Dainik Maval News : विश्वहिंदू परिषद, बजरंग दल यांच्या वतीने संपूर्ण मावळ तालुक्यात गेल्या 20 वर्षांपासून नवरात्री उत्सवानिमित्त दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा 40 गावांमध्ये दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. देहुरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत, पवनानगर, नाणे, टाकवे, देहुगाव, निगडे, नवलाख उंब्रे आदी गावांत दौडीचे नियोजन करण्यात आले आहे. गावातील वेगवेगळ्या ठिकाणाहून 9 दिवस दुर्गा माता दौड काढली जाते.
हिंदू धर्माचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाला घेऊन गावातील तरुण-तरुणी, महिला-पुरुष पहाटे गावातील एका मंदिरापासून दुर्गादौडला सुरुवात करतात. विविध घोषणा देत शिस्तबद्ध पद्धतीने दौड सुरू असते. हातात भगवा ध्वज घेऊन एकजण पुढे असतो, तर त्याला दोन रक्षक असतात. त्यांच्या पाठीमागे इतर नागरिक असतात. अनेक ठिकाणी महादौडीचे आयोजन करण्यात येते.
श्री दुर्गा माता दौडच्या निमित्ताने तरूणाईला सकाळी लवकर उठणे, निरोगी आरोग्यासाठी सुर्य नमस्कार घालणे, बलोपासना महत्व समजावून सांगितले जाते. दुर्गा माता दौडच्या माध्यमातून राष्ट्रभक्त युवकांची फळी निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे. अशी माहिती महेंद्र असवले (जिल्हा मंत्री-विश्व हिंदू परिषद) यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वंदन दुर्गांना । वडीलांना आदर्श मानून ‘ती’ डॉक्टर झाली ; जिद्दीने निखिलेशाताईंनी स्वतःचं नवं अस्तित्व बनवलंय । Dr Nikhilesha Shete
– भारताचा कोहिनूर हरपला ! प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास । Industrialist Ratan Tata Dies
– मोठी बातमी ! इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी 30 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन