आपल्या जवळच्या माणसाची एक मिठी खूप आधार देणारी असते, हे कुणीही मान्य करेल. त्यातही ती मिठी आपल्या बायकोची अथवा नवऱ्याची अथवा प्रियकर-प्रेयसीची असेल तर शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून दूर राहण्यास मदत मिळते. आपल्या पार्टनरचा होणारा स्पर्श हा आपल्याला अनेकांगांनी सुख देऊन जातो. प्रेम, माया, विश्वास, आपुलकी अशा अनेक गोष्टी त्यात सामावलेल्या असतात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अशात पुरुष जेव्हा आपल्या बायकोसोबत झोपताना मिठीत मारून झोपतो, तेव्हा त्या जवळ येण्याचेही अनेक फायदे असतात. बायकोला चिकटून झोपण्याचे अनेक मानसिक आणि शारिरिक फायदे असल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. सायन्स अलर्टने केलेल्या अभ्यासानुसार जोडीदाराला मिठी मारून अथवा चिकटून झोपल्याने शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक मजबूत होते, असे सांगण्यात आले आहे. यासह बायकोला मिठी मारुन झोपण्याचे इतरही अनेक फायदे आहेत, ते या लेखातून जाणून घेऊयात.
अमेरिकेत कामावर जाणाऱ्या 1000 पेक्षा अधिक लोकांवर हा सर्व्हे करण्यात आला आहे. ज्यात ह्या व्यक्तींनी आपल्या जोडीदारासह चिकटून झोपायला सांगण्यात आले. त्यानंतर यावर अभ्यास करण्यात आला आणि त्यातून काही महत्त्वाच्या गोष्टी सिद्ध झाल्या आहेत. त्याबाबत ही माहिती आहे.
1. तणाव कमी होतो – तुम्ही दिवसभराच्या कामानंतर अथवा सततच्या त्रासानंतर रात्री आपल्या बायकोला अथवा नवऱ्याला चिकटून झोपल्याने शरीरातील थकवा कमी होऊन मनावरील ताण कमी होण्यास मदत मिळते. आपल्या जवळची व्यक्ती आपल्याजवळ आहे ही जाणीव मनातील ताण कमी करण्यास मदत करते.
2. चिंता आणि नैराश्य दुर होते – एकटे झोपल्याने चिंता आणि नैराश्याने अनेक माणसांना ग्रासले जाते. मात्र अभ्यासात आढळल्याप्रमाणे आपल्या जोडीदारासह झोपल्यामुळे चिंता आणि नैराश्य दूर होण्यास मदत मिळते आणि आपल्यासह आयुष्यात आपलं माणूस आहे या विचाराने स्थैर्य येते.
3. मानसिक आरोग्यात सुधारणा – अभ्यासानुसार, ज्या व्यक्ती सिंगल आहेत, त्यापेक्षा जोडीदारासह एकत्र झोपल्याने त्यांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा होते आणि नात्यात अधिक बांधिलकी जपतात. तसंच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यास मदत मिळते.
View this post on Instagram
4. लवकर झोप लागण्यास मदत – दिवसभर थकून आल्यानंतर ताणतणाव कमी करण्यासाठी जोडीदारासह जवळ झोपणे अथवा चिकटून झोपणे हा चांगला पर्याय समजण्यात येतो. यामुळे ताण कमी होऊन लवकर झोप लागते हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. तसंच आपल्या आवडत्या व्यक्तीचे बाजूला असण्याची भावना सर्व चिंता दूर सारून पटकन झोप लागण्यास मदत करते.
5. वेदना निवारक ठरते – आपल्या जोडीदारासह झोपल्याने मेंदूमधील रसायने बाहेर पडून अनेक वेदनांपासून मुक्तता होण्यास मदत मिळते. एका संशोधनानुसार, एकटे झोपणाऱ्या व्यक्तीपेक्षा आपल्या जोडीदारासह झोपणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य अधिक असते हे सांगण्यात आले आहे. आपल्या जोडीदारासह झोपणे हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या वेदना निवारक ठरते. ( 5 amazing benefits of sleeping with your wife )
अधिक वाचा –
– स्व. किशोरभाऊ आवारे यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
– मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सुभाष पुजारी यांना गोल्ड मेडल
– ‘…अन्यथा शासनाला गावकारभाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल’, गावखेड्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याची सरपंच परिषदेची मागणी