemetery/): Dainik Maval News : राज्यातील ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही, त्या गावांमध्ये विशेष मोहीम राबवून स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील स्मशानभूमी संदर्भातील प्रश्न लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बोलत होते. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य अमित गोरखे, किशोर दराडे आणि योगेश टिळेकर यांनी सहभाग घेतला. ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले की, ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जमीन उपलब्ध नाही, त्या गावांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून शासकीय किंवा ग्रामपंचायतीची जमीन […] - [राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी](https://dainikmaval.com/demand-to-speed-up-third-and-fourth-tracks-of-pune-lonavala-railway-after-substantial-provisions-in-budget/): Dainik Maval News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी 5100 कोटी रुपयांची तरतूद केल्यानंतर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. राज्य शासनाने निधीची तरतूद केल्याने आता रेल्वे मंत्रालयाने ट्रॅक निर्माणाच्या कामाला गती देण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली. दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खासदार बारणे यांनी भेट घेतली. पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसरा आणि चौथ्या ट्रॅकचा गरज त्यांना समजावू सांगितली. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे उपस्थित होते. खासदार बारणे म्हणाले, पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा सुरु आहे. याचा दररोज एक ते सव्वा […] - [गुडन्यूज ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित, महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटींचे वितरण](https://dainikmaval.com/22nd-installment-of-pradhan-mantri-kisan-samman-nidhi-distributed/): Dainik maval News : सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खत आणि इतर शेतीसंबंधित खर्च भागविण्यास मदत होत आहे असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. गुवाहाटी येथील समारंभात “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी” चा २२ वा हप्त्याचे डीबीटी हस्तांतरण प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. या कार्यक्रमाद्वारे देशभरातील सुमारे ९.३२ कोटी शेतकरी कुटुंबांच्या खात्यात १८,६४० कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट डीबीटी पद्धतीने जमा करण्यात आली. प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात २,००० […] - [राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता](https://dainikmaval.com/thunderstorms-likely-in-the-state-between-march-17-and-20/): Dainik Maval News : दिनांक १७ ते २० मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्याच्या अंदाजानुसार १८ ते २० मार्च दरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके […] ## Pages - [Video](https://dainikmaval.com/video/) - [Ownership & Funding Info](https://dainikmaval.com/ownership-funding-info/): Dainik Maval (www.dainikmaval.com) is an independent digital journalism initiative and is under Dainik Maval Company registered in India. Dainik Maval is a reliable and trusted name in the field of Journalism. Our Work Station and News Room are composed of reporters, sub-editors and videographers. We have a separate team for Start-Up stories and the Finance sector. We have partnerships with a number of advertising providers for display ads throughout our website to meet the expenditures of the Company. Dainik Maval is a privately owned company incorporated under the Companies act. Revenue Model: We have a self-sustained, bootstrapped and advertising-based revenue model […] - [Contact us](https://dainikmaval.com/contact-us/): If you need to contact us or want to contribute to dainikmaval.com you can mail us at: dainikmaval [@] gmail.com - [Fact-Checking Policy](https://dainikmaval.com/fact-checking-policy/): Dainik Maval (hereinafter referred to as “We” / “Us” / “Our”) would like to inform you about the care and caution that We take in order to ensure due accuracy of Our content, which is addressed by Our Fact-Checking Policy. Due accuracy in all Our content For any journalistic platform, trust of its audience is the most important aspect. Trust can only be gained and sustained on the basis of accurate, fair and balanced reporting. It is essential that We remain committed to attaining due accuracy in all Our content to the extent possible. Our understanding of ‘due accuracy’ is […] - [Home](https://dainikmaval.com/): edit post लोकल ‘पीएमपीएल’कडून वडगाव मावळ ते कात्रज थेट बससेवा बंद! प्रवाशी, नोकरदार, विद्यार्थ्यांचे हाल; बससेवा पुर्ववत करण्याची मागणी by Vishal KumbharOctober 12, 2023 edit post पुणे इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राज्याकडून केंद्राला सादर; प्रकल्पासाठी 577 कोटींचा खर्च अपेक्षित, 54 गावांमध्ये होणार काम by Vishal KumbharOctober 12, 2023 edit post मावळकट्टा अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार! निष्ठावंतांना संधी मिळणार! – मावळ राष्ट्रवादी काँग्रेस by Vishal KumbharOctober 12, 2023 edit post महाराष्ट्र मावळचे सुपुत्र अमोल पोफळे ‘आयर्न मॅन’ किताबाचे मानकरी by Team Dainik MavalOctober 12, 2023 edit post लोकल गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक, वडगाव मावळ पोलिसांची कारवाई by Team Dainik […] - [Privacy Policy](https://dainikmaval.com/privacy-policy/): At Dainik Maval, accessible from dainikmaval.com, one of our main priorities is the privacy of our visitors. This Privacy Policy document contains types of information that is collected and recorded by Dainik Maval and how we use it. If you have additional questions or require more information about our Privacy Policy, do not hesitate to contact us. This Privacy Policy applies only to our online activities and is valid for visitors to our website with regards to the information that they shared and/or collect in Dainik Maval. This policy is not applicable to any information collected offline or via channels […] [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)