राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ तालुक्यातील कल्हाट गावचे सुपुत्र, मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष रामदास बबन करवंदे, माजी सरपंच संतोष शांताराम करवंदे, भाऊसाहेब धनवे, संभाजी मारुती करवंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नागपूर इथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ज्यांच्या व्यवस्थापन तंत्राची जगाने दखल घेतली, त्या डबेवाले संघटनेच्या समस्या आणि मागण्यांबाबत स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन अजितदादांनी यावेळी दिले. यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या समवेत किसान सेलचे अध्यक्ष दिगंबर आगिवले, कल्हाट गावचे सरपंच शिवाजी करवंदे, उपसरपंच देवदास धनवे, माजी सरपंच तानाजी करवंदे आदी. मान्यवर उपस्थित होते. ( ramdas karvande president of mumbai dabewala association joined NCP in presence of Ajit Pawar )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! मावळ तालुक्यातील पाणी योजनांच्या कामांची चौकशी होणार; मंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश
– ‘अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ करा’, खासदार श्रीरंग बारणेंचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पत्र
– मोठी बातमी! मावळात ‘दादा’ गटाच्या अनेक नेत्यांचा ‘साहेब’ गटात प्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नव्याने नियुक्त्या जाहीर