Dainik Maval News : पूर्वसूचना न देता दगड पाडण्याकरीता केलेल्या ब्लास्टिंगमुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगरुळ गावात (ता. मावळ) घडली आहे. याप्रकरणी मुनुस्वामी वर्धराजनारायण स्वामी (वय ५२, रा. कातवी ता.मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि.28 सप्टेंबर) सकाळी साडेअकरा वाजता मंगरुळ गावच्या हद्दीमध्ये ही घटना घडली.
पोलिसांनी ब्लास्टिंग करणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहीता 2023 कलम 106 (1), 288, 125(अ)(ब) अन्वये दाखल केला आहे. पोउपनि गोवारकर हे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगरुळ गावच्या हद्दीमध्ये कॉमोस कंपनीमध्ये अरुण भेगडे यांच्या प्लॉट मध्ये दगड पाडण्याकरीता अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता लावलेल्या ब्लास्टिंगमुळे दगड उडून फिर्यादीच्या कंपनीत काम करणाऱ्या कामगाराना लागून अजित कुमार भूचकून साहू (वय २५ वर्ष) यांचा मृत्यू झाला. तसेच राम प्रवेश राम प्रसाद आणि राहुल राम प्रसाद हे गंभीर व किरकोळ दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याची फिर्याद दाखल आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोनार समाजासाठी ‘संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
– कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ, अनुकंपा धोरणही लागू ; राज्य सरकारचा मोठा निर्णय
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नवीन इमारतीस पूर्वीचे डॉ. हेगडेवार भवन हेच नाव कायम ठेवण्यावर सहमती । Talegaon Dabhade