पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना 2022-23 या आर्थिक वर्षाच्या निधीचा हप्ता नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायती मालामाल होणार आहेत
पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील 1380 ग्रामपंचायतींसाठी 58 कोटी 81 लाख 58 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात लवकरच ही रक्कम वर्ग होणार असून, आराखड्यानुसार कामेही मार्गी लागणार असल्याने गावविकासालाही चालना मिळणार आहे. ( 15th Finance Commission Gram Panchayats will be Rich see which taluka in Pune district will get how much funds )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ग्रामविकास विभागाकडून विकास कामांसाठी ग्रामपंचायतींना 80 टक्के, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी 10-10 टक्के निधीची तरतूद केली जाते. पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज संस्थांना निधी वितरित केला जात आहे. त्यासाठी राज्यात 726 कोटी 41 लाख रुपयांचा निधी लागणार आहे.
15व्या केंद्रीय वित्त आयोगाकडून राज्य सरकारला आवश्यक निधी उपलब्ध केला आहे. मात्र ज्या ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक आहेत, अशा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना 15व्या वित्त आयोगाचे वितरण केले जाणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला दरवर्षी मिळणारे 10-10 टक्के अनुदान प्राप्त होणार नाही. ( 15th Finance Commission Gram Panchayats will be Rich see which taluka in Pune district will get how much funds )
पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्याला किती निधी ?
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 6 कोटी 58 लाखांचा निधी हा जुन्नर तालुक्यातील 144 ग्रामपंचायतींना मिळणार आहे. तर, सर्वात कमी निधी वेल्ह्यामधील 70 ग्रामपंचायतींना 94 लाख इतका प्राप्त होणार आहे. या निधीतून गावातील मूलभूत विकास कामांसाठी खर्च करता येणार आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन, वयाच्या 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुणे जिल्हा
तालुके – 13
ग्रामपंचायती – 1380
मंजूर निधी – 58 कोटी 81 लाख 58 हजार रुपये
राज्याला मिळालेला निधी – 726 कोटी 41 लाख रुपये
तालुकानिहाय निधी (रुपयांमध्ये)
1) जुन्नर – 144 ग्रामपंचायती – 6 कोटी 58 लाख 23 हजार निधी
2) इंदापूर – 116 ग्रामपंचायती – 6 कोटी 39 लाख 56 हजार निधी
3) शिरूर – 96 ग्रामपंचायती – 6 कोटी 17 लाख 53 हजार निधी
4) खेड – 161 ग्रामपंचायती – 6 कोटी 13 लाख 70 हजार निधी
5) दौंड – 80 ग्रामपंचायती – 5 कोटी 73 लाख 29 हजार निधी
6) बारामती – 98 ग्रामपंचायती – 5 कोटी 23 लाख निधी
7) हवेली – 71 ग्रामपंचायती – 4 कोटी 57 लाख 12 हजार निधी
8) मावळ – 101 ग्रामपंचायती – 4 कोटी 39 लाख 15 हजार निधी
9) आंबेगाव – 102 ग्रामपंचायती- 3 कोटी 77 लाख 17 हजार निधी
10) पुरंदर – 93 ग्रामपंचायती – 3 कोटी 34 लाख 47 हजार निधी
11) भोर – 156 ग्रामपंचायती – 2 कोटी 93 लाख 48 हजार निधी
12) मुळशी – 92 ग्रामपंचायती – 2 कोटी 60 लाख 88 हजार निधी
13) वेल्हे – 70 ग्रामपंचायती – 94 लाख निधी
एकूण – 1380 ग्रामपंचायती – 58 कोटी 81 लाख 58 हजार निधी
अधिक वाचा –
– शिळींब ते घुसळखांब रस्ता, आंबेगाव ते दुधिवरे खिंड रस्ता आदी विकासकामांबाबत आढावा बैठक
– कुटुंबातील कुणी कर्जदार व्यक्ती कोरोनाने गेला असल्यास ही बातमी नक्की वाचा, सहकार विभागाचा दिलासादायक निर्णय
– सोशल मीडियाचा नाद लईच बेक्कार..! रेल्वे रुळावर झोपून फोटो-व्हिडिओ काढणाऱ्या तरुणांना अटक, देहूरोड-शेलारवाडी दरम्यानची घटना