मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी ते सामना करत होते. परंतू उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक सुपरहिट सिनेमांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा बनवली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या चरित्र कलाकारांमध्ये अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे नाव अग्रस्थानी होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. मंगळवारी मध्यरात्री त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे.
- रवींद्र बेर्डे यांनी साधारण 300 हून अधिक मराठी चित्रपटातून काम केले होते. मात्र मागील काही वर्षांपासून आजा्राने त्रस्त असल्याने अभिनेते रवींद्र बेर्डे अभिनयापासून दूर होते. मात्र चांगले नाटक, चित्रपट ते आवर्जून पाहत. 1995 साली ‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटक करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. 2011 पासून ते घशाच्या कर्करोगाशी लढत होते. गेले काही दिवस टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही सुरू होते.
भावपूर्ण श्रद्धांजली!
आपल्या सहजसुंदर, सदाबहार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हरहुन्नरी कलाकार रवींद्र बेर्डे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे. त्यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वातला एक तारा हरपला आहे.
रवींद्र बेर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण… pic.twitter.com/9jsUMdUbjv— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 13, 2023
लक्ष्मीकांत बेर्डे आणि रवींद्र बेर्डे हे सख्खे बंधू, तर नाट्य दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे हे त्यांचे चुलत बंधू. 1965 पासून आकाशवाणीवर नभोनाटयांचे दिग्दर्शन करता करता रवींद्रे बेर्डेंचा नाट्यसृष्टीशी संबंध आला. 1987 साली त्यांना पहिल्यांदा नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी आजवर 31 नाटकांमधून भूमिका केल्या होत्या. मालिका, जाहिराती, चित्रपट अशा विविध माध्यमातून त्यांनी काम केले होते. ‘होऊन जाउ दे’, ‘हमाल दे धमाल’, ‘थरथराट’, ‘चंगु मंगु’, ‘उचला रे उचला’, ‘बकाल’, ‘ धडाकेबाज’, ‘गंमत जंमत ‘, ‘ झपाटलेला’, ‘भुताची शाळा’ अशा कित्येक मराठी चित्रपटांतून त्यांनी काम केले होते. ( Veteran Marathi Actor Ravindra Berde Passed Away At The Age Of 78 )
अधिक वाचा –
– ‘मावळचा जलनायक’ रिल्सचा प्रथम क्रमांक! आदित्यराजे मराठे ठरला ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय रिल्स स्टार’ । Sunil Shelke Birthday
– ‘पाणी योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करा; जनरल मोटर्स कामगारांना न्याय द्या’ : आमदार सुनिल शेळकेंची अधिवेशनात मागणी
– तुमच्या गावच्या सरपंचाला किती पगार मिळतो? पाहा ग्रामपंचायत लोकसंख्यानिहाय सरपंच-उपसरपंच यांना मिळणारे मानधन