ब्रिटनच्या ( Britain ) महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय ( Queen Elizabeth II ) यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले आहे. बंकिंगहम पॅलेसने याबाबत अधिकृतपणे माहिती दिली आहे. एलिझाबेथ द्वितीय यांनी गुरुवारी (8 सप्टेंबर) रोजी स्कॉटलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला. ( Queen Elizabeth II passes away )
वयोमान अधिक असल्याने आणि मागील बऱ्याच काळापासून त्यांची प्रकृती देखील नादुरुस्त होती. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीकडे सतत लक्ष ठेवून होते. त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही सुरू होते. मात्र, गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. महाराणी एलिझाबेथ द्वितीय या तब्बल 70 वर्षांपासून ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. वर्ष 1952 साली त्या या पदावर विराजमान झाल्या होत्या. महाराणी एलिझाबेथ यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र चार्ल हे ब्रिटनचे राजे असतील. ( Queen Elizabeth II has died aged 96 )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
The Queen died peacefully at Balmoral this afternoon.
The King and The Queen Consort will remain at Balmoral this evening and will return to London tomorrow. pic.twitter.com/VfxpXro22W
— The Royal Family (@RoyalFamily) September 8, 2022
ब्रिटनच्या सर्वाधिक काळापर्यंत राज्य करणाऱ्या महाराणी…
महाराणी एलिझाबेथ द्वितीय या ब्रिटनच्या सर्वाधिक काळापर्यंत राज्य करणाऱ्या महाराणी होत्या. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी झाला होता. लंडनमध्ये ड्यूक जॉर्ज सहावे आणि राजमाता राणी एलिझाबेथ यांच्या घरी त्यांचा जन्म झाला होता. वडील एडवर्ड आठवे यांच्या पदत्यागानंतर त्यांनी 1936 मध्ये राज्याची सूत्रे हाती घेतली.
राजे चार्ल यांच्याकडून शोकसंदेश…
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर राजे चार्ल यांच्याकडून शोकसंदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘माझी प्रिय आई, राणी यांचे निधन हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी सर्वात मोठा दुःखाचा क्षण आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.
I had memorable meetings with Her Majesty Queen Elizabeth II during my UK visits in 2015 and 2018. I will never forget her warmth and kindness. During one of the meetings she showed me the handkerchief Mahatma Gandhi gifted her on her wedding. I will always cherish that gesture. pic.twitter.com/3aACbxhLgC
— Narendra Modi (@narendramodi) September 8, 2022
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख ( PM Narendra Modi Condoles Death Of Queen Elizabeth II )
महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ‘ महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना आमच्या वेळच्या दिग्गजांच्या रुपात स्मरणात ठेवले जाईल. त्यांनी सार्वजनिक जीवनात सन्मान दाखवला. त्यांच्या निधनामुळे दु:ख झाले आहे आणि माझ्या संवेदना त्यांचे कुटुंब आणि ब्रिटनच्या जनतेसोबत आहेत,’ असे पंतप्रधान मोदींनी ट्विटद्वारे म्हटले आहे. ( Queen Elizabeth II passes away PM Modi Condoles )
अधिक वाचा –
@71 डन..!! विराट कोहलीच्या कोट्यवधी चाहत्यांना गुडन्यूज! तब्बल 1020 दिवसांची प्रतिक्षा संपली
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! पीएम किसानच्या लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ