व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दहावीचा निकाल जाहीर ! पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेचा 100 टक्के निकाल, सिद्धी सुतारचा पहिला नंबर । Pavananagar News

एस.एस.सी शालान्त परीक्षा परिक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेचा निकाल 100 टक्के निकाल लागला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 27, 2024
in लोकल, ग्रामीण
10th result announced Pavana Vidya Mandir

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवनानगर : आज (दि. 27 मे) एस.एस.सी शालान्त परीक्षा परिक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेचा निकाल 100 टक्के निकाल लागला असून सदर परिक्षेसाठी 118 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. येथील सिध्दी दत्तात्रय सुतार हिने 94.40 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला, तर हर्षल सुनिल चव्हाण – 90.80 टक्के याला द्वितीय क्रमांक, तर अस्मिता संजय कालेकर हिने 88.20 टक्के हीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पवना विद्या मंदिर पवनानगर शाळा ही केंद्र शाळा असून या शाळेवर परिसरातील वारु कोथुर्णे माध्यमिक शाळा , छत्रपती शिवाजी माध्यमिक शिवली, संत ज्ञानेश्वर विद्यानिकेतन अजिवली,करुंज माध्यमिक विद्यालय करुन, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय बऊर , ज्ञानेश्वर विद्यालय दिवड आणि संत तुकाराम माध्यमिक विद्यालय शिवणे या आठ शाळेतील विद्यार्थीनी 422 परीक्षा दिली होती. ( 10th result announced Pavana Vidya Mandir Pavananagar School 100 Percent Result )

यासाठी पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गशिक्षक गणेश ठोंबरे, बापुसाहेब पवार, रोशनी मराडे, महादेव ढाकणे, राजकुमार वरघडे,मंजुषा गुर्जर, वैशाली वराडे,सुनिता कळमकर,भारत काळे, वैशाली कोयते,सुमन जाधव, वर्षा पोखरकर यांच्यासह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेऊन उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवली.

यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष बाळा भेगडे म्हणाले की,कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन उत्तम गुण संपादन केले आहे त्याच्या यशाबद्दल शिक्षक व पालकाचे अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना संतोष खांडगे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये खरी गुणवत्ता असते हे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांने दाखवून दिले कोणत्याही खाजगी क्लासेस व सुविधा नसताना शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाच्या आधारावर चांगले यश मिळवले आहे.

सर्व यशस्वी शिक्षकांचे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळाभाऊ भेगडे, संस्थेचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संतोष खांडगे, उपाध्यक्ष गणेश खांडगे सहसचिव नंदकुमार शेलार खजिनदार राजेश म्हस्के व संचालकांनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

अधिक वाचा –
– पार्क केलेल्या कारची काच फोडून गाडीतील लॅपटॉप, फोन आणि रोकड केली लंपास, तळेगाव पोलिसांत गुन्हा दाखल
– श्री पोटोबा महाराज मंदिर देवस्थान संस्थानच्या मुख्य विश्वस्त पदी किरण भिलारे यांची निवड । Vadgaon Maval
– मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ आयोजित निवासी बाल वारकरी अध्यात्मिक संस्कार शिबिराची सांगता । Maval News


Previous Post

तळेगावातील सरस्वती विद्या मंदिर शाळेचा 100 टक्के निकाल; 19 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण । SSC Result 2024

Next Post

मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात पंजाब राज्यातील तरूणाचा बुडून मृत्यू; गुगलवर मॅप पाहून पर्यटनासाठी आले आणि…

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
youth drowned in Jadhavwadi dam

मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात पंजाब राज्यातील तरूणाचा बुडून मृत्यू; गुगलवर मॅप पाहून पर्यटनासाठी आले आणि...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.