मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मंगळवारी (दि. 30 एप्रिल) ईर्टीगा कारचा किलोमीटर 23 च्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जण जखमी झाले आहेत. एक्सप्रेस वेवरील मुंबई लेनवर हा अपघात घडला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कार अनकंट्रोल झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. अपघातात कारचा (क्रमांक एमएच 05 बीएस 4170) चुरा झाला. अपघातामध्ये मनीषा बर्वे (वय 40 वर्षे रा. डोंबिवली) यांना गंभीर दुखापत होऊन त्या जागीच मयत झाल्या. तर सोनाली बर्वे (वय 35 वर्षे) आणि दिवेश बर्वे (वय 21 वर्षे डोंबिवली) यांना गंभीर दुखापती झाल्याने खाजगी वाहनाने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे रवाना केले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. तसेच अपघातामध्ये सुमन बर्वे (वय 68 वर्ष), चालक संदीप दिलीप बर्वे (वय 48 वर्ष), अश्वजीत बर्वे (वय 13 वर्ष) प्रणव बर्वे (वय 5 वर्ष) आदेश बर्वे (वय 3 वर्ष) अनिकेत बर्वे (वय 19 वर्ष) प्रिया बर्वे (वय 18 वर्ष) गौरव बर्वे (वय 17 वर्ष) कियारा बर्वे (वय 6 महिने) सर्व रा. डोंबिवली जि. ठाणे यांना किरकोळ स्वरूपाचा दुखापती झाल्या, त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी वाहनाने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे रवाना करण्यात आले.
सदर अपघातातील वाहन रस्त्याच्या खाली असल्याने वाहतूक सुरळीत चालू होती. सदर ठिकाणी पोनि/ गौरी मोरे मॅडम महामार्ग पोलीस पनवेल विभाग, खालापूर पोलीस ठाणे कडील अधिकारी व स्टाफ, म.पो.केंद्र पळस्पेकडील अधिकारी व स्टाफ, देवदुत टीम, आयआरबी कडील स्टाफ, अपघातग्रस्त मदत टीम इतर वाहन चालक उपस्थित होते. पुढील कारवाई खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. ( Fatal car accident on Mumbai-Pune Expressway woman died on the spot )
अधिक वाचा –
– मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांची माध्यम कक्षाला भेट । Maval Lok Sabha
– मावळात हे चाललंय काय ? जुन्या वादातून तरूणावर कोयत्याने वार, वाचवायला गेलेल्या तरुणावरही हल्ला । Kamshet News
– पुणे जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, सुटी न दिल्यास ‘इथे’ करा तक्रार । Pune News