व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खासदार श्रीरंग बारणे, अभिनेत्री साक्षी गांधी यांच्या हस्ते दहावी – बारावीतील 700 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव । Maval Lok Sabha

शिव छत्रपती प्रतिष्ठान आणि मावळ लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष विश्वजित बारणे यांच्या वतीने दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 24, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Meritorious-Students-Felicitated

Photo Courtesy : FB / MP Shrirang Barne


पिंपरी – चिंचवड : थेरगावातील दत्तनागरी सहकारी पतसंस्था, शिव छत्रपती प्रतिष्ठान आणि मावळ लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष विश्वजित बारणे यांच्या वतीने दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. तब्बल 700 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना शालेय बॅगचे मोफत वाटप करण्यात आले. ( MP Srirang Barane Actress Sakshi Gandhi Felicitated Meritorious Students Of SSC And HSC )

चिंचवडे लॉन येथे झालेल्या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे, अभिनेत्री साक्षी गांधी, मावळ लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष विश्वजित बारणे, जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख निलेश तरस, जिल्हा संघटीका शौलाताई पाचपुते, महिला शहर संघटीका सरीता साने, तुळजाभवानी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक लहु नवले, दत्तनागरी पत संस्था उपसंचालक दिलीप बोंबले पाटील, हणुमंत माळी, धनाजी बारणे, बशिर सुतार, बाळासाहेब वाघमोडे, नंदु जाधव, संतोष बारणे व इतर शिवसेना, युवासेना पदाधिकारी, बँकेचे शिष्टमंडळ व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, सध्या स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी मेहनत करावी लागेल. जिद्द, चिकाटी आणि धेय्य डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करावा. केवळ पदवी घेण्यावर भर देवू नका, व्यावसायिक अभ्यासक्रम शिका, केंद्र, राज्य सरकारचे विविध कोर्स उपलब्ध आहेत. ते कोर्स शिकावेत. त्यातून तुम्ही नोकरी देणारे होताल. पिंपरी-चिंचवड औद्योगिक शहर आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक शहरात रोजगारासाठी येतात. त्यामुळे पदवी घेवून नोकरी करण्यापेक्षा व्यावसायिक अभ्यासक्रम शिकून व्यावसायिक व्हावे.

जगात वेगाने बदल घडत आहेत. पुढील दहा वर्षांचा काळ देशाचा आणि जगाचा चेहरा मोहरा बदलणारा असणार आहे. त्यामुळे पुढच्या दहा वर्षात कोणत्या क्षेत्राला महत्व राहील याची माहिती आताच विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने त्यांना करिअर निवडता येईल. आर्टीफिशयल इंनटीजिलीएंट, आरोग्य या क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. पर्यावरणात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे पुढच्या दहा वर्षाचे नियोजन करून क्षेत्र निवडावे. यशस्वी होउन शहराचे नाव करावे. आपला भारत देश हा युवकांचा देश आहे. महासत्ता होण्याच्या दिशेने येणारा काळ हा देशासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. तुम्ही विद्यार्थी देशाचे भवितव्य आहात. त्यामुळे आपल्या आवडत्या क्षेत्रात जावून शिक्षण घ्यावे. त्याच क्षेत्रात करिअर करावे. जेणेकरून तुम्हाला यशस्वी होण्यात कोणताही अडथळा येणार नाही. आवडीच्या क्षेत्रात आपण झपाटून आणि मन लावून काम करतो असे मार्गदर्शन विश्वजित बारणे यांनी केले.

कला क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार – साक्षी गांधी

अभिनेत्री साक्षी गांधी म्हणाल्या, आजच्या सोशल मीडियाच्या युगात पुस्तकी ज्ञान महत्वाचे आहे. तसेच युवा वर्गास पुस्तकी ज्ञानाबरोबर संस्कार देखील तेवढेच महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी अभिनेत्री क्षेत्रातील येणा-या विविध समस्यांवर मात करून त्यांना नाव लौकिक मिळवले आहे. कला क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन, पुण्यात होणार अंत्यसंस्कार, मोदींकडून शोक व्यक्त
– मोठी बातमी! ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन


Previous Post

एकाच महिन्यात रस्त्यांची चाळण, लोणावळ्यात मनसे आणि भाजपचा मोर्चा, आंदोलनासाठी निवडली हटके स्टाईल

Next Post

स्त्रीशक्ती भाजी मंडई तर्फे काँग्रेस नेते रामदास काकडे यांचा सत्कार । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ramdas-Kakade-Talegaon-Dabhade-Maval

स्त्रीशक्ती भाजी मंडई तर्फे काँग्रेस नेते रामदास काकडे यांचा सत्कार । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
Draft electoral roll voting list

विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध ! एकूण ८६७ मतदारांचा समावेश

June 3, 2026
Stormy wind and rain image

किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही !

June 3, 2026
Talegaon Dabhade Municipal Council plastic seizure drive 30 kg of plastic seized

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्लॅस्टिक जप्तीची धडक मोहीम; ३० किलो प्लॅस्टिक जप्त

June 3, 2026
Shalini Dahibhate from Bedse gets helping hand from Maval BJP house burnt in fire will be rebuilt

बेडसे येथील शालिनी दहिभाते यांना मावळ भाजपाकडून मदतीचा हात ! आगीत जळालेले घर पुन्हा बांधून देणार

June 3, 2026
Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.