सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग सेवक तसेच विविध सामाजिक संघटनांमध्ये सक्रीय असलेले अमित विष्णु जाचक (वय 31, रा. कान्हे) यांचे बुधवारी रात्री अपघाती निधन झाले. तळेगाव चाकण रस्त्यावर इंदुरी इथे रस्ते अपघातात त्यांचे निधन झाले. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अमित जाचक हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर स्थानिकांनी रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने जनरल रुग्णालय तळेगाव दाभाडे इथे नेले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अमित यांच्या अकाली निधनाने तालुक्यातील युवा वर्गाला मोठा धक्का बसला आहे. ( Accidental death of Amit Vishnu Jachak near Talegaon Dabhade Induri )
सह्याद्री प्रतिष्ठान मावळमध्ये अमित जाचक हे सक्रीय होते. तसेच विविध सामाजिक संघटनांमध्ये समाकार्यातही ते अग्रेसर राहत होते. एक हसतमुख, मनमिळावू आणि सर्वांना मदत करणारे व्यक्तीमत्व हरपल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अमित यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील, पत्नी आणि अन्य कुटुंबीय आहेत. त्यांना या घटनेचा मोठा धक्का बसला असून आक्रोशाला सीमा राहिलेली नाही. तर, त्यांच्या मित्रवर्गालाही मोठा हादरा बसला आहे.
मृत्यूचा सापळाच बनलेल्या तळेगाव चाकण महामार्गावर आणखीन किती बळी गेल्यावर सरकारला जाग येणार, असा प्रश्न आता संतप्त नागरिक करत आहे. लूटमार, वेगाने वाहन चालवून सामन्यांचे बळी घेणे, बेदकारपणे वाहन चालवणे अनेक ठिकाणी खड्डे अशा समस्यांनी गांजलेल्या या रस्त्यावर विकासाचे यान कधी उतरवणार, हा सवाल येथील सामान्य जनता आता करत आहेत. ( Accidental death of Amit Vishnu Jachak near Talegaon Dabhade Induri )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– जय मल्हार ऑटो रिक्षा संघटनेचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन । Vadgaon Maval
– ‘संकल्प नशामुक्ती अभियान’ – मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्या 8 नशेखोरांवर लोणावळा शहर पोलिसांची कारवाई । Lonavala Crime
– ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले आणि काही तासात नवीन शिक्षक रुजू झाले; शिळींब गावातील हटके आंदोलनाची जिल्ह्यात चर्चा