मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विरूद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात सामना होत आहे. मावळ लोकसभेच्या निमित्ताने शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने आले आहेत. दोन वेळच्या खासदाराची हॅटट्रीक साठीची लढत विरुद्ध पक्ष बदललेल्या तगड्या उमेदवाराची लढत असा हा सामना रंगणार आहे. दोन्ही उमेदवारांनी आपापला प्रचार सुरु केला असून नुकतीच दोन्ही बाजूंकडून प्रचार नियोजनाची बैठक घेण्यात आली. यात पिंपरी येथील एका कार्यक्रमात मविआचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी मतदारांना अजब सल्ला दिलाय. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
पिंपरी-चिंचवड भागात संजोग वाघेरे प्रचार करण्यासाठी आले असता त्यांनी एक धक्कादायक विधान केले. राहटणी येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात संजोग वाघेरे म्हणाले की, ‘मावळ लोकसभा निवडणूक ही धनशक्ती विरूद्ध जनशक्ती असून मी सगळ्यांना सांगेल की विरोधक जे पैसे वाटतील ते सर्वांनी घ्या. मात्र मतदान महाविकास आघाडीला करा,’ असे आवाहन वजा सल्लाच वाघेरे यांनी मतदारांना दिला. तसेच यात पुढे बोलताना, पिंपरी चिंचवड शहारातून अडीच ते पावणेतीन लांखांचे मताधिक्य मिळेल. तर खाली पनवेल, उरण आणि कर्जत येथे दोन लाखाचं मताधिक्य मिळून एकूण पाच ते साडेपाच लाखाच्या फरकाने निवडून येणार, अशी खात्री देखील वाघेरे यांनी व्यक्त करून दाखवली. ( Shocking statement of Maval Lok Sabha Shivsena UBT candidate Sanjog Waghere )
अधिक वाचा –
– वडगाव येथे मावळ तालुका महाविकास आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन । Vadgaon Maval
– मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ आणि निष्ठावंत वारकरी बांधवांना ‘मावळ रत्न’ पुरस्कार
– लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत मावळ तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्का, अनेकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश