मावळ तालुक्यातून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वडगाव मावळ जवळील कान्हे फाटा येथील रेल्वे स्टेशनजवळ एका अनोळखी महिलेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. ( 60 Year Old Woman Died After Being Hitting By Running Train Near Kanhe Phata Railway Station )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (बुधवार, 11 जानेवारी) रोजी कान्हे फाटा रेल्वे स्टेशन जवळ एक 60 वर्षीय अनोळखी महिलेचा धावत्या रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. कान्हे फाटा रेल्वे स्टेशन R.K.M. No 152-37 जवळ ही घटना घडली. सदर मृत महिलेचे अंदाजे वय 60 वर्षे असून मयताचे वर्णन – अंगाने मजबूत, रंगाने गोरी, उंची पाच फूट, नाक सरळ, चेहरा गोल, केस काळेपांढरे असे आहे. तसेच महिलेच्या अंगात तांबड्या रंगाचा ब्लाऊज आणि भगव्या रंगाची साडी आहे. तरी सदर मृत महिलेबद्दल कुणाला माहिती असल्यास किंवा तिचे कुणी वारस असल्यास, पोलिस हवालदार प्रशांत जाधव यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– धक्कादायक घटना! मावळ तालुक्यातील चांदखेड गावच्या यात्रेत गावगुंडाकडून हवेत गोळीबार, पोलिसांची तातडीने कारवाई
– जीवापाड संभाळलेले बैल डोळ्यांदेखत होरपळले, शेतकऱ्याचा काळीज चिरणारा आक्रोश, नवलाख उंबरेमधील हृदयद्रावक घटना