यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील क्षमतावाढ प्रकल्पातील वळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने खोपोली बाह्यमार्गात मुंबई वाहिनीवर सोमवारपासून बदल करण्यात आला आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
नव्या बदलानुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने खोपोली गावाकडे जाण्यासाठी हलक्या व जड अवजड वाहनांनी मुंबई वाहिनीच्या उजव्या बाजूच्या दोन लेनमध्ये तर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी डाव्या बाजूच्या तीन लेनमध्ये वाहतूक करावी. ( Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway Khopoli News )
ह्या वाहतूकीच्या बदलामुळे द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी 9822498224 या क्रमांकावर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी करण्याचे ॲड. राहुल नार्वेकर यांचे निर्देश
– मोठी बातमी! 5 हजार 605 अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार – मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा
– इनरव्हील क्लब तर्फे तळेगाव दाभाडे शहरात 100 विद्यार्थीनींची मोफत नेत्र तपासणी । Talegaon Dabhade