Dainik Maval News : राज्यातील कोतवालांच्या मानधनत दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय सोमवारी (दि.30 सप्टेंबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करण्यासही मंजुरी देण्यात आली.
राज्यातील 12 हजार 793 कोतवालांना याचा लाभ मिळणार आहे. त्यांना मिळणाऱ्या 15 हजार रुपये इतक्या मानधनात ही वाढ देण्यात येईल. सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजार, अपघात यामुळे असमर्थ ठरल्यास शासनाच्या अनुकंपा धोरणानुसार त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासही मंजुरी देण्यात आली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून ऑक्टोबर दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– मावळ तालुक्यातील सामाजिक सलोखा जपणे सगळ्यांची जबाबदारी – आमदार सुनिल शेळके
– नवनवीन व्यवसाय उभारून खरेदी विक्री संघ बळकट करा, सहाय्यक निबंधक सर्जेराव कांजळकर यांचे आवाहन । Vadgaon Maval