प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या 3 मार्च रोजीच्या पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व 1 लाख 14 हजार 88 आणि तडजोडचे 26 हजार 816 असे एकूण 1 लाख 40 हजार 904 दावे निकाली काढण्यात आले आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
लोक अदालतीमध्ये बँकेचे कर्जवसूली 3 हजार 105, तडजोड पात्र फौजदारी 20 हजार 322, वीज देयक 538, कामगार विवाद खटले 12, भुसंपादन 48, मोटार अपघात दावे न्यायाधिकरण 99, वैवाहिक विवाद 106, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्ट 1 हजार 355, इतर दिवाणी 350, इतर 6 हजार 704, महसूल 5 हजार 104, पाणी कर 1 लाख 3 हजार 161 अशी एकूण 1 लाख 40 हजार 904 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. ( 1 lakh 40 thousand cases were settled in National Lok Adalat of Pune district )
तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या 46 हजार 637 प्रलंबित प्रकरणांमधून 26 हजार 816 प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि यात 271 कोटी 47 लक्ष 29 हजार 450 तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. वादपूर्व 1 लाख 96 हजार 806 दाव्यापैकी 1 लाख 14 हजार 88 दावे निकाली काढण्यात येऊन 98 कोटी 30 लाख 90 हजार 818 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. एकूण 1 लाख 40 हजार 904 प्रलंबित दावे निकाली काढण्यात येऊन 369 कोटी 98 लाख 20 हजार 268 रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले.
पुणे जिल्ह्याने राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनादरम्यान दावे निकाली काढण्यात अग्रेसर राहण्याची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभाग, महानगरपालिका, विविध शासकीय विभाग आणि नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती सोनल पाटील यांनी दिली आहे.
अधिक वाचा –
– लोणावळ्यात शरद पवारांची तोफ धडाडणार! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गुरुवारी कार्यकर्ता संवाद मेळावा
– हुश्श..! पुण्यात प्रशासनाला ‘कात्रजचा घाट’ दाखवून पळालेल्या बिबट्याला पकडण्यात यश, रात्री सव्वा नऊ वाजता मोहिम फत्ते । Pune Katraj Park Leopard Update
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते किवळे-विकासनगर भागातील 10 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन । MP Shrirang Barne