लोणावळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वलवण धरणांमधील पाणी पातळी कमी झाल्याने शहरातील काही भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत आहे. पंप चालवण्यासाठी आवश्यक असणारे पाणी उपलब्ध होत नसल्याने पंप वारंवार बंद करावा लागत आहे, याबाबत टाटा कंपनीचे व्यवस्थापक यांना कळविण्यात आले असून पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरातील नागरिकांनी पुढील काही दिवस पाणी जपून वापरावे व नगरपरिषदेकडून पाणी सोडल्यानंतर पाण्याची साठवणूक करून ठेवावी, असे आवाहन लोणावळा नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोणावळा शहराला टाटा कंपनीच्या वलवन धरणामधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणातील पाण्याची पातळी जमिनीच्या लेवलला गेली आहे. यामुळे अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पंप अखंडित चालवणे शक्य होत नसल्याने पंप बंद करावा लागत आहे. याबाबत टाटा कंपनीला कळवण्यात आले असून कंपनीकडून शिरवता धरणांमधून वलवन धरणात पाणी घेण्यात येणार आहे. ( Lonavala Nagar Parishad appeal to citizens regarding water conservation )
याकरिता व पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीमध्ये उपलब्ध होणारा पाणीपुरवठा शहरात सोडण्यात येईल नागरिकांनी पाणी जपून वापरावे व साठवून ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे. शिरवता धरणामधून वलवन धरणात पाणी आल्यानंतर स्थिर साठ्यातून पुन्हा नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यानच्या कालावधीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे, आवाहन लोणावळा नगरपरिषदेने केले आहे.
अधिक वाचा –
– अधिकारी आणि उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत मावळ लोकसभा निवडणूकीसाठी मतदान यंत्रांची सरमिसळ संपन्न । Maval Lok Sabha
– “श्रीरंगाचे रंग आपण पहिले आहेत..निवडून दिल्यावर पुन्हा तोंड दाखवत नाही..असे रंग दाखवणारे खासदार पुन्हा नको”
– लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश, मावळमधील ‘हा’ बाजार राहणार बंद