मावळ तालुक्यात यंदा चांगला पाऊस पडत असून त्यामुळे भात पिकाच्या सरासरी 70 टक्के भात लावगडी पूर्ण झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी दिली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलै महिन्यात मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे तालुक्यातील खरीप भात पिकाच्या लागवडीही वेगाने सुरू झालेल्या आहेत.
मावळात यावर्षी तेरा हजार हेक्टर क्षेत्रावर भात खरीप भात पिकाच्या लागवडी होतील, असा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला आहे. आतापर्यंत मावळ तालुक्यातील खरीप भात पिकाच्या लागवडी 70 टक्के म्हणजेच 9000 हेक्टर क्षेत्रावर पूर्ण झाले आहे. तर पवन मावळच्या पश्चिम पट्ट्यातील भात लागवडी ह्या 70 ते 75 टक्के च्या वर गेल्या असल्याचे सहाय्यक कृषी अधिकारी विकास गोसावी यांनी सांगितले. पश्चिम पट्ट्यात पावसाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने काही गावांमधील भातलावडी या 80 टक्के झाल्या आहेत. पूर्वपट्टृ्यात मात्र पाऊस कमी असल्याने भात लागवडी कमी झाल्यात.
मावळ तालुक्यात शेतकऱ्यांनी भात पिकात इंद्रायणी भाताच्या पेरण्या सर्वाधिक केल्या होत्या. त्यामुळे सुमारे 96 टक्के लागवडी या इंद्रायणी भाताच्या होतील असा अंदाज कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय फुले समृद्धी कोलम आंबेमोहर बासमती याही जातीच्या भाताची लागवड थोड्या थोड्या फार प्रमाणात झालेले आहेत. तालुक्यातील बहुतांष शेतकऱ्यांनी इंद्रायणी भातालाच पसंती दिली आहे.