Dainik Maval News : इंद्रायणी इंग्लिश स्कुल तळेगाव याठिकाणी 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पै. सचिनभाऊ शेळके इंद्रायणी इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष बाळासाहेब शेळके, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांंच्या हस्ते करण्यात आले.
पुणे जिल्हा माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी सदर विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. विनायक वडगुळे, प्रविण वाकडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश सुतार यांनी केले. आभार ज्योती लावरे यांनी मानले. यावेळी संजय शेळके, विठ्ठल माळशिकारे, दिलीप कुलकर्णी, विश्वास देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनासाठी ;
प्रकल्प गट -प्राथमिक(6वी ते 8वी ) – 68
माध्यमिक (9वी ते 12वी )- 52
निबंध प्राथ-45,माध्य- 41
वक्तृत्व प्राथ-43,माध्य- 48
प्रश्नमंजुषा – 38
दिव्यांग -प्राथ -3, माध्य – 4
शिक्षक गट प्राथ -8, माध्य-4
प्र .परिचर – 1
एकूण 79 शाळेतील 317 विद्यार्थी व शिक्षकांनी या विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदविला होता.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी
– आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
– पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या