खडकी (पुणे) ( Pune ) येथून घरफोडी करत दागिने आणि चारचाकी मोटार घेऊन फरार झालेल्या अट्टल चोरट्यास जेरबंद करण्यात लोणावळा पोलिसांना ( Lonavla Police ) यश आले आहे. मात्र, या चोरट्याचे तीन साथीदार फरार झाले आहेत. रामजीतसिंग रणजितसिंग टाक (वय 19, रा. गाडीतळ, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
त्याचे साथीदार आरोपी निहालसिंग टाक, लकीसिंग टाक आणि राहुलसिंग भुंड (सर्व रा. गाडीतळ, हडपसर, पुणे) हे घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झालेत. ( Car Thief Caught By Lonavala Police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दिनांक 3 नोव्हेंबर) सकाळी लोणावळा पोलिसांना खबर मिळाली की, खडकी येथे एका घरात घरफोडी करून चोरटे तेथील मोटार (एमएच 12 युडी 8001) चोरून पसार झाले आहेत. मोटारीचे जीपीएस लोकेशन लोणावळा दाखवत असून सदर गाडी ही नांगरगाव औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीपुढे उभी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी स्थानिक तरूणांची मदत घेत सापळा रचत रामजीतसिंग टाक याला ताब्यात घेतले. मात्र, त्याचे साथीदार पसार झाले. टाक याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत 30 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अधिक वाचा –
– दुर्दैवी! रेल्वेच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू, कामशेतमधील घटना
– ‘आमदार साहेब हे वागणं बरं नव्हं..’, माजी आमदारांचा आजी आमदारांवर निशाणा I Maval Politics