पवनानगर भागात जबरी चोरीची घटना उघडकीस आली आहे. पवन मावळ भागातील येळसे गावात शुक्रवारी (दिनांक 1 सप्टेंबर) पहाटे 2 ते सकाळी 7 वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी मुकुंद बबन ठाकर (वय 42, रा. येळसे, ता. मावळ) यांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी तब्बल 14 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे, याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( 14 lakh house burglary in Yelse village of Maval taluka )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांच्या टोळक्याने फिर्यादी यांच्या कुलूपबंद घराचा कडीकोयंडा उचकटून घरातील दोन्ही खोल्यांचे दरवाजे उचकटले. त्यांनतर खोलीतील कपाटे धारधार शस्त्राने उचकटली. कपाटातील लॉकरचे कुलूप तोडले आणि त्यातील 22 तोळे वजनाचे सोने, रोख रक्कम 5 लाख रुपये व देवघरातील सोन्या-चांदीचे देव चोरून नेले. तसेच घरातील दिवाण आणि स्वयंपाक गृहातील ट्रॉली उचकटून घरातील सर्व वस्तूंचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून विभागीतील चोरीच्या घटनेत झालेली वाढ पाहता पोलिसांनी ग्रामीण भागात देखील गस्तीसाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अजित पवारांकडून ‘एक देश, एक निवडणूक’ पॉलिसीचं समर्थन; म्हणाले ‘पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात…’
– तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाच्या छतावर चढून मनोरुग्णाचा धुडगूस – व्हिडिओ
– आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटनेकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडे ‘या’ मागण्यांचे निवेदन सादर