वडगाव कातवी शहरातील सुमारे 5000 नागरिकांना श्रीक्षेत्र अयोध्या येथील श्री रामलल्लांचे दर्शन घडवण्याचा संकल्प मोरया प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने हे दर्शन घडवले जाणार असून रामनवमीच्या मुहूर्तावर ‘चलो अयोध्या’ संकल्प यात्रेची सुरुवात करण्यात आली. ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक करून मोफत आयोध्या दर्शन यात्रेसाठी नावनोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
येत्या जून महिन्यात वडगाव – कातवीतील हजारो नागरिक अयोध्येला प्रस्थान करणार आहे. त्यासाठी नाव नोंदणी सुरु झालेली आहे. या नावनोंदणीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पुणे ते अयोध्या दर्शन परत अयोध्या ते पुणे (संपूर्ण रेल्वे गाडी बुकिंग), प्रवासादरम्यान सर्व नागरिकांना नाष्टा, जेवण, चहा, पाणी, ओळखपत्र इत्यादी सुविधा मोरया प्रतिष्ठानच्या वतीने मोफत पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली. ( 5000 citizens will be taken to Ayodhya through Morya Pratishthan Vadgaon Maval )
मोरया प्रतिष्ठानच्या अयोध्या यात्रा आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी जाण्याकरिता नावनोंदणी करायची असल्यास, वडगाव येथे मयूर ढोरे यांच्या निवासस्थानाजवळील मोरया प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयात स्वताः उपस्थित राहून दोन फोटो आणि आधारकार्ड झेरॉक्स जमा करून नावनोंदणी करावी, असे आवाहन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा : आंतरराज्यीय अमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो पथकाची कारवाई । Pune News
– धक्कादायक! तळेगाव येथे सार्वजनिक शौचालयात आढळले एक दिवसाचे अर्भक । Talegaon Dabhade
– एक्सप्रेस वेवरील अपघात कमी करण्यासाठी वाहनांना नवीन वेगमर्यादा लागू, बोरघाटात गाडीचं स्पीड किती असावं? जाणून घ्या