मावळ तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान कार्ला येथील श्री एकविरा देवी देवस्थानच्या नवरात्र उत्सवाला दिनांक 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी याकाळात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यामुळे भाविकांची आणि पर्यायाने वाहनांची होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने वाहतूकीसंदर्भात महत्वाचे आदेश काढले आहेत.
यात्रा कालावधीत कार्ला फाटा ते वेहेरगाव या रस्त्यावर आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन या दोन्ही मार्गावर जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे. सर्व वाहन चालकांनी व नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ( Ekvira Devi Navratri Festival 2023 Access to heavy vehicles closed for 10 days between Karla Phata and Vehergaon )
नवरात्री उत्सवानिमित्त कार्ला गडावरील श्री एकविरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता या भागात होणारी वाहतुकी कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून कार्ला फाटा ते वेहेरगाव येथील श्री एकविरा देवी पायथा मंदिर दरम्यान दिनांक 15 ऑक्टोबर 2023 ते दिनांक 24 ऑक्टोबर 2023 या कालावधीत पूर्णवेळ अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेश बंद राहणार असल्याची अधिसूचना पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
या सोबतच राष्ट्रीय मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी यात्रा काळातील शेवटच्या तीन घट माळा असलेल्या दिवशी अर्थात दिनांक 21 ऑक्टोबर ते दिनांक 23 ऑक्टोबर 2023 दरम्यान सकाळी 6 ते रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान मुंबई लेनवर वडगाव फाटा ते लोणावळा आणि पुणे लेनवर खंडाळा – कुसगाव टोलनाका ते वडगाव दरम्यान सर्व जड – अवजड वाहनांना बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
अधिक वाचा –
– मनोज जरांगे पाटलांच्या अंतरवाली सराटी येथील विराट सभेसाठी मावळ तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून मोठी मदत!
– धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना; जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती
– मावळ तालुक्यातील विविध गावांच्या पोलिस पाटील पदांचा निकाल जाहीर; 12 गावात महिला पोलिस-पाटील, वाचा संपूर्ण यादी