Dainik Maval News : शिरगाव येथे अवैधरित्या सुरु असलेल्या गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्टीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत महिला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि.7) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास शिरगाव नदीच्या हद्दीत पवना नदीकाठी ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस शिपाई श्यामसुंदर वैजनाथ गुट्टे (वय 36, गुन्हे शाखा, युनिट 5 पिंपरी-चिंचवड) यांनी शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार 24 वर्षीय महिला आरोपी विरोधात महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम कलम 65 (क) (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी शिरगांव हद्दीत पवना नदीकाठी छापा टाकला. तेव्हा महिला आरोपी ही 5000 लीटर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी गुळ मिश्रित रसायन बनविताना दिसून आली. परंतु पोलीस आल्याची चाहूल लागताच नदीकाठी असलेल्या झाडाझुडपाच्या आडोशाचा फायदा घेवुन ती पळून गेली. पोलीस हवालदार सोनटक्के हे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वंदन दुर्गांना । वडीलांना आदर्श मानून ‘ती’ डॉक्टर झाली ; जिद्दीने निखिलेशाताईंनी स्वतःचं नवं अस्तित्व बनवलंय । Dr Nikhilesha Shete
– भारताचा कोहिनूर हरपला ! प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास । Industrialist Ratan Tata Dies
– मोठी बातमी ! इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी 30 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन