व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या पवनमावळातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर

पवनमावळ भागातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वारू-ब्राह्मणोली ग्रामपंचायतमधून एक मोठी बातमी समोर येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 14, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Gram-Panchayat

File Image


पवनमावळ भागातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वारू-ब्राह्मणोली ग्रामपंचायतमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

ग्रुप ग्रामपंचायत वारु-ब्राम्हणोली गावचे सरपंच शाहिदास मारुती निंबळे यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव दिनांक 13 जून 2023 रोजी झालेल्या विशेष बैठकीत ग्रामपंचायतीचे सदस्यांनी बहुमताने मंजूर केल्याने, सरपंच शाहिदास निंबळे यांची पदावरुन गच्छंती करण्यात आली आहे. तशी अंतिम मंजूरी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिनांक 14 जून रोजी दिली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

ग्रुप ग्रामपंचायत वारु – ब्राह्मणोली मध्ये एकूण सदस्य संख्या ही 9 आहे. शाहिदास मारुती निंबळे यांची सरपंच पदी निवड होऊन दोन वर्ष उलटून गेली, मात्र त्यांनी ठरवल्याप्रमाणे पदाचा राजीनामा दिला नव्हता, असे काही सदस्यांनी सांगितले. तसेच, त्यांचा कारभार मनमानी पद्धतीने होत असल्याची तक्रार सुनिता निंबळेंसह सात सदस्यांनी तहसीलदार मावळ यांच्याकडे केली होती. त्यानुसार तहसीलदार यांनी ग्रामपंचायत कार्यालय इथे विशेष सभा बोलावली होती. त्यानुसार दिनांक 13 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालय इथे विशेष सभा आयोजित केली. ( no confidence motion passed against sarpanch shahidas nimble of varu bramhanoli group gram panchayat )

दोन वर्षे पूर्ण झाल्यामुळे नियमानुसार ग्रामपंचायतीच्या उर्वरित सदस्यांनी विद्यमान सरपंच शाहिदास मारुती निंबळे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला. हा प्रस्ताव बैठकीत सदस्याने 8-1 अशा बहुमताने मंजूर केला. तहसीलदार विक्रम देशमुख यांनी या विशेष सभेचा अहवाल तपासून दिनांक 14 जून 2023 रोजी याबाबत अधिकृत जाहीर केल्याने, वारू-ब्राह्मणोली सरपंच पदावरुन अखेर शाहिदास मारूती निंबळे यांची गच्छंती झाली आहे.

लवकरच ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलावून नव्या सदस्याची सरपंच पदी नियुक्ती केली जाणार आहे आणि गावच्या विकासाचा गाडा पुन्हा सुरु केला जाईल, असे ग्रामपंचायत सदस्यांनी दैनिक मावळसोबत बोलताना सांगितले.

अधिक वाचा –
– आमदार शेळकेंसमवेत मावळ बाजार समितीच्या संचालकांनी घेतली पणन संचालकांची भेट, ‘या’ विषयांवर झाली चर्चा
– ‘तुंगार्ली धरणाची दुरुस्ती व्हावी, धरण परिसरात सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी’, स्थानिकांचे लोणावळा नगरपरिषदेला निवेदन


Previous Post

पाचाणे ग्रामस्थांकडून नवनिर्वाचित सरपंच निता येवले यांचा भव्य नागरी सत्कार

Next Post

वडिलोपार्जित नसलेल्या वडिलांच्या संपत्तीवर मुलांचा किती अधिकार? जाणून घ्या

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
property

वडिलोपार्जित नसलेल्या वडिलांच्या संपत्तीवर मुलांचा किती अधिकार? जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.