केंद्रीय रसायने आणि खते, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी मंगळवारी, दिनांक 22 ऑगस्ट देशात खतांची उपलब्धता आणि वापराबाबत राज्यांच्या कृषी मंत्र्यांशी संवाद साधला. बैठकीदरम्यान त्यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि क्षेत्रीयस्तरावर पर्यायी खतांना चालना देण्याच्या प्रगतीचा आणि त्यासंदर्भात राज्यांनी सुरू केलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.
डॉ. मांडविया यांनी सर्व राज्यांना सांगितले की, देशात सध्या खतांचा 150 लाख टन साठा असून खतांची पुरेशी उपलब्धता आहे. हा साठा सुरू असलेल्या खरीप हंगामासह आगामी रब्बी हंगामासाठीही उपलब्ध आहे. डॉ. मांडविया यांनी शेत जमीन नापिक होऊ नये, यासाठी रासायनिक खतांचा अतिरेकी वापर कमी करण्याची गरज अधोरेखित करून केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘पीएम प्रणाम’ योजनेबद्दल सांगितले.
जमिनीची झीज कमी करण्यासाठी पर्यायी खतांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी स्लो-रिलीज सल्फर कोटेड युरिया (युरिया गोल्ड), नॅनो युरिया, नॅनो डीएपी या खतांच्या वापराचे आवाहन शेतकऱ्यांना करावे, अशा सूचना मांडविया यांनी यावेळी दिल्या. ( 150 lakh metric tones of fertilizers stock in country )
आज राज्यों/UTs के कृषि मंत्रियों के साथ VC के माध्यम से बैठक की। सभी राज्यों को आश्वासन दिया की देश में किसान भाइयों के लिए उर्वरक प्रयाप्त मात्रा में उपलब्ध है।
साथ ही राज्यों से आग्रह किया की केंद्र के साथ मिलकर वो उर्वरक की कालाबाजारी व डायवर्सन को रोकने के लिए कदम उठाएँ। pic.twitter.com/JnsU9DeUQv
— Dr Mansukh Mandaviya (मोदी का परिवार) (@mansukhmandviya) August 22, 2023
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– इनरव्हील क्लब आणि पवना मेडिकल फाऊंडेशन मार्फत ‘जीवन रक्षक अभियान’, नागरिकांना मिळाले जीव वाचवण्याचे धडे
– आधी निर्यातशुल्कात 40 टक्के वाढ, त्यानंतर कांद्याबाबत केंद्र सरकारचा दुसरा मोठा निर्णय, लगेच वाचा…
– मोरया प्रतिष्ठानकडून वडगावात पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावट स्पर्धा, पहिलं बक्षीस 7 हजार रुपये, वाचा स्पर्धेचे नियम । Vadgaon Maval