खोपोली ( Khopoli ) शहरासाठी होणारा पाणीपुरवठा हा टाटा ( Tata ) हायड्रो इलेक्ट्रिक कंपनीने केलेल्या पाण्याच्या विसर्गावर संपूर्णता अवलंबून असतो. गेल्या पंधरा दिवसात टाटा कंपनीने मेन्टेनन्स करता पाण्याचा विसर्ग नियंत्रित ठेवला आहे. त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये बदल करून त्यावर नियंत्रण आणण्याचे काम खोपोली नगरपालिकेने केले होते.
नवरात्री ( Navratri 2022 ) आणि दसरा ( Dasara ) सणाच्या पार्श्वभूमीवर शंकर मंदिर तलावातील असलेल्या पाणीसाठा आणि टाटा कंपनीकडून झालेल्या विसर्गावर पाणी पुरवठ्याचे नियोजन करत असताना दिनांक 6 ऑक्टोबर 2022 रोजी अत्यंत दयनीय परिस्थिती निर्माण झाली होती. शंकर मंदिर तलाव संपूर्णता आटला होता त्याच सोबत पाताळगंगा नदीचे ( Patalganga River ) पात्र कोरडे पडले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यंदा दसऱ्यानिमित्त खोपोली पोलीस ठाण्याच्या क्षेत्रांत साधारणता 56 ठिकाणी श्री दुर्गामातेच्या मुर्त्या प्रतिष्ठापित केल्या होत्या. दसरा सणानंतर श्री दुर्गामातेच्या मुर्त्या विसर्जित करण्यासाठी खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी नियोजना संदर्भात विसर्जन घाटांना भेट दिली असता त्यांना कोठेच पाण्याचा पर्याप्त साठा दिसून आला नाही.
त्यामुळे त्यांनी खोपोली नगरपालिका मुख्याधिकारी अनुप दूरे यांच्या ही बाब लक्षात आणून देऊन तहसीलदार आयुब तांबोळी यांना देखील याबाबतची माहिती दिली. अगदी काही तासाच्या कालावधीत श्री दुर्गामातेच्या मूर्ती विसर्जित करण्याच्या अनुषंगाने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला नियोजनासाठी सोबत घेऊन सर्व नवरात्र उत्सव मंडळांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीत पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी कायदा आणि सुव्यवस्था तसेच धार्मिक भावना कुठेही बाधित होऊ नये या दृष्टिकोनातून अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण करुन नवरात्र उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना श्री दुर्गामाता मूर्तींचे विसर्जन खोपोली नगर परिषदेच्या भानवज येथील कृत्रिम तलावात करण्याचे आवाहन केले. ( Khopoli Raigad River Lake Water Pollution Administration Needs To Take Measures )
नगरपालिका प्रशासनाने तातडीने कृत्रिम तलाव भरून घेत विसर्जन व्यवस्थेसाठी तयारी ठेवली. त्यात सोबत शिरीष पवार यांनी टाटा कंपनीच्या व्यवस्थापनाशी बोलून किरकोळ स्वरूपात पाणीपुरवठा सुरू करवून घेतला. शंकर मंदिर तलाव, खालची खोपोली, मुळगाव इत्यादी ठिकाणी पाण्याची पातळी कमी असल्याने तातडीने मिरवणूक मार्गात बदल करुन खोपोली नगर परिषदेच्या भानवज येथील कृत्रिम तलावात विसर्जन विधी पूर्ण करून घेतला.
श्री दुर्गामाता मूर्ती विसर्जन कार्यात आलेली अडचण अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने सोडविण्यात खोपोली पोलीस स्टेशन, खोपोली नगरपालिका, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था , सर्व सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ आणि नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
यावरून एक गंभीर बाब समोर आली ती अशी की, सह्याद्रीच्या पर्वतरांगांची तटबंदीत वसलेल्या खोपोली शहराला निसर्गाने भरभरून सौंदर्य दिलेले आहे. भौगोलिक पार्श्वभूमीवर इतर माध्यमातून अनेक उद्योग आणि दळणाच्या साधनांनी शहराला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. प्रगतिशील शहरांचे यादीत खोपोली गणली जाते.
या सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते ती पातळगंगा नदी. जी बारमाही खोपोली शहरातून आपटा येथील खाडीपर्यंत वाहत असते. पावसाळ्याचे काही दिवस वगळता या नदीचा वाहता प्रवाह संपूर्णता टाटा हायड्रो इलेक्ट्रिक कंपनीने पाण्याच्या विसर्गावर अवलंबून असतो. त्या व्यतिरिक्त खोपोली शहराकरिता अन्य कुठलाही पाण्याचा स्त्रोत नसल्याने भविष्यकाळात एखादी अडचण निर्माण झाल्यास खोपोलीकरांचे अनुषंगाने या नदीच्या सभोवताली असलेल्या व्यवस्थेचे हाल होतील हे सांगण्यासाठी कदाचित श्री दुर्गामातेने स्वतःला विसर्जित होताना गंभीर असा इशारा दिला आहे असेच म्हणावे लागेल.
खोपोली नगरपालिका प्रशासन आणि खोपोलीतील सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन कायमस्वरूपी पाणीपुरवठ्या संदर्भात तरतूद करण्याच्या दृष्टिकोनातून ठोस असा कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. श्री दुर्गामातेने खोपोलीकरांवर येणाऱ्या संभाव्य संकटाची स्वतः जाणीव करून दिलेली आहे याकडे दुर्लक्ष करणे अत्यंत धोक्याचे आहे.
माहिती, शब्दसंकलन –
गुरुनाथ रामचंद्र साठेलकर
(अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था)
अधिक वाचा –
‘रात्री अपरात्री फोन आला तर नक्की उचला, कदाचित तो फोन मदतीसाठी हाक असेल’
ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या 7 हजार 649 ग्रामपंचायतींसाठी ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेला प्रारूप मतदार याद्या