वडगांव मावळ येथे भारतीय जनता पार्टी मावळ तालुका बूथ कमिटीची महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला पक्षाचे प्रमुख तालुका पदाधिकारी, बूथ अध्यक्ष, सुपर वॉरियर्स आणि पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सोमवारी, दिनांक 1 मे रोजी बुथ कमिटीची ही मासिक बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीत मावळ लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी बुथ स्तरावरील नियोजन करण्यात आले. तसेच मावळ विधानसभेतून श्रीरंग बारणे यांना मोठे मताधिक्य मिळवून देत विजयी करण्यासाठी नियोजन कऱण्यात आले. ( Maval Lok Sabha Election BJP booth committee meeting for Shrirang Barane at Vadgaon )
यावेळी बूथ स्तरावरील पदाधिकारी कार्यकर्ते व बूथ अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून घरोघरी मतदारांशी संपर्क साधने आदी प्रचाराचे नियोजन करण्यात आले. या बैठकीला माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
अधिक वाचा –
– मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांची माध्यम कक्षाला भेट । Maval Lok Sabha
– मावळात हे चाललंय काय ? जुन्या वादातून तरूणावर कोयत्याने वार, वाचवायला गेलेल्या तरुणावरही हल्ला । Kamshet News
– पुणे जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, सुटी न दिल्यास ‘इथे’ करा तक्रार । Pune News