टोकियो ऑलिंपिक ( Tokyo Olympics ) स्पर्धेत इतिहास रचल्यानंतर आता भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा ( Neeraj Chopra ) याने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ज्यूरिख येथे झालेल्या डायमंड लीग ( Diamond League Final ) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नीरजने रेकॉर्डब्रेक कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे. 2010 मध्ये सुरू झालेल्या डायमंड लीगच्या यंदाच्या 13व्या हंगामात जेतेपद मिळवणारा नीरज पहिलाच भारतीय ऍथलीट बनला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
Incredible feeling to close the 2022 season as Diamond Trophy winner. The atmosphere was brilliant and it was extra special to have my uncle and friends in the stadium. Happy to win my first ???? trophy!
Sabhi ke pyaar aur support ke liye bahut bahut dhanyawad. ???????? ???????? pic.twitter.com/zfVlMHUEIx
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) September 9, 2022
डायमंड लीगच्या अंतिम सामन्यात नीरजची सुरुवात तशी चांगली झाली नव्हती. त्याचा पहिलाच थ्रो फाऊल ठरला होता. मात्र, दुसऱ्या फेरीत त्याने 88.44 मीटर अंतावर भाला फेकत आघाडी घेतली. हा त्याचा सर्वोत्कृष्ट थ्रो ठरला.
Golds,Silvers done, he gifts a 24-carat Diamond ???? this time to the nation ????????????
Ladies & Gentlemen, salute the great #NeerajChopra for winning #DiamondLeague finals at #ZurichDL with 88.44m throw.
FIRST INDIAN???????? AGAIN????????#indianathletics ????
X-*88.44*????-86.11-87.00-6T???? pic.twitter.com/k96w2H3An3
— Athletics Federation of India (@afiindia) September 8, 2022
तिसऱ्या फेरीत 88.00 मीटर, चौथ्या फेरीत 86.11 मीटर, पाचव्या फेरीत 87.00 मीटर आणि सहाव्या फेरीत त्याने 83.60 मीटर दूर थ्रो फेकले. अखेर दुसऱ्या फेरीतील थ्रोच्या जोरावर तो विजेता बनला. ( Neeraj Chopra Becomes First Indian To Win Diamond Trophy )
अधिक वाचा –
@71 डन..!! विराट कोहलीच्या कोट्यवधी चाहत्यांना गुडन्यूज! तब्बल 1020 दिवसांची प्रतिक्षा संपली
तब्बल 70 वर्षे ब्रिटनच्या महाराणी राहिलेल्या एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन; जगभरातून श्रद्धांजली