Dainik Maval News : शिरगाव येथे नुकत्याच झालेल्या तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत पवना शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांचा डंका वाजला आहे. संकुलातील एकूण 19 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये 14 वर्षांखालील 72 किलो वजनी गटात ओंकार सचिन ठाकर याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर 17 वर्षांखालील खुल्या गटात सक्षम गणपत निंबळे याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
या स्पर्धेसाठी पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, संकुलाच्या पर्यवेक्षिका अर्चना शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार वरघडे, गणेश ठोंबरे, छाया कर्डिले यांनी प्रशिक्षण दिले. सर्व यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, संस्थेचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे शालेय समितीचे अध्यक्ष संतोष खांडगे आणि सर्व संस्था पदाधिकारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे. ( Maval taluka level wrestling competition concluded at Shirgaon )
स्पर्धेचा निकाल आणि पवना शिक्षण संकुलाचे यश ;
14 वर्षाखालील 72 किलो वजनी गट
प्रथम क्रमांक – ओंकार सचिन ठाकर
17 वर्षाखालील खुल्या गटात
प्रथम क्रमांक- सक्षम गणपत निंबळे
68 किल्ला वजनी गट
प्रथम क्रमांक – ओम तानाजी पवार
55 किलो वजनी गट
द्वितीय क्रमांक – तुषार तानाजी पवार
48 किलो वजनी गट
द्वितीय – तन्मय दत्तात्रय घरदार
३८ किलो वजनी गट
द्वितीय क्रमांक- सोहम पपेश राऊत
कॉलेज विभाग ५५ किलो वजनी गट
द्वितीय क्रमांक – चैतन्य लक्ष्मण ठाकर
अधिक वाचा –
– बदलापूर अत्याचार प्रकरणाचा मावळातील जनतेकडून तीव्र निषेध, वडगाव मावळ येथे निषेध मोर्चा आणि तहसीलदारांना निवेदन
– कै. सतिश जगताप यांच्या पुण्यस्मरणानिमित्त महिलाभगिनींना साडी वाटप । Maval News
– वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील 6 कर्मचाऱ्यांना पदोन्नती, पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्याकडून विशेष सत्कार । Vadgaon Maval