Dainik Maval News : इंदुरी कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवर जोडरस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकामासाठी 8 कोटी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल रविंद्र भेगडे यांच्यातर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा सत्कार करत आभार मानण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांच्या पाठपुराव्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने, इंदुरी कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवर जोडस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकामासाठी 8 कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर केला. यासंबंधीचे मंजुरी पत्र देखील रविंद्र भेगडे यांना प्राप्त झाले होते.
पूर्वनियोजित दौऱ्याच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण साहेब पुणे येथे आले असता, रविंद्र भेगडे यांनी इंदोरी कुंडमळा येथील ग्रामस्थांसह मंत्रीमहोदयांची भेट घेऊन समस्त ग्रामस्थ कुंडमळा इंदोरी व मावळ तालुक्यातील जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी, इंदूरी ग्रामपंचायत चे मा.ग्रा.पं सदस्य दत्तात्रय भेगडे, प्रगतशील शेतकरी संजय (आण्णा)भेगडे, भाजपा इंदोरी सोमाटणे गट अध्यक्ष मनोहर भेगडे, कामगार नेते सूर्यकांत दादा भेगडे, गुलाबदादा भेगडे, अशोकराव भेगडे, गणेश भेगडे, सचिन भेगडे, मयुर शेलार आदी प्रमुख नागरिक उपस्थित होते. ( 8 crore fund for bridge at Kundmala Ravindra Bhegde thanked Minister Ravindra Chavan )
अधिक वाचा –
– कै. सतिश जगताप यांच्या पुण्यस्मरणानिमित्त महिलाभगिनींना साडी वाटप । Maval News
– वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील 6 कर्मचाऱ्यांना पदोन्नती, पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्याकडून विशेष सत्कार । Vadgaon Maval
– वाघेश्वर गावचे सुपूत्र देविदास कडू यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार । Maval News