Dainik Maval News : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या मान्यतेने मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा १ सप्टेंबर २०२५ रोजी ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल गहुंजे द्वारे आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धेत मावळ तालुक्यातील विविध शाळांमधून एकूण ५२० खेळाडूंनी सहभाग घेतला. यातून जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी ३० खेळाडूंची निवड करण्यात आली. खेळाडूंना आपल्या कौशल्याचे उत्तम प्रदर्शन यावेळी केले.
स्पर्धेस पाहुणे म्हणून मावळ तालुका क्रीडा अधिकारी सुरेश काकड, ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल चे विश्वस्त साहेबराव बोडके यांसह दीपक बोडके, प्राचार्य विजिला राजकुमार, मनोज स्वामी, रशीद इनामदार, समीर इनामदार, महादेव माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाबाबत पीएमआरडीए कार्यालयात विशेष आढावा बैठक संपन्न
– मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार । Maratha Reservation
– आनंदाची बातमी ! ‘पीएसआय’ पदांसाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू ; सेवेतील पोलीस शिपायांना पीएसआय होण्याची संधी