Dainik Maval News : माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत खोपोली नगरपरिषदेने राज्यात 23 वा तर कोकण विभागातील नगरपरिषद व नगरपंचायत विभागातून दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. नगरपरिषदेस 50 लक्ष रुपयांचे पारितोषिक प्राप्त होणार असल्याची मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील रोकडे यांनी दिली.
पर्यावरण व वातावरण बदल विभागाने पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये खोपोली नगरपरिषदने सहभाग घेतला होता. या अभियानातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या नगरपरिषदांचा 27 सप्टेंबर रोजी निकाल जाहीर झाला. यात खोपोली नगरपरिषदेने राज्यात 23 वा क्रमांक आणि 50 हजार ते 1 लक्ष लोकसंख्येच्या प्रवर्गात कोकण विभागातून द्वितीय क्रमांक पटकाविला.
‘माझी वसुंधरा’ अभियान अंतर्गत शहरातील वृक्षारोपण व पूर्वी लावलेल्या वृक्षांचे संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा प्रकल्प, शहरातील सुशोभीकरण, हरित क्षेत्रांची व जलस्त्रोतांची निगा राखणे आदी उपक्रमांची तपासणी सरकारमार्फत त्रयस्थ संस्थेद्वारे केली जाते. तसेच शहरातील नागरिकांकडून सर्वेक्षण दरम्यान प्रतिक्रिया घेतल्या जातात.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मावळात येणार, कार्ला गडावर एकविरा देवीचे दर्शन घेणार । CM Eknath Shinde
– वंदन दुर्गांना । कुटुंबासह ती पेलतेय सामाजिक जबाबदारी : संविधान संस्कारासाठी झटणाऱ्या संविधान संवादक शितलताई । Shital Yashodhara
– मोठी बातमी ! मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मोदींचा मास्टर स्ट्रोक