Dainik Maval News : मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित सामुदायिक रक्षाबंधन कार्यक्रमात हजारो भगिनींनी आमदार सुनिल शेळके यांना राखी बांधून यापुढेही सदैव साथ देण्याचे वचन दिले. वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्समध्ये झालेल्या या कार्यक्रमात मावळ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या व सर्व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्रत्येक भगिनीची आत्मीयतेने विचारपूस करीत आमदार शेळके यांनी संवाद साधला. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या जन सन्मान यात्रेत सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, याबद्दल आमदार शेळके यांनी सर्व भगिनींचे आभार व्यक्त केले. ( NCP Womens Rakshabandhan at Vadgaon Maval tied rakhi to MLA Sunil Shelke )
“आमदार सुनिलआण्णा शेळके यांनी नेहमीच भावासारखे पाठबळ संघटनेला दिले आहे. प्रत्येक महिला पदाधिकाऱ्याला आण्णा नेहमीच सन्मानाची वागणूक देत असतात. त्यामुळे आम्ही भगिनी म्हणून सदैव त्यांच्यासोबत उभ्या राहू,” या शब्दात मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा दिपाली गराडे यांनी भावना व्यक्त केल्या.
अत्यंत हृद्य वातावरणात झालेल्या या कार्यक्रमास कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके, ग्रामीण ब्लॉक अध्यक्षा पुष्पा घोजगे, कल्याणी काजळे, तेजस्विनी गरुड, सुवर्णा घोलप, वर्षा नवघणे, वनिता मुऱ्हे, ज्योती आडकर, उमा शेळके, छाया ठाकर, वैशाली आहेर, सुवर्णा राऊत, मीनाक्षी शिंदे, उमा मेहता, भाग्यश्री विनोदे, शैलजा काळोखे, अरुणा पिंजण,वैशाली टिळेकर तसेच सर्व सेल अध्यक्षा,गाव अध्यक्षा, पदाधिकारी व महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत प्रभावीपणे राबवित मावळ तालुक्यातील हजारो बहिणींना लाभ मिळवून दिल्याबद्दल उपस्थित भगिनींनी आमदार शेळके यांना धन्यवाद दिले.
अधिक वाचा –
– वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील 6 कर्मचाऱ्यांना पदोन्नती, पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्याकडून विशेष सत्कार । Vadgaon Maval
– वाघेश्वर गावचे सुपूत्र देविदास कडू यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार । Maval News
– तळेगाव नगरपरिषदेचे अधिकारी – कर्मचारी जाणार संपावर, जाणून घ्या कारण… । Talegaon Dabhade