साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला आज (शुक्रवार, दि. 10 मे) 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. आंब्यांचे व्यापारी देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
गणरायाभोवती केलेली आंब्यांच्या आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती… प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी गायिका मनीषा निश्चल आणि सहकार्यांनी गायन सेवा अर्पण केली. ( 11 thousand mangoes Naivadya to Dagdusheth Ganpati on occasion of Akshaya Tritiya Pune News )
पहाटे ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथील मुले तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे. आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.
अधिक वाचा –
– वडगाव शहरातील पायी ‘मशाल’ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद, ‘आता फक्त संजोग वाघेरे पाटील..’ गीताने दणाणला परिसर
– तळेगाव दाभाडे शहरात चोरट्यांची दहशत, भरदिवसा केला गोळीबार आणि… । Talegaon Dabhade Crime
– मतदान वाढीसाठी सहकार विभागाचे विशेष प्रयत्न, येत्या 13 मे रोजी मावळ, शिरूर आणि पुणे लोकसभेसाठी होणार मतदान