वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात संपन्न झालेल्या या सोहळ्याची सुरुवात श्रींच्या अभिषेकाने झाली. सकाळी संपन्न झालेल्या साखरपुडा प्रसंगी सरिता श्रीरंग बारणे, सारिका सुनील शेळके तसेच माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर वधू वरांचा हळदी समारंभ, वऱ्हाडी मंडळींचे भोजन तसेच नवरदेवांची भव्य मिरवणूक पार पडली. यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात पदाधिकारी व वऱ्हाडी मंडळींनीही सहभाग घेतला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सायंकाळी हजारो संख्येने उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पडला. यावेळी हभप मंगल महाराज जगताप, खासदार श्रीरंग बारणे व माजी महापौर संजोग वाघेरे यांनी वधू वरांना शुभाशीर्वाद दिले तर आमदार सुनील शेळके, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ( Community wedding of 11 couples at Vadgaon Maval )
याप्रसंगी सोहळ्यातील अन्नदान केल्याबद्दल बाळासाहेब तुमकर व भारती तुमकर यांचा तर जोडप्यांना संसारपयोगी भांडी दिल्याबद्दल उद्योगपती संजय भोज व मधुगंधा भोज तसेच वधुंना चांदीचे अलंकार देणारे सुशील बहिरट यांचा प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला, वधू वरांना लकी ड्रॉ द्वारे बक्षीस म्हणून वस्तूही देण्यात आल्या.
प्रास्ताविक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांनी तर स्वागत सोहळा समिती अध्यक्ष रोहिदास गराडे यांनी केले, सूत्रसंचालन सचिव गणेश विनोदे, संचालक गणेश ढोरे यांनी केले व आभार संचालक अतुल राऊत यांनी मानले. सोहळा समितीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब तुमकर, कार्यक्रम प्रमुख अरुण वाघमारे, पदाधिकारी नंदकुमार ढोरे, योगेश वाघवले, संभाजी येळवंडे, अभिजीत ढोरे, अनिल कोद्रे, संतोष निघोजकर तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी विलास दंडेल, प्रवीण ढोरे, राजेंद्र वहिले, काशिनाथ भालेराव, अर्जुन ढोरे, विवेक गुरव सोमनाथ धोंगडे, अजय धडवले, सुनील शिंदे, शंकर ढोरे, खंडू काकडे, महेश तुमकर, शरद ढोरे, अविनाश कुडे, सतीश गाडे, विनय लवंगारे, अनिकेत भगत, दर्शन वाळुंज, अक्षय बेल्हेकर, गणेश झरेकर, संजय दंडेल, कार्तिक यादव, प्रमोद घाग, केदार बवरे आदींसह महीला पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले.
सोहळ्यातील वैशिष्टे :
– रक्तदान शिबिर
– वऱ्हाडी मंडळींची बैठक व भोजन व्यवस्था
– नवरदेवाची भव्य मिरवणूक
– वधू वरांना संसारपयोगी भांडी, मनगटी घड्याळ, आकर्षक भेट
– वधूंना चांदीचे अलंकार
– लकी ड्रॉ द्वारे सर्व जोडप्यांना उपयुक्त वस्तूंची भेट
अधिक वाचा –
– थंडगार पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला, तळेगावजवळ कुंडमळा येथे दोन मुलांचा बुडून मृत्यू । Maval News
– काले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगिता मोहोळ बिनविरोध । Pavananagar News
– श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी मावळ भाजपाची बुथ कमिटी सज्ज! मतदारांशी घरोघरी जाऊन साधणार संवाद । Maval News