Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त तसेच संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
बापूसाहेब भेगडे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तसेच शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापत त्यांना सर्वांच्या वतीने उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या शिबिरामध्ये एकूण १०६ रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले. तत्पूर्वी सकाळी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नांगरगाव येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मठ या ठिकाणी श्री स्वामींचा अभिषेक व पूजा करण्यात आली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड प्रकल्पाचे अद्यापही 200 हेक्टर भूसंपादन बाकी, ‘या’ जमीन मालकांना मिळणार 25 टक्के भरपाई । Pune Ring Road
– दोन्ही राष्ट्रवादी एकत्र… आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याने खळबळ, राज्यभर होतीये चर्चा । MLA Sunil Shelke
– राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ, एका क्लिकवर पाहा यादी