पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी लहान व्यावसायिकांकडून तात्पुरते स्टॉल उभारण्यात येतात. ग्रामीण भागातील या छोट्या विक्रेत्यांना पुणे जिल्हा परिषदेकडून असे स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, या योजनेला ‘अमृतरथ’ असे नाव देण्यात आले आहे. मुळशी तालुक्यातील ( Mulshi Taluka ) शेरे गावात एका लाभार्थ्याला नुकतेच अमृतरथाचे वाटप करण्यात आले. ज्याचे गुरुवारी (8 सप्टेंबर) उद्घाटन करण्यात आले. ( Amrutarath Stall Inauguration )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुळशी तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप जठार यांच्या सहकार्यातून आणि शेरे ग्रामपंचायतीचे ( Shere Village ) सरपंच संतोष ढमाले आणि ग्रामसेवक इंद्रजित यादव, ग्रामपंचायत शेरे यांच्या विशेष प्रयत्नातून गावातील गरजू सारिका कुंभार यांना अमृतरथ योजना अंतर्गत स्टेनलेस स्टीलचा फूड स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आला.
श्रीराम महिला बचत गटाच्या अध्यक्ष सारिका गणेश कुंभार यांना गुरुवारी हा स्टॉल सुपूर्द करण्यात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लाभार्थी महिलेसह शेरे गावचे विद्यमान सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ( Amrutarath Stall Inauguration In Shere Village Of Mulshi Taluka Beneficiary Expressed Ssatisfaction )
अधिक वाचा –
आमदार शेळकेंच्या प्रयत्नांमुळे मावळकरांचे स्वप्न होणार पुर्ण; तालुक्यात लवकरच ‘ही’ यंत्रणा उभारणार
एकविरा देवस्थानच्या ऐतिहासिक वस्तू पुरातत्व विभागाकडून देवस्थानकडे सुपूर्द करण्याची मागणी