तळेगाव दाभाडे शहरातील 12 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित तसेच खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तळेगाव दाभाडे शहर, लोणावळा नगरपरिषद तसेच वडगाव-देहू नागरपंचायतीला कोटी रुपयांचा विकास निधी दिल्याबद्दल माजी आमदार बाळा भेगडे यांनी चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले. ( bhoomi pujan by chandrakant patil of development works worth 12 crores in talegaon dabhade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“तळेगाव शहरातील तपोधाम कॉलनी परिसरातील गेल्या 15 वर्षांपासून नागरिकांची पावसाळ्यात होणाऱ्या सांडपाणी गैरसोयींबद्दल तक्रार होती. तसेच दिवंगत नगराध्यक्ष स्व. सचिनभाऊ शेळके या भागातून नगरसेवक असताना त्यांनी शब्द दिला होता प्रतीकनगर भागातील गटार -सांडपाण्याचे काम मार्गी लावू, आज दादांच्या माध्यमातून सुमारे 1.53 कोटी रूपयांचा निधी या कामाला मंजूर करून सचिनभाऊंचा शब्द पूर्ण केल्याचा सार्थ अभिमान वाटतो,” अशी प्रतिक्रिया बाळा भेगडे यांनी दिली.
यावेळी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा माझी वसुंधरा अंतर्गत राज्यात 6 वा आणि विभागात प्रथम क्रमांक आल्याबद्दल मुख्याधिकारी व संपूर्ण विभागाचे प्रमुख यांचा सन्मान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच चंद्रकांत पाटील यांनी येणाऱ्या काळात तळेगाव दाभाडे शहराच्या विकासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही नागरिकांना दिली.
खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, शिवसेना नेते राजू खांडभोर, तळेगाव शहराध्यक्ष रविंद्र माने, माजी नगराध्यक्ष रवी दाभाडे, उमाकांत कुलकर्णी, सुरेश झेंडे, मा नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, राजमाता जिजाऊ महिला मंच अध्यक्षा सारिका भेगडे, सायली बोत्रे, सर्व नगरसेवक-नगरसेविका, भाजपाचे सर्व आघाडींचे-मोर्चा प्रमुख, तळेगाव दाभाडे महिला मोर्चा पदाधिकारी, शिवसेना आरपीआय, जनसेवा विकास समिती पदाधिकारी, मुख्याधिकारी एन.के.पाटील सर्व विभाग प्रमुख आदी कार्यकर्ते-नागरिक यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– “वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक, वारीच्या इतिहासात असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं”
– मान्सून आला रे…!! राज्यातील कोट्यवधी नागरिक आणि शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, लगेच वाचा । Monsoon Update