व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘आदिपुरुष’ सिनेमावर बंदी घाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खासदाराची मागणी, केंद्रीय मंत्र्यांना दिले निवेदन

आदिपुरुष सिनेमावर देशभरात बंदी घालावी. निर्माता आणि कलाकारांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 21, 2023
in देश-विदेश, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र
adipurush

Photo - adipurush Poster


आदिपुरुष या चित्रपटात प्रभू श्री राम, हनुमान आणि रावण या तिघांनाही चुकीच्या पद्धतीने चित्रीत करण्यात आले आहे. हिंदु धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यामुळे आदिपुरुष सिनेमावर देशभरात बंदी घालावी. निर्माता आणि कलाकारांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

याबाबत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना निवेदन दिले आहे. त्यात बारणे यांनी म्हटले आहे की, ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगू अशा दोन भाषांमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. आदिपुरुष चित्रपटाची कथा, दृश्यांवर देश-विदेशात टीका होत आहे. भारतीय संस्कृतीची खिल्ली उडविली आहे. चित्रपटात अशोभनीय संवाद आहेत. सीता, हनुमान आणि रावण यांना चुकीच्या पद्धतीने चित्रीत केले आहे. यामुळे हिंदू समाजाच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. ( adipurush movie should be banned maval MP shrirang barane demands )

हा चित्रपट देश-विदेशात प्रदर्शित झाला आहे. तेव्हापासून वादात सापडला आहे. आदिपुरुष या चित्रपटाला देशात विरोध होत आहे. या चित्रपटात अनेक अयोग्य आणि असभ्य संवाद वापरले गेले आहेत. त्यामुळे देशभरातून प्रचंड नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. भगवान हनुमानाचा अपमान करण्यात आला आहे. चित्रपटात श्री हनुमानाच्या व्यक्तिरेखेला अपमानास्पद संवाद देण्यात आले आहेत. चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट रामायणावर आधारित असल्याचे वर्णन केले आहे. परंतु, त्यातील एकही पात्र आपल्या धर्माच्या नियमांनुसार नाही.

सनातन आस्था आणि सनातनप्रेमींचे हृदय दुखावणारे असे संवाद चित्रपटात आहेत. चित्रपटात दाखवण्यात आलेली सर्व पात्रे रामायणाच्या कथेच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. हा चित्रपट म्हणजे आपला इतिहास बदलण्याचे षडयंत्र आहे. हिंदू धर्मांची कथा पूर्णपणे चुकीच्या आणि अशोभनीय पद्धतीने दाखवणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटावर देशभरात बंदी घालावी. निर्माता, कलाकारांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी खासदार बारणे यांनी निवेदनातून केली आहे.

अधिक वाचा –
– श्री दत्तगुरुंचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुकांचे आणि रथयात्रेचे मावळ तालुक्यात जल्लोषात स्वागत
– अंगावर काटा आणणारी बातमी..! आढले गावातील एकाच घरात सापडली घोणस सापाची तब्बल 20 पिल्ले


Previous Post

एमआयडीसी एसटीपी उभारणार, उद्योगमंत्री उदय सामंत घेणार बैठक, खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

Next Post

कौतुकास्पद! शिवशंभो प्रतिष्ठानकडून जवण येथील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
free-educational-materials

कौतुकास्पद! शिवशंभो प्रतिष्ठानकडून जवण येथील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.