गणपती बाप्पा हे हिंदूंचं आराध्य दैवत आणि गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाच्या मनाचा एक हळवा कोपरा. अत्यंत श्रद्धेने आणि मोठ्या भक्तिभावाने हा सण महाराष्ट्राभर अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बरोबरीने वडगाव मावळ शहरांमध्ये घरोघरी जवळपास 2 ते 3 हजार घरगुती गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यांच्या आगमनापूर्वी घरात लगबग सुरू झालेली असते. प्रत्येकजण आपापल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो. मग ते दिव्यांची आरस असो वा फुलांची तोरण, थर्माकोलचे आकर्षण मखर असो वा गणेशाची सुंदर मूर्ती असो!
घरगुती गणपतींना होणारी ही सजावट लक्षात घेता मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे आणि वडगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या संकल्पनेतून यावर्षी पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावट स्पर्धा 2023 हा धार्मिक उपक्रम हाती घेतला आहे. या स्पर्धेत सर्वांना सहभागी होता येईल. तसेच प्रत्येक कॅटेगरी मधून 3 नंबर काढण्यात येणार आहेत. ( Eco Friendly Home Ganesha Decoration Competition 2023 in Vadgaon Maval City )
स्पर्धेचे नियम व अटी
1) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नसेल.
2) मूर्तीची सुबकता, सजावट महत्वाची आहे.
3) सजावटीतून सामाजिक संदेश दिलेला असावा.
4) आराससाठी झालेला खर्च व वेळ याचा तपशील.
5) आरस करत असतानाचे फोटो अथवा व्हिडीओ असणे आवश्यक आहे.
6) इकोफ्रेंडली उपक्रम
7) केलेल्या आरासाबद्दल घरातील सदस्यांना असलेली माहिती.
8) गणेश उत्सवाबद्दल माहिती असावी प्रश्नांची उत्तरे देणे.
9) पर्यावरणपूरक सजावट असावी.
10) थर्माकोलचा वापर टाळावा.
11) परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
12) सहभाग घेताना कॅटेगरी निवडणे आवश्यक.
१३) प्रत्येक कॅटेगरी मधून तीन नंबर काढण्यात येतील.
14) सदर स्पर्धेचे परीक्षण मंगळवार दि 19 सप्टेंबर ते शनिवार दि 23 सप्टेंबर यादरम्यान सायंकाळी 4 ते 9 या वेळेत परीक्षक आपल्या घरी प्रत्यक्ष भेट देण्यास येणार आहेत.
स्पर्धा विषयक कॅटेगरी
1) सामाजिक 2) वैज्ञानिक 3) नैसर्गिक 4) ऐतिहासिक 5) काल्पनिक 6) इकोफ्रेंडली
बक्षीसांचे स्वरूप
प्रथम क्रमांक – 7000 /-
द्वितीय क्रमांक 5000 /-
तृतीय क्रमांक 3000 /-
कॅटेगरी प्रमाणे एकूण अठरा विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस 90,000 /- रुपये
सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र
स्पर्धा नावनोंदणी गुरुवार दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी पर्यंतच असणार आहे.
अधिक माहितीसाठी : 8983878722 / 9822838823
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– हिंजवडी, माण, मारूंजीसह ‘या’ 7 गावांचा लवकरच महापालिकेत समावेश होणार, खासदार बारणेंची माहिती; मुख्यमंत्र्यांचेही आश्वासन
– चैतन्य इंटरनॅशनल स्कूल इंदुरी येथील विद्यार्थ्यांनी लोकनृत्यातून घडवले वैभवशाली भारतीय संस्कृतीचे दर्शन
– वडगाव शहरात ‘ना नफा – ना तोटा’ तत्वावर वॉटर एटीएमची सुरुवात; आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन