Dainik Maval News : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष शिक्षकांची पदे निर्मित करण्यास मान्यता देण्याचा निर्णय सोमवारी (दि.30 सप्टेंबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
सद्याच्या कार्यरत विशेष शिक्षकांचे रिक्त शिक्षकीय पदांवर समायोजन करण्यात येईल. तसेच उर्वरित पदांवर भरती प्रकिया राबवण्यात येईल. प्रत्येक केंद्र स्तरावर एक याप्रमाणे 4 हजार 860 पदे विशेष शिक्षकांच्या नियुक्तीकरिता राखून ठेवण्यात येतील. समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमासाठी एकूण 2 हजार 572 विशेष शिक्षक, अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) यासाठी 358 शिक्षक, आणि अपंग एकात्मक शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) 54 पदे अशा एकूण 2 हजार 984 शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नवीन इमारतीस पूर्वीचे डॉ. हेगडेवार भवन हेच नाव कायम ठेवण्यावर सहमती । Talegaon Dabhade
– देशी गायीला ‘राज्यमाता – गोमाता’ दर्जा देण्याचा शिंदे सरकारचा निर्णय ; गायींच्या पालन पोषणासाठी मिळणार अनुदान
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून ऑक्टोबर दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे