खासदार श्रीरंग बारणे यांच्या फंडातून वडगाव शहरातील विविध विकासकामांसाठी 1 कोटी 10 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
वडगाव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे यांनी याकरिता खासदार बारणे यांना पत्र लिहून विविध विकास कामांचा उल्लेख करत त्याकरिता निधी मागितला होता. खासदार बारणे यांनी पत्राची दखल घेत वडगावमधील संबंधित विकासकामांसाठी एक कोटी दहा लाख रुपये मंजूर केले आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या मंजूर निधीतून लवकरच कामाला सुरवात होणार आहे. वडगाव शहर भाजपा ने केलेल्या मागणी ला यश आले आहे, अशी माहिती भाजपा शहर अध्यक्ष अनंता कुडे यांनी दैनिक मावळला दिली. ( 1 crore 10 lakhs fund for various development works in Vadgaon city from MP fund said BJP Ananta Kude )
अधिक वाचा –
– वडगाव शहरात नव्याने होत असलेल्या तलाठी कार्यालयाचे आमदार शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन
– ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ अभियानांतर्गत 10 मे रोजी टायगर पॉइंट, लायन पॉइंट भागात स्वच्छता मोहीम