व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेत इथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पांचे पाहुण्यांकडून तोंडभरून कौतूक । Maval News

पुणे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कामशेत येथील सुमन रमेश तुलसानी टेक्निकल कॅम्पसमध्ये भरविण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 18, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Science-Exhibition

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे जिल्हा परिषद,पंचायत समिती मावळ, तालुका मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ व मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कामशेत येथील सुमन रमेश तुलसानी टेक्निकल कॅम्पसमध्ये भरविण्यात आले आहे. गुरुवारी (दि. 18) मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहिरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, माध्यमिक शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांंच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

गुरूवार दिनांक 18 जानेवारी ते 20 जानेवारी पर्यंत हे विज्ञान प्रदर्शन असणार असून पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविलेला प्रकल्प प्रदर्शनात सादर करण्यात आले आहे. यावर्षी प्रथमच दिव्यांग व आदिवासी गटातून प्रकल्प सादर करण्यात आले आहेत. प्रदर्शनात पुणे जिल्ह्यातील 240 शाळेतील 350 विद्यार्थी व 48 परिचर आणि विज्ञान शिक्षकांनी 180 प्रकल्प सादर केलेत. ( Inauguration of Pune District Level Science Exhibition at Kamshet Maval Taluka )

यावेळी उपशिक्षणाधिकरी अनंत दाणी, छाया महिंद्रकर, निलेश धानापुणे, प्रणिता कुमावत, गटशिक्षणाधिकारी मावळ सुदाम वाळुंज,शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वाहिले,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष नंदकुमार सागर, उपाध्यक्ष राजेश गायकवाड, विस्तार अधिकारी सुधीर चटणे, तुलसानी काॕलेज प्राचार्या श्रध्दा चव्हाण, तालुका अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, जिल्हा अध्यक्ष रोहिदास एकाड, तालुका अध्यक्ष सुरेश सुतार, अभिमन्यु शिंदे यांंच्यासह जिल्ह्यातील शिक्षक विद्यार्थी उपस्थीत होते.

तसेच यावेळी जिल्हा गुणवत्ता स्तर निश्चिती प्राप्त करणाऱ्या जिल्ह्यातील 34 शाळांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे व विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन सर्व केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती पं. स मावळ, मुख्याध्यापक संघ, विज्ञान व गणित संघ यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुत्रसंचालन मुकुंद तनपुरे,ज्योती लावरे तर आभार गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी मानले.

पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी कमलाकांत म्हेत्रे व मावळ गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी मावळ तालुक्यासह जिल्ह्यातील विज्ञान प्रेमी विद्यार्थांंनी,शिक्षकानी तसेच पालकांनी या विज्ञान प्रदर्शनाला उपस्थीत राहावे व प्रकल्प पाहण्यासाठी यावे, असे आहवान केले.

अधिक वाचा –
– मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, महामार्गावर 6 तासांचा ब्लॉक, लगेच वाचा । Mumbai Pune Expressway
– मावळमधील कान्हे गावात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत महाशिबिराचे उद्घाटन । Maval News
– नानोली तर्फे चाकण इथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न; दत्तात्रय पडवळ यांच्यामार्फत सर्व विजयी स्पर्धकांना टीशर्ट वाटप


dainik maval jahirat

Previous Post

कला, क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना : दिनांक 26 ते 28 जानेवारी दरम्यान होणार ‘मावळ फेस्टिवल’ । Maval Festival

Next Post

’22 जानेवारीला वडगावमधील मांस व मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवा’, राष्ट्रवादीकडून पोलिस आणि नगरपंचायत प्रशासनाला निवेदन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
vadgaon-maval-ncp

'22 जानेवारीला वडगावमधील मांस व मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवा', राष्ट्रवादीकडून पोलिस आणि नगरपंचायत प्रशासनाला निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.