व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अजित पवारांकडून ‘एक देश, एक निवडणूक’ पॉलिसीचं समर्थन; म्हणाले ‘पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात…’

देशातील सर्व निवडणूका एकत्र घेण्यासंदर्भात अनेकदा चर्चा होताना दिसल्या. मात्र आता ‘एक देश एक निवडणूक’ या मुद्द्यावर ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 1, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
ajit-pawar-narendra-modi

Photo Courtesy : Team Dainik Maval


देशातील सर्व निवडणूका एकत्र घेण्यासंदर्भात अनेकदा चर्चा होताना दिसल्या. मात्र आता ‘एक देश एक निवडणूक’ या मुद्द्यावर ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याचे अनेकदा या धोरणाचे समर्थन केले होते. त्यानंतर केंद्र सरकारने यासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे देशातील ‘एक देश एक निवडणूक’ ही चर्चा वास्तवात उतरण्याची शक्यता आहे. ( Ajit Pawar supports PM Narendra Modi One Nation One Election Policy )

केंद्र सरकारचा निर्णय काय?

केंद्र सरकारने गुरुवारी मोठा निर्णय जाहीर केलाय. ज्यात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ‘एक देश – एक निवडणूक’ हे तत्व देशात प्रत्यक्षात अंमलात येऊ शकतं का? असल्यास त्यासाठी कोणत्या तरतुदी, उपाययोजना कराव्या लागतील यासंदर्भात आढावा घेऊन शिफारशी करण्याची जबाबदारी या समितीकडे सोपवण्यात आली आहे.

अजित पवार यांचं समर्थन

केंद्राच्या या निर्णयाचा अनेक पक्षांकडून, नेत्यांकडून विरोध होत आहे. परंतू महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या धोरणाचे समर्थक केले आहे. तसे ट्विट अजितदादांनी केले आहे. ज्यात त्यांनी लिहिले आहे की; “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं मांडलेली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आहे. देशात अनेक राज्यात सातत्यानं कुठेना कुठे निवडणुका होत असतात. यामुळे वेळ, पैसा, मनुष्यबळाचा अपव्यय होतो. विकासकामांकडे पुरेसं लक्ष देता येत नाही, त्यामुळे विकास खुंटतो. ‘वन नेशन, वन इलेक्शन’मुळे एकाचवेळी निवडणुका होतील आणि उर्वरित वेळ विकासकामांना गती देण्यासाठी उपयोगात आणता येईल. प्रधानमंत्री महोदयांनी वेळोवेळी मांडलेल्या आणि केंद्र सरकारनं आता पुढाकार घेतलेल्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेकडे सर्वांनी सकारात्मकपणे पहावं. केंद्राची ही भूमिका समर्थनीय आणि स्वागतार्ह आहे.”

प्रधानमंत्री आदरणीय @narendramodi जी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं मांडलेली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आहे. देशात अनेक राज्यात सातत्यानं कुठेना कुठे निवडणुका होत असतात. यामुळे वेळ, पैसा, मनुष्यबळाचा अपव्यय होतो. विकासकामांकडे…

— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 1, 2023

“काळाप्रमाणे व्यवस्थेत सुधारणा अपरिहार्य असतात. परंतु त्या सुधारणा देश आणि लोकहिताच्या असल्या पाहिजेत. प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली विद्यमान केंद्र सरकारनं ते धाडस दाखवलं आहे. केंद्राच्या या भूमिकेमुळे देशाच्या आणि राज्यांच्या समोरचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. यापूर्वी ‘वन नेशन, वन टॅक्स’ हा निर्णय मोदी जी यांच्या सरकारनं सर्व राज्यांच्या सहमतीनं अंमलात आणला आणि यशस्वी करुन दाखवला. त्याच धर्तीवर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही भूमिका देशवासियांकडून मनापासून स्वीकारली जाईल असा विश्वास आहे. मी आणि राष्ट्रवादी काँग्रस पक्ष या भूमिकेचं स्वागत करतो.” असे अजित पवार म्हणाले आहेत. ( Ajit Pawar supports PM Narendra Modi One Nation One Election Policy )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ई-पीक पाहणी म्हणजे काय? शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाईल ॲपवर पीक पाहणीच्या नोंदी करण्याचे आवाहन, वाचा अधिक
– “बिबट्या वैरी नाही तर शेजारी…”
– मावळ तालुक्यातील 47 गावांतील पोलिस पाटील पदांचे आरक्षण जाहीर; पाहा आरक्षणासह गावांच्या नावांची संपूर्ण यादी


Previous Post

तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाच्या छतावर चढून मनोरुग्णाचा धुडगूस – व्हिडिओ

Next Post

वैकुंठवासी मृदंगमणी दत्तोबा महाराज शेटे यांचे पुण्यस्मरण आणि गुरुपौर्णिमा निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Nandkumar-Shete-Shetewadi-Maval

वैकुंठवासी मृदंगमणी दत्तोबा महाराज शेटे यांचे पुण्यस्मरण आणि गुरुपौर्णिमा निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Industrial belt in Maval area will get big boost Planning to build new railway freight yard in Talegaon area

मावळ भागातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन

June 8, 2026
Crime

धक्कादायक! तळेगाव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
Crime

Vadgaon Maval : युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपीला जेरबंद करण्यास यश

June 8, 2026
Vadgaon Maval Police Station

वडगाव मावळमध्ये जनावरांची अमानुष वाहतूक उघड, दोन ट्रक ताब्यात, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.