इंदुरी गावातील ( Induri Village Maval ) चव्हाणवाडा, संघविहार भागातील नागरिकांना मागील अनेक दिवसांपासून विजेच्या सप्लायबाबतची समस्या ( Electricity Problem ) जाणवत होती. विजेचा आवश्यक दाबाने पुरवठा होत नसल्याने या भागातील घरात डीम लाईट (कमी प्रकाशमान) येत होती. या समस्येबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळचे ( MNS ) संदिप शिंदे यांनी आवाज उठवत संबंधित विभागाला सातत्याने समस्या दूर करण्यासाठी पाठपुरवठा केला. त्यानंतर आता या भागातील विजेची समस्या मिटली आहे.
मावळ तालुक्यातील इंदुरी येथील चव्हाणवाडा आणि संघविहार येथील सर्व रहिवाशांच्या घरातील लाईट कनेक्शन एकाच फेजवर असल्यामुळे सर्वांच्या घरामध्ये 190 ते 195 व्होल्टचाच सप्लाय होत होता. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये डीम लाईट येत असल्याने घरातील उपकरणे व्यवस्थित चालत नव्हते. ( Electricity Problem In Induri Village )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
विज वितरण विभाग (एमएससीबी) अधिकाऱ्यांशी याबद्दल बोलून आणि पाठपुरावा करुन एका फेजवरील लोड कमी करुन अर्धा लोड दुसऱ्या फेजवर टाकण्यात आला. त्यामुळे प्रत्येक घरातील विजेची उपकरणे व्यवस्थित चालू लागली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्ष व विधी विभागाचे संदीप शिंदे ( MNS Sandeep Shinde ) यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. ( Electricity Problem In Induri Village Solved Due To MNS Follow Up )
अधिक वाचा –
मावळमध्ये मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार? ‘या’ भेटीने चर्चेला उधाण
‘राजगर्जना’ लवकरच…! मनसैनिकांसाठी गुडन्यूज, राज ठाकरे ‘या’ दिवशी उतरणार मैदानात, वाचा कार्यक्रमपत्रिका