Dainik Maval News : केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी मान्यता दिली आहे. मराठीसह पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांनाही हा दर्जा बहाल करण्यात आला आहे. राज्यातील विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या असल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज (दि.3 ऑक्टोबर) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने मराठी भाषेसह आणखी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर राज्यातील नेत्यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे याबद्दल आभार मानले आहेत.
आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस!
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो.…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 3, 2024
माझा मराठाचि बोलु कौतुके।
परि अमृतातें ही पैजा जिंके ॥
समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!!अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 3, 2024
आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस!
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो.…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 3, 2024
आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस!
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी प्रधानमंत्री व सर्व मंत्रिमंडळ सदस्यांचे महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने मनापासून आभार मानतो.- उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis#मायमराठी #अभिजातमराठी pic.twitter.com/KsEDJ4uNJR
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 3, 2024
‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…’
‘अमृतातेहि पैजा जिंके’ अशी महती असलेल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही लोकसभेत आवाज उठवला आणि अखेर आज तो भाग्याचा दिवस उजाडला याचा अभिमान आहे.
गेल्या १० वर्षांपासून केंद्राकडे प्रलंबित असणारा… pic.twitter.com/0SywCb7Tnf
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) October 3, 2024
दुसरीकडे, विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील निर्णयाचे स्वागत केले आहे. परंतु, आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे विरोधी पक्षातील नेते म्हणत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ५ शिक्षकांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान । Maval News
– कामशेत खिंडीत झालेल्या भीषण ट्रेलर अपघातात एकाचा जागीच होरपळून मृत्यू – पाहा Video
– ग्रामीण भागातील विद्यार्थीनींची पायपीट थांबणार ! पवना विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थीनींना मोफत सायकल वाटप