भारतीय संस्कृती आणि परंपरा ह्या पुरातन असून विविध कलागुणांनी नटलेल्या आहेत. आपल्या देशात लोकनृत्याची एक प्राचीन परंपरा असून लोकनृत्याचे स्वरुप हे प्रदेशानुरुप बदलते. देशातील लोकनृत्याची ही परंपरा जोपासण्याचे काम चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांनी केले. ( Folk Dance Competition at Chaitanya International School Induri )
इंदोरी येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई ) इथे भारतीय लोकनृत्य कार्यक्रमाचे आयोजन आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या प्राचार्या जेसी मॅडम यांनी सरस्वती पूजनाने केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या अनेक ग्रुप्सने लोकनृत्याचे सादरीकरण केले. ह्यावेळी लोकनृत्य परिक्षणाचे काम सादळकर मॅडम, पुनम शेवकर आणि अनिता जाधव यांनी पाहिले.
लोकनृत्य आणि त्यांचे सादरीकरण;
अग्निगट – संबलपुरी ओड़िया लोकनृत्य
जलगट – महाराष्ट्रीयन गोंधळ लोकनृत्य
वायू गट – भांगडा पंजाबी लोक संस्कृती
पृथ्वीगट – राजस्थानी पारंपारिक काल बेलिया
विद्यार्थ्यांनी आपापल्या गटांमध्ये पारंपारिक पद्धतीने रंगभूषा आणि वेश परिधान केला होता. या नृत्य कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख झाली. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेला पालक वर्ग आणि विद्यार्थी यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. पालकांचे प्रतिनिधित्व करताना सादळकर मॅडम म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे शाळा करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्याबद्दल शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षकवृंद ह्यांचेही त्यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, प्रज्ञेश पित्रे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पर्यटकांच्या वाहनांच्या काचा फोडून चोरी करणारा आरोपी 3 तासात गजाआड; लोणावळा ग्रामीण पोलिसांची ‘लई भारी’ कामगिरी
– एक्सप्रेस वेवर भीषण अपघात! मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर पुण्याच्या लेनवर पलटी, 5 कारचे नुकसान, 2 जागीच ठार
– उपवास म्हणजे काय? तो का आणि कसा करावा? अधिक मास अन् श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने वाचावा असा लेख