व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय ! आर्थिक दुर्बल घटकांना नोकरी, शिक्षणात 10 टक्के आरक्षण

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने तीन विरुद्ध दोन न्यायमूर्ती अशा बहुमताने निर्णय दिला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 8, 2022
in देश-विदेश
Supreme-Court-Of-India

File Photo : Supreme Court Of India


आर्थिक दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणावर शिक्कामोर्तब करत सोमवारी (7 नोव्हेंबर) रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने ऐतिहासिक निर्णय दिला. त्यानुसार 103वी घटनादुरुस्ती करून दिलेले आरक्षण वैध ठरवण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने तीन विरुद्ध दोन न्यायमूर्ती अशा बहुमताने निर्णय दिला आहे. ( Supreme Court Upholds 10 Quota Reservation For Economically Weaker Sections )

केंद्र सरकारने 2019 मध्ये 103वी घटनादुरुस्ती करून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टय़ा मागास घटकांना 10 टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली होती. या आरक्षणाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या सुमारे 40 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, न्यायमूर्ती बेला त्रिवेदी, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती रवींद्र भट यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे या महत्त्वपूर्ण प्रकरणाची सुनावणी झाली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सुनावणीवेळी केंद्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना उच्च शिक्षण आणि रोजगारात सामाजिक समानता व समान संधी उपलब्ध व्हावी यासाठी हे आरक्षण दिल्याचे सांगितले. 13 सप्टेंबरपासून सुनावणी झाली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. 27 सप्टेंबरला घटनापीठाने आपला निर्णय राखून ठेवला होता. सोमवारी सुप्रीम कोर्टाने बहुमताने तीन विरुद्ध दोन असा निर्णय दिला आणि या आरक्षणावर शिक्कामोर्तब केले. हा निकाल देताना चार न्यायमूर्तींनी आपले स्वतंत्र निकालपत्र वाचून दाखवले. या निर्णयामुळे आर्थिकदृष्टय़ा गरीबांना नोकरी आणि शिक्षण प्रवेशात 10 टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे आरक्षण नक्की कोणाला मिळणार?

1. खुल्या प्रवर्गातील व्यक्तींना लाभ होणार. इतर प्रवर्गातील लोकांना याचा फायदा नाही.
2. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशांना ईडब्ल्यूएसअंतर्गत शिक्षण, नोकरीत आरक्षण मिळेल.
3. आरक्षणासाठी पात्र व्यक्तीच्या कुटुंबाची शेती पाच एकरपेक्षा अधिक नसावी.
4. एक हजार चौरस फूट किंवा त्यापेक्षा मोठ्या घराचे क्षेत्र नसावे.
5. महापालिका क्षेत्रातील कुटुंबाचे घर 900 चौरस फुटांपर्यंत हवे.

अधिक वाचा –

– ‘वेटलिफ्टिंग क्षेत्रात मावळचे नाव जागतिक स्तरावर सुवर्णाक्षरात नोंदवलं गेलंय’ : आमदार शेळके
– पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबतचा अंतिम अहवाल 15 दिवसांत सादर करावा – आमदार सुनिल शेळके


Previous Post

खंडाळ्यात विनापरवाना लपवून ठेवलेली 6 हजार किमतीची शिंदी जप्त I Lonavla Crime

Next Post

पवनानगरमधील साम्राज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भाऊ मोरे यांचे दुःखद निधन, मित्रपरिवार शोकसागरात

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bhau-More-Pavananagar

पवनानगरमधील साम्राज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भाऊ मोरे यांचे दुःखद निधन, मित्रपरिवार शोकसागरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.